महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 94

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव चाचणी – 94

महादीप परीक्षा सराव चाचणी – 94

एकूण प्रश्न : 50
1. भारत व चीन दरम्यान असणाऱ्या सीमा रेषेचे नाव काय आहे ?
उत्तर : मॅकमोहन सीमारेषा
2. एनातोऱीयाचे पठार कोणत्या देशात आहे ?
उत्तर : तुर्कस्थान
3. “जागतिक वसुंधरा दिन” केव्हा साजरा करतात ?
उत्तर : २२ एप्रिल
4. “ग्राहक संरक्षण कायदा” आणणारा जगातील सर्वात पहिला देश कोणता ?
उत्तर : अमेरिका
5. तारा जगातील प्रमुख वृत्तसंस्था कोणत्या देशातील आहे ?
उत्तर : ऑस्ट्रेलिया
6. देशाचे पहिले नागरिक कोण ?
उत्तर : राष्ट्रपती
7. कोणत्या खेळाच्या मैदानास “कोर्ट” म्हणतात ?
उत्तर : बॅडमिंटन
8. “अमरावती” हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे ?
उत्तर : आंध्र प्रदेश
9. “कोलार” ही सोन्याची खाण कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर : कर्नाटक
10. “मिनांबक्कम” विमानतळ कोठे आहे ?
उत्तर : चेन्नई
11. “आरती प्रभू” हे टोपण नाव कोणाचे आहे ?
उत्तर : चिंतामणी त्र्यंबक खानोलकर
12. “वर्धा” हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?
उत्तर : नागपूर
13. महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता ?
उत्तर : सिंधुदुर्ग
14. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हटले आहे ?
उत्तर : कोयना
15. “तारापूर” हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर : पालघर
16. म्हण पूर्ण करा : टाकीचे घाव सोसल्यावाचून …………… देशपण येत नाही.
उत्तर : देवपण
17. वाक्प्रचार लिहा : आभाळ फाटणे
उत्तर : सर्व बाजूंनी संकट येणे
18. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा : मोजता येणार नाही असे
उत्तर : अगणित, असंख्य
19. समानार्थी शब्द लिहा : दंडवत
उत्तर : नमस्कार
20. अलंकारिक शब्दाचा अर्थ लिहा : नवकोट नारायण
उत्तर : खूप श्रीमंत, अतिशय श्रीमंत
21. A person who makes and repairs things made of iron….?
उत्तर : Blacksmith
22. Write opposite : Maximum
उत्तर : Minimum
23. Write Comparative degree (adjective) : Bright
उत्तर : Brighter
24. Complete : Blood is thicker …………………?
उत्तर : than water
25. Write plural : Knife
उत्तर : Knives
26. संख्या मालिका पूर्ण करा : 2, 3, ……, 7, 11
उत्तर : 5
27. एका मिनिटात मिनिट काटा किती अंश पुढे सरकतो ?
उत्तर : ६ अंश
28. श्याम दक्षिणेकडे तोंड करून शीर्षासन करीत होता तर त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती ?
उत्तर : पूर्व
29. डिसेंबर महिन्यात ९ तारखेला सोमवार आहे. तर ख्रिसमस (नाताळ) सणाचा वार कोणता ?
उत्तर : बुधवार
30. एका सांकेतिक भाषेत ROLLOVER हा शब्द ORLLVORE असा लिहितात तर PULLDOWN हा शब्द कसा लिहिला जाईल ?
उत्तर : UPLLODNW
31. १०० मिनिटे म्हणजे किती तास किती मिनिटे ?
उत्तर : १ तास ४० मिनिटे
32. १० चे विभाजक सांगा.
उत्तर : १, २, ५, १०
33. कोन मापकाचे एकक कोणते ?
उत्तर : अंश
34. इष्टिकाचितीच्या शिरोबिंदूंची संख्या किती ?
उत्तर : ८
35. 10000 किलोग्रॅम म्हणजे किती टन ?
उत्तर : १० टन
36. आयताच्या परिमितीचे सूत्र लिहा.
उत्तर : २ × लांबी + २ × रुंदी
37. संख्या रेषेवर कोणतीही धनसंख्या ही शून्यच्या कोणत्या बाजूकडे असते ?
उत्तर : उजव्या
38. थोर ग्रीक गणितीतज्ज्ञ पायथागोरसचे जन्मस्थान कोणते ?
उत्तर : सेमोस बेट
39. एका चौरसाकृती क्रीडांगणाची बाजू १२ मीटर असल्यास त्या क्रीडांगणाचे क्षेत्रफळ किती ?
उत्तर : १४४ चौरस मीटर
40. दोन रेषांचे छेदनबिंदू किती असतात ?
उत्तर : एक व एकच
41. आकाशातील किती टक्के वीज जमिनीवर येते ?
उत्तर : ५%
42. पाण्याचे रेणुसूत्र काय आहे ?
उत्तर : H₂O
43. व्हल्कनायझेशनचा शोध कोणी लावला ?
उत्तर : चार्ल्स गुडइयर
44. “नीळ क्रांती” हे कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे ?
उत्तर : मत्स्य उत्पादन
45. हाडे ठिसूळ व कमकुवत होणे हे कोणत्या जीवनसत्वाच्या/खनिजाच्या अभावामुळे होते ?
उत्तर : कॅल्शियम व फॉस्फोरस
46. “स्पेस अॅप्लिकेशन सेंटर” कोठे आहे ?
उत्तर : अहमदाबाद
47. वस्तू वस्तूकडे खेचून घेण्यासाठी पृथ्वीने लावलेल्या बलास काय म्हणतात ?
उत्तर : गुरुत्वीय बल
48. सैनिकाचे संचलन – सतत एकसारखी गती यास कोणती गती म्हणतात ?
उत्तर : रेषीय एकसमान गती
49. चुंबक नेहमी कोणत्या दिशेत स्थिर होतो ?
उत्तर : उत्तर-दक्षिण दिशा
50. निळा लिटमस कागद आम्लात बुडवल्यावर कोणत्या रंगाचा होतो ?
उत्तर : तांबडा
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर पाहण्यासाठी “उत्तर दाखवा” बटण दाबा.

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment