महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 95

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव चाचणी – 95

महादीप परीक्षा सराव चाचणी – 95

एकूण प्रश्न : 50
1. जगातील सर्वात मोठे महासागर कोणते आहे ?
उत्तर : पॅसिफिक / प्रशांत महासागर
2. लॅटिन भाषेत “होमो” या शब्दाचा अर्थ काय ?
उत्तर : मानव
3. 5G सेवा देणारा जगातील पहिला देश कोणता ?
उत्तर : दक्षिण कोरिया
4. “नॉर्वे” या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर : ओस्लो
5. “फॉन” (fohn) हे वारे कोणत्या पर्वताच्या उतार भागात वाहते ?
उत्तर : आल्प्स
6. २०२३ मध्ये “G20 शिखर परिषद” कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती ?
उत्तर : भारत
7. भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हणतात ?
उत्तर : मुंबई
8. भारतीय लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो ?
उत्तर : लोकसभा सभापती
9. “अरुणाचल प्रदेश” या राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : इटानगर
10. गुजरातमधील सिंहासाठी प्रसिद्ध असणारे अभयारण्य कोणते ?
उत्तर : गीरचे अभयारण्य
11. समानार्थी शब्द लिहा : संग्राम
उत्तर : युद्ध, समर, लढाई
12. वाक्प्रचाराचा अर्थ लिहा : कानी कपाळी ओरडणे
उत्तर : एकसारखे बजावून सांगणे
13. “आईने दिलेली करंजी खाल्ली” या वाक्याचा काळ ओळखा.
उत्तर : भूतकाळ
14. म्हण पूर्ण करा : कानामागून आली ………. आणि तिखट झाली
उत्तर : आऱी
15. अलंकारिक शब्द ओळखा : निसर्गात नसलेली वस्तू
उत्तर : पांढरा कावळा
16. Which is India’s “National River” ?
उत्तर : Ganga
17. Write the past tense of “bring”.
उत्तर : brought
18. Write opposite : dark
उत्तर : light
19. calf : calves :: city : …….?
उत्तर : cities
20. Complete : United we stand…………
उत्तर : divided we fall
21. 3, 5, 7, 0, 8 हे अंक एकदा वापरून लहानात लहान ५ अंकी संख्या तयार करा.
उत्तर : 30578
22. सम संख्या असलेल्या एकूण मूळ संख्या किती ?
उत्तर : 1
23. 1000 या संख्येकरिता वापरण्यात येणारे रोमन संख्या चिन्ह लिहा.
उत्तर : M
24. 2 तास 45 मिनिटे म्हणजे एकूण किती मिनिटे होतात ?
उत्तर : 165 मिनिटे
25. “भारतीय संख्या लेखन” पद्धतीचे नाव लिहा.
उत्तर : दशमान पद्धत
26. रेषीय जोडीतील कोनाच्या मापाची बेरीज किती असते ?
उत्तर : 180°
27. स्तंभचित्र काढण्याकरिता कोणत्या गणितीय कागदाचा वापर करण्यात येतो ?
उत्तर : आलेख कागद
28. कोणत्या दोन संख्यांची बेरीज 0 येते ?
उत्तर : सर्वरुद्ध संख्या
29. परिमेय संख्येचा शोधक कोण ?
उत्तर : पायथागोरस
30. 24 या संख्येचा वर्ग लिहा.
उत्तर : 576
31. सन २०२४ मध्ये जानेवारी महिन्यात ८ तारखेला सोमवार येतो, तर “प्रजासत्ताक दिनाचा” वार कोणता ?
उत्तर : शुक्रवार
32. श्याम मंदिरात मूर्तीसमोर उभा आहे. मूर्ती आग्नेय दिशेला असेल तर श्यामच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल ?
उत्तर : पूर्व
33. लीना लिफ्टमध्ये आहे. तळमजल्यासाठी 0, वरच्या मजल्यांसाठी 1, 2, 3 आणि तळमजल्याखालच्या मजल्यांसाठी -1, -2, -3 असे क्रमांक आहेत. लीनाला वरच्या तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी कोणते बटन दाबावे लागेल ?
उत्तर : 3
34. जर पेन म्हणजे दप्तर, दप्तर म्हणजे पेन्सिल, पेन्सिल म्हणजे शाई, शाई म्हणजे पेन असेल तर विद्यार्थी शाळेत पुस्तके कशात नेतात ?
उत्तर : पेन्सिल
35. एका सांकेतिक भाषेत BACKWARD हा शब्द DBRAACWK असा लिहितात तर CARELESS हा शब्द कसा लिहिला जाईल ?
उत्तर : SCSAERLE
36. झोपाळ्याच्या हेलकाव्याला कोणती गती म्हणतात ?
उत्तर : आंदोलित गती
37. “लेझर किरणांचा” शोध कोणी लावला ?
उत्तर : टी. एच. मेमन
38. “बटू ग्रह” कोणत्या ग्रहाला म्हणतात ?
उत्तर : प्लुटो
39. “गलगंड” हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो ?
उत्तर : आयोडीन
40. “सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्र” कोठे आहे ?
उत्तर : श्रीहरिकोटा
41. खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो ?
उत्तर : ७ मिनिटे २० ते ३२ सेकंद
42. शरीराचे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?
उत्तर : थर्मामीटर, तापमापी
43. घड्याळ दुरुस्त करण्यासाठी कोणते भिंग वापरले जाते ?
उत्तर : बहिर्गोल
44. भारताने २०२३ मध्ये चंद्रावर कोणते यान पाठवले ?
उत्तर : चांद्रयान ३
45. भारतातील कोणत्या शहरात सर्वात जास्त प्रदूषण आहे ?
उत्तर : दिल्ली
46. प्रसिद्ध “स्वामी” या कादंबरीचे लेखक कोण ?
उत्तर : रणजित देसाई
47. “रयत शिक्षण संस्थेची” स्थापना कोणी केली ?
उत्तर : कर्मवीर भाऊराव पाटील
48. महाराष्ट्रातील “श्रीरामपूर” हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर : मोसंबी
49. “झिरो माईल” हे स्थान कोणत्या शहरात आहे ?
उत्तर : नागपूर
50. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक पर्वत कोणता आहे ?
उत्तर : सह्याद्री
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर पाहण्यासाठी “उत्तर दाखवा” बटण दाबा.

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment