महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 96

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव चाचणी – 96

महादीप परीक्षा सराव चाचणी – 96

एकूण प्रश्न : 50
1. “मारियाना गर्त” कोणत्या महासागरात आहे ?
उत्तर : प्रशांत महासागर
2. “न्यूयॉर्क टाइम्स” हे कोणत्या देशातील वर्तमानपत्र आहे ?
उत्तर : अमेरिका
3. जगातील सर्वात उंच ज्वालामुखी कोणता ?
उत्तर : कोटोपॅक्सी
4. “इजिप्त” देशाची राष्ट्रभाषा कोणती आहे ?
उत्तर : अरबी
5. “शांघाय” हे बंदर कोणत्या देशात आहे ?
उत्तर : चीन
6. कृष्णा व कोयना या दोन नद्यांचा संगम कोठे होतो ?
उत्तर : कराड
7. “इंफाळ” शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे ?
उत्तर : मणिपूर
8. प्रसिद्ध “मधुबनी लोकचित्रकला” प्रकार कोणत्या राज्यातील आहे ?
उत्तर : बिहार
9. “उस्ताद बिस्मिल्लाह खान” हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत ?
उत्तर : शहनाई
10. भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग कोणता ?
उत्तर : डिब्रुगड ते कन्याकुमारी
11. “सुधारक” नावाचे वृत्तपत्र कोणी काढले ?
उत्तर : गोपाळ गणेश आगरकर
12. “टिळक आणि आगरकर” या नाटकाचे नाटककार कोण आहेत ?
उत्तर : श्रीराम बेडेकर
13. वर्धमान महावीरांच्या आईचे नाव काय होते ?
उत्तर : त्रिशला
14. निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत ?
उत्तर : राष्ट्रपती
15. महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे ?
उत्तर : ३०७७१३ चौ.कि.मी.
16. म्हण पूर्ण करा : गाजराची पुंगी वाजली तर वाजली …………. नाहीतर मोडून खाल्ली
उत्तर : नाहीतर मोडून खाल्ली
17. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा : किल्ल्याच्या सभोवतालची भिंत
उत्तर : तट
18. अलंकारिक शब्द लिहा : रागीट मनुष्य
उत्तर : जमदग्नीचा अवतार
19. वाक्प्रचार लिहा : सर्व बाजूंनी संकट येणे
उत्तर : आभाळ फाटणे
20. वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी कोणते चिन्ह वापरले जाते ?
उत्तर : पूर्णविराम
21. Complete : Courage is the surest …………….. weapon in danger
उत्तर : defence
22. Write the plural form : thief
उत्तर : thieves
23. Write opposite : natural
उत्तर : artificial
24. Which is the “National Vegetable” of India ?
उत्तर : pumpkin
25. Write the full form of UN.
उत्तर : United Nations
26. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या लिहा.
उत्तर : 9
27. दिलेल्या संख्येचे विभाजक शोधण्यासाठी कशाचा उपयोग होतो ?
उत्तर : विभाज्यतेची कसोटी
28. 34948 या संख्येमधील 4 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती ?
उत्तर : 3960
29. कोनाला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर : 1
30. काटकोन त्रिकोणात काटकोनाव्यतिरिक्त इतर दोन कोनांच्या मापाची बेरीज किती ?
उत्तर : 90°
31. 24 से.मी. लांबी व 16 से.मी. रुंदी असणाऱ्या आयताची परिमिती किती ?
उत्तर : 80 से.मी.
32. दोन रेषा परस्परांना लंब असताना तयार होणाऱ्या दोन कोनांच्या मापांची बेरीज किती होईल ?
उत्तर : 180°
33. वेदांतने एक वस्तू 1000 रुपयांना खरेदी करून 1200 रुपयांना विकली तर शेकडा नफा किती झाला ?
उत्तर : 20%
34. एका शिक्षकाने 81 चॉकलेट व 108 बिस्किटांचे पुडे समप्रमाणात वाटले तर या वर्गात विद्यार्थी संख्या किती ?
उत्तर : 27
35. MLCD या रोमन संख्या उतरत्या क्रमात लिहा.
उत्तर : MDCL
36. घड्याळात 11 वाजून 20 मिनिटांनी तास व मिनिट काट्यामध्ये किती अंशांचा कोन होईल ?
उत्तर : 140°
37. एका सांकेतिक भाषेत CAP=20, SIT=48 तर HEN=?
उत्तर : 27
38. एका नकाशात वायव्य दिशा नैऋत्य दिशा दर्शवत असेल तर याच नकाश्यात दक्षिण दिशा कोणती दिशा दर्शवते ?
उत्तर : पूर्व
39. घड्याळ : वेळ :: होकायंत्र : ……….?
उत्तर : दिशा
40. संख्या मालिका पूर्ण करा : 1, 3, 6, 10, 15, ..?..
उत्तर : 21
41. प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका कोण बजावते ?
उत्तर : हरितलवके
42. नेत्रभिंग अपारदर्शक होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?
उत्तर : मोतीबिंदू
43. सजीवाच्या लहानात लहान घटकाला काय म्हणतात ?
उत्तर : पेशी
44. अग्निशामक दलास बोलवायचे असल्यास कोणत्या नंबरवर फोन करतात ?
उत्तर : 101
45. शनि ग्रहाला एकूण किती उपग्रह आहेत ?
उत्तर : 33
46. राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना कोणत्या साली झाली ?
उत्तर : 1976
47. सर्वयोग्य दाता रक्तगट कोणता आहे ?
उत्तर : O+
48. फ्रीजरमधील तापमान किती असते ?
उत्तर : -18°C पेक्षा कमी
49. आकाशपाळण्याच्या गतीला कोणती गती म्हणतात ?
उत्तर : वर्तुळाकार गती
50. शेवगा या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव काय ?
उत्तर : मोरिंगा ओलीफेरा
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर पाहण्यासाठी “उत्तर दाखवा” बटण दाबा.

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment