महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 72

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव चाचणी – 72

महादीप परीक्षा सराव चाचणी – 72

विज्ञान, इतिहास, भूगोल • एकूण 50 प्रश्न

उत्तर दाखवले: 0 / 50
1शरीराचे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?
उत्तर: तापमापी / थर्मामीटर
2हवेत ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते?
उत्तर: २१%
3वाळू वितळवून कोणता पदार्थ बनविला जातो?
उत्तर: काच
4माशाचे हृदय किती कप्प्यांचे बनलेले असते?
उत्तर: दोन
5वनस्पती तूप तयार करताना कोणता वायू वापरतात?
उत्तर: हायड्रोजन
6सर्वात जास्त लोह कोणत्या भाजीत असते?
उत्तर: पालक
7ताज्या संत्र्यामध्ये कोणते जीवनसत्त्व असते?
उत्तर: क जीवनसत्त्व
8पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ कोणता?
उत्तर: हिरा
9कावीळ हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे?
उत्तर: यकृत
10पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे?
उत्तर: चंद्र
11चुंबकाची सुई नेहमी कोणत्या दिशेला स्थिर राहते?
उत्तर: उत्तर-दक्षिण
12भारताचे पहिले अणुऊर्जा केंद्र कोठे आहे?
उत्तर: तारापूर
13आकाशात सोडलेली पहिली दुर्बीण कोणती?
उत्तर: हबल
14मिठाचे शास्त्रीय नाव काय आहे?
उत्तर: सोडियम क्लोराईड
15कोणत्या झाडापासून कात तयार करतात?
उत्तर: खैर
16सर्व प्रकारच्या ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता आहे?
उत्तर: सूर्य
17सूर्यापासून येणारे अतिनील किरणे कोणता वायू शोषून घेतो?
उत्तर: ओझोन
18गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला?
उत्तर: सर आयझॅक न्यूटन
19प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये कोणता धातू आढळतो?
उत्तर: कॅल्शियम
20इस्रोचे मुख्य कार्यालय कोठे आहे?
उत्तर: बंगळुरू
21तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना काय म्हणतात?
उत्तर: ताम्रपट
22मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता?
उत्तर: बाबर
23रामचरितमानस हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर: संत तुलसीदास
24शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती?
उत्तर: राजगड
25छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
उत्तर: पुरंदर
26वर्धमान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थंकर आहेत?
उत्तर: २४ वे
27ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता?
उत्तर: बायबल
28अशोक स्तंभ कोठे आहे?
उत्तर: सारनाथ
29छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते?
उत्तर: जिजाबाई
30छत्रपती शिवाजी महाराजांच्या तांब्याच्या नाण्यांना काय म्हणतात?
उत्तर: शिवराई
31वेद किती आहेत?
उत्तर: चार
32गौतम बुद्धांच्या आईचे नाव काय होते?
उत्तर: मायादेवी
33सम्राट अशोकांनी कोणता धर्म स्वीकारला होता?
उत्तर: बौद्ध धर्म
34रामायण हे महाकाव्य कोणी लिहिले आहे?
उत्तर: महर्षी वाल्मीकी
35सिंहगड जिंकताना धारातीर्थी पडलेला सरदार कोण होता?
उत्तर: तानाजी मालुसरे
36मिसाईल मॅन कोणाला म्हणतात?
उत्तर: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
37चंद्रगुप्त मौर्याने कोणत्या साम्राज्याची स्थापना केली?
उत्तर: मौर्य साम्राज्य
38घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर: डॉ. राजेंद्र प्रसाद
39शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर: महात्मा फुले
40'जय हिंद' व 'चलो दिल्ली' या घोषणा कोणी दिल्या?
उत्तर: सुभाषचंद्र बोस
41पृथ्वी स्वतःभोवती फिरण्याला काय म्हणतात?
उत्तर: परिवलन
42पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १३ कि.मी.पर्यंत कोणता थर असतो?
उत्तर: तपांबर
43लीप वर्ष किती दिवसांचे असते?
उत्तर: ३६६
44भूकवचाच्या मध्ये कंपन होणे याला काय म्हणतात?
उत्तर: भूकंप
45आपली आकाशगंगा कोणत्या नावाने ओळखली जाते?
उत्तर: मंदाकिनी
46सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
उत्तर: गुरू
47भारताची प्रमाण वेळ कोणत्या शहरावरून जाणाऱ्या रेखावृत्तावरील वेळेनुसार ठरविली जाते?
उत्तर: मिर्झापूर
48१९८४ या वर्षी अवकाशात जाणारे पहिले अंतराळवीर कोण होते?
उत्तर: राकेश शर्मा
49पृथ्वीला एक परिवलन ३६०° पूर्ण करायला किती तास लागतात?
उत्तर: २४ तास
50सर्वात मोठी सूर्य तबकडी जंतरमंतर कोठे आहे?
उत्तर: दिल्ली
सरावासाठी शुभेच्छा! 🌟

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
'विद्यार्थी' हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे 'महादीप एक संकल्प' हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment