महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 92
🛩️🛩️🛩️ तयारी विमानवारीची…..
उतुंग भरारीची…… 🛩️🛩️🛩️
महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करा 👇
महादीप परीक्षा सराव चाचणी – 92
महादीप परीक्षा सराव चाचणी – 92
BEST OF LUCK • 50 प्रश्न
1. जगातील सर्वात लांब सामुद्रधुनी कोणती आहे?
उत्तर : मलाक्का सामुद्रधुनी
2. जगातील सर्वात मोठे अरण्य कोणत्या वृक्षांचे आहे?
उत्तर : सूचीपर्णी वृक्ष
3. जगातील सर्वाधिक विकसित खंड कोणता?
उत्तर : युरोप
4. जपान देशाची राजधानी कोणती?
उत्तर : टोकियो
5. जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात आहे?
उत्तर : चीन
6. भारतातील पहिली महिला वैमानिक कोण आहे?
उत्तर : सौदामिनी देशमुख
7. चेरापुंजी कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : मेघालय
8. भारतातील अक्षरधाम मंदिर कोणत्या शहरात आहे?
उत्तर : दिल्ली
9. मिल्खा सिंग यांना कोणती उपाधी दिली गेली?
उत्तर : फ्लाइंग सिख
10. नोबेल पारितोषिकाचे पहिले भारतीय मानकरी कोण?
उत्तर : रवींद्रनाथ टागोर
11. महाराष्ट्र पठाराचा भाग कोणत्या मृदेने व्यापला आहे?
उत्तर : रेगूर मृदा / काळी मृदा
12. पेंच प्रकल्प कोणत्या दोन राज्यांचा आहे?
उत्तर : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश
13. महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके कोणत्या विभागात आहेत?
उत्तर : कोकण
14. राज्यात पत्रकार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर : ६ जानेवारी
15. पारस औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : अकोला
16. म्हण पूर्ण करा : खाई त्याला ………..?
उत्तर : खवखवे
17. गुरांचा : गोठा :: मुंग्यांचे : ……..?
उत्तर : वारूळ
18. ज्यात तळ लागत नाही असा — एक शब्द
उत्तर : अथांग
19. कचाट्यात सापडणे — वाक्प्रचाराचा अर्थ
उत्तर : तावडीत सापडणे
20. तेजस्वी × ……. — विरुद्धार्थी शब्द
उत्तर : तेजहीन
21. Write plural form : Half —
उत्तर : Halves
22. ant : hill :: bat : ……..
उत्तर : roost / cave
23. Write opposite : autumn ×
उत्तर : spring
24. Write synonym : demolish =
उत्तर : destroy
25. Complete : Man proposes ……….. God disposes
उत्तर : Man proposes, God disposes
26. धातू ठोकून त्याला चपटा करता येणे म्हणजे काय?
उत्तर : वर्धनीयता
27. वातावरणात वीज चमकतांना कोणता वायू तयार होतो?
उत्तर : नायट्रोजन ऑक्साईड
28. जागतिक रक्तदान दिन केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : १४ जून
29. आम्ल/आम्लारी परीक्षण करण्यासाठी कशाचा वापर केला जातो?
उत्तर : लिटमस कागद
30. १ घनफूट म्हणजे किती लिटर?
उत्तर : २८.३२ लिटर
31. भारतातील नकाशा तयार करणाऱ्या मुख्य संस्थेचे नाव काय?
उत्तर : भारतीय सर्वेक्षण संस्था
32. स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होतो?
उत्तर : जीवनसत्त्व C
33. भारत सरकारने राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना किती साली केली?
उत्तर : १९७६
34. भूकंपाच्या उगमस्थानाला काय म्हणतात?
उत्तर : एपिसेंटर
35. मिसाईल मॅन कोणाला म्हणतात?
उत्तर : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
36. अंकमाला पूर्ण करा : 7, 12, 17, …., 27
उत्तर : २२
37. एका मिनिटात मिनिट काटा किती अंश पुढे सरकतो?
उत्तर : ६ अंश
38. सांकेतिक भाषेत लोहाराला सुतार, सुताराला माळी, माळ्याला सोनार, सोनाराला लोहार म्हटले तर बागेची देखभाल कोण करेल?
उत्तर : सोनार
39. ACEG, BDFH, IKMO, …….?
उत्तर : JLNP
40. २०१२ मध्ये ऑगस्ट महिन्यात २ तारीख गुरुवारी आली, तर २२ तारखेचा वार कोणता?
उत्तर : बुधवार
41. आलेख कागदावरील फिकट रेषांमधील अंतर किती असते?
उत्तर : १ मिलीमीटर
42. १०२४ या संख्येचे वर्गमूळ किती?
उत्तर : ३२
43. रोमन संख्या लेखन पद्धतीत किती चिन्हांचा वापर केला जातो?
उत्तर : ७
44. घनाची बाजू ८ सेमी असेल तर घनाचे एकूण पृष्ठफळ किती?
उत्तर : ९६ चौ.से.मी.
45. भूमितीमधील निगमन पद्धत कोणी शोधून काढली?
उत्तर : पायथागोरस
46. ‘एलीमेंट्स’ नावाचे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर : युक्लीड
47. ६००० शतक म्हणजे किती दशक?
उत्तर : ६००००
48. 7.234 या संख्येतील 7 ची दर्शनी किंमत किती?
उत्तर : ७
49. चौरसाकृती खोलीची परिमिती ४०० सेमी असल्यास एका बाजूची लांबी किती?
उत्तर : १०० सेमी
50. पहिल्या क्रमवार २० नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
उत्तर : १०.५
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks – Mahadeep Exam Practice PaperPdf Download 👇
प्रश्नपत्रिकाDownload☝️
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
उत्तरपत्रिका Download ☝️
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे. ‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.