महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 84
🛩️🛩️🛩️ तयारी विमानवारीची…..
उतुंग भरारीची…… 🛩️🛩️🛩️
महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करा 👇
महादीप परीक्षा सराव चाचणी – 84
महादीप परीक्षा सराव चाचणी – 84
प्रश्न व उत्तरे • एकूण 50 प्रश्न
दाखवलेली उत्तरे: 0 / 50
1जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर कोणते ?
उत्तर : टोकियो
2जगातील सर्वांत मोठा जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात आहे ?
उत्तर : चीन
3‘ऑस्ट्रेलिया’ देशाची राजधानी कोणती ?
उत्तर : कॅनबेरा
4‘इंग्लंड’ या देशाचे चलन कोणते आहे ?
उत्तर : पौंड
5पवनचक्क्यांची भूमी कोणत्या देशास म्हणतात ?
उत्तर : नेदरलँड
6भारतातील पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहेत ?
उत्तर : मीरा कुमार
7भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?
उत्तर : भारतरत्न
8भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली ?
उत्तर : धोंडो केशव कर्वे
9‘नागार्जुन सागर’ धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर : कृष्णा
10भारतातील सर्वात मोठी बँक कोणती आहे ?
उत्तर : स्टेट बँक ऑफ इंडिया
11‘हिंगोली’ शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर : कयाधू
12संत ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ कोठे लिहिला ?
उत्तर : नेवासे
13पुणे येथे मुलींची पहिली शाळा कोणी काढली ?
उत्तर : महात्मा फुले
14‘स्त्री पुरुष तुलना’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
उत्तर : ताराबाई शिंदे
15राज्यपालाची नियुक्ती कोण करते ?
उत्तर : राष्ट्रपती
16शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा : भाषण ऐकणारे
उत्तर : श्रोते
17मेंढ्यांचा : कळप :: वानरांची : ……
उत्तर : टोळी
18समानार्थी शब्द लिहा : अविरत
उत्तर : सतत, अखंड
19विरुद्धार्थी शब्द लिहा : आस्था × ……
उत्तर : अनास्था
20म्हण पूर्ण करा : वासरात लंगडी ……….
उत्तर : गाय शहाणी
21Complete : Well begun is …………… half done
उत्तर : Well
22Write synonym : Jolly = ………….
उत्तर : Merry
23Write opposite : Below × ……….
उत्तर : Above
24Write plural : Child – ………….
उत्तर : Children
25A person who cuts hair : ………..
उत्तर : Barber
26संख्या मालिका पूर्ण करा : 4, 9, ……, 25, 36
उत्तर : 16
27विसंगत घटक ओळखा : लेखक, वाचक, प्रकाशक, मुद्रक
उत्तर : वाचक
28एका विशिष्ट संख्येतिक लिपीत STRONG हा शब्द TSORGN असा लिहितात तर त्याच लिपीत PUBLIC हा शब्द कसा लिहिला जाईल ?
उत्तर : UPLBCI
29भाऊसाहेब, रामभाऊस म्हणाले, ‘माझ्या मावशीची आई तुझ्या मामांच्या आजोबांच्या पत्नीला सासूबाई म्हणते.’ तर रामभाऊ भाऊसाहेबांचे कोण ?
उत्तर : भाऊ
30सप्टेंबर महिन्यात पहिला सोमवार 3 तारखेला आहे तर शिक्षक दिनाच्या वार कोणता असेल ?
उत्तर : बुधवार
3132 या संख्येचा वर्ग किती ?
उत्तर : 1024
32व्यवहारात नफा मिळविण्यासाठी कोणती किंमत जास्त असावी लागते ?
उत्तर : विक्री किंमत
33रोमन संख्या लेखनामध्ये M या चिन्हाची किंमत किती ?
उत्तर : 1000
345860 मिलीग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?
उत्तर : 5.860 ग्रॅम
35जेव्हा दोन रेषा एकमेकांशी काटकोण करतात तेव्हा त्या रेषांना गणितीय भाषेत कोणत्या रेषा म्हणतात ?
उत्तर : लंबरेषा
36एका आयताकृती भूखंडाची लांबी 24 मीटर व रुंदी 20 मीटर असल्यास त्या भूखंडाचे क्षेत्रफळ किती ?
उत्तर : 480 चौ.मी.
37कंपास पेटीतील कर्कटाचा उपयोग कशासाठी होतो ?
उत्तर : लांबी मोजण्यासाठी
38जर त्रिज्या 13 से.मी. असेल तर वर्तुळाचा व्यास किती ?
उत्तर : 26 से.मी.
39a ही परिमेय संख्या असेल तर a × 0 = ………. ?
उत्तर : 0
40एक वस्तू 25 रु. डझन प्रमाणे 5 डझन घेऊन 175 रुपयास विकली गेली तर किती रुपये नफा किंवा तोटा होईल ?
उत्तर : 50 रु. नफा
41फ्लॅश फोटोग्राफीमध्ये हवेतील कोणत्या वायूचा उपयोग होतो ?
उत्तर : झेनॉन
42‘ओझोन संरक्षण दिन’ कोणत्या दिवशी जगभर साजरा केला जातो ?
उत्तर : 16 सप्टेंबर
43लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात कोणत्या वर्षी भूकंप झाल्याने हजारो लोकांचा मृत्यू झाला होता ?
उत्तर : 1993
44स्थायुरूप पदार्थाचे द्रवरूप न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे या अवस्थांतराला काय म्हणतात ?
उत्तर : संप्लवन
45‘व्हल्कनायझेशन’चा शोध कोणी लावला ?
उत्तर : चार्ल्स गुडइयर
46भारतातील वर्तमानपत्रातील कागद तयार करणारा पहिला कारखाना कोठे स्थापन झाला ?
उत्तर : नेपानगर (मध्य प्रदेश)
47ध्वनीनाद, आवाजाची निर्मिती, प्रसारण आणि त्यांचे परिणाम याबद्दलचे विज्ञान म्हणजे …….. होय ?
उत्तर : ध्वनिशास्त्र
48सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे ?
उत्तर : शुक्र (Venus)
49‘अपोलो 11’ हे यान चंद्रावर कोणत्या देशाने पाठवले ?
उत्तर : अमेरिका
50चंद्र, पृथ्वीपासून किती दूर आहे ?
उत्तर : 384000 कि.मी.
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks – Mahadeep Exam Practice PaperPdf Download 👇
प्रश्नपत्रिकाDownload☝️
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
उत्तरपत्रिका Download ☝️
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे. ‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.