महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 58

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव चाचणी – 58

महादीप परीक्षा सराव चाचणी – 58

50 प्रश्न • इयत्ता 5 वी ते 8 वी
0 / 50
प्रश्न 1
जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?
उत्तर: थ्री गॉर्जेस
प्रश्न 2
“वन वर्ल्ड ट्रेड सेंटर” ही इमारत कोणत्या देशात आहे?
उत्तर: अमेरिका
प्रश्न 3
“जागतिक वसुंधरा दिवस” केव्हा साजरा करतात?
उत्तर: २२ एप्रिल
प्रश्न 4
“ड्युरंड रेषा” कोणत्या दोन देशांशी संबंधित आहे?
उत्तर: पाकिस्तान व अफगाणिस्तान
प्रश्न 5
“ब्राझिलिया” हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे?
उत्तर: ब्राझील
प्रश्न 6
“पेरियार अभयारण्य” कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: केरळ
प्रश्न 7
“दार्जिलिंग” हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: पश्चिम बंगाल
प्रश्न 8
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करते?
उत्तर: राष्ट्रपती
प्रश्न 9
भारताचा पहिला शैक्षणिक उपग्रह कोणता?
उत्तर: एज्युसॅट
प्रश्न 10
आसाम या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता?
उत्तर: बिहू
प्रश्न 11
महात्मा गांधींचा आश्रम असलेले “सेवाग्राम” कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: वर्धा
प्रश्न 12
प्रसिद्ध “लोणार सरोवर” कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: बुलढाणा
प्रश्न 13
“तिल्लारी जलविद्युत प्रकल्प” महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: कोल्हापूर
प्रश्न 14
राज्यात “कृषी दिन” कोणत्या दिवशी साजरा करतात?
उत्तर: १ जुलै
प्रश्न 15
“मुळशी सत्याग्रहाचे” नेतृत्व कोणी केले?
उत्तर: सेनापती बापट
प्रश्न 16
“ध्याय दीपिका” चे कवी कोण?
उत्तर: वामन पंडित
प्रश्न 17
अलंकारिक शब्द लिहा : कर्णाचा अवतार — ______
उत्तर: उदार मनुष्य
प्रश्न 18
वाक्प्रचाराचा अर्थ लिहा : आगीत तेल ओतणे
उत्तर: अधिक भर घालणे
प्रश्न 19
विरुद्धार्थी शब्द लिहा : भरती × ______
उत्तर: ओहोटी
प्रश्न 20
म्हणा पूर्ण करा : साखरेचे खाणार ______
उत्तर: त्याला देव देणार
प्रश्न 21
Complete : Knowledge is ______
उत्तर: power
प्रश्न 22
Write synonym : Good = ______
उत्तर: Nice
प्रश्न 23
Write opposite : First × ______
उत्तर: Last, Final
प्रश्न 24
Write plural : Class = ______
उत्तर: Classes
प्रश्न 25
Which is “National Tree of India”?
उत्तर: Banyan
प्रश्न 26
शिष्यवृत्ती शब्द शुद्ध करून लिहा.
उत्तर: शिष्यवृत्ती
प्रश्न 27
“मुमुक्षू” या शब्दाचा मराठीत योग्य अर्थ कोणता?
उत्तर: मोक्षाची इच्छा असणारा
प्रश्न 28
ना., के., ल, क, श, त, य या अक्षरांपासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द लिहा.
उत्तर: केशकर्तनालय
प्रश्न 29
शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द लिहा : लोकांचे नेतृत्व करणारा
उत्तर: लोकनायक
प्रश्न 30
१ फेब्रुवारी २०१६ रोजी सोमवार होता तर १ फेब्रुवारी २०१० रोजी कोणता वार होता?
उत्तर: सोमवार
प्रश्न 31
जॉन पूर्वेकडे पाठ करून उभा आहे, तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल?
उत्तर: उत्तर
प्रश्न 32
आजोबा व नातू यांच्या वयात ५० वर्षांचा फरक आहे. दोघांचे वय एकूण ७४ असेल तर नातवाचे वय किती?
उत्तर: १२ वर्षे
प्रश्न 33
पाऊस, गारा, वारा, पर्जन्य यापैकी गटात न बसणारा शब्द लिहा.
उत्तर: वारा
प्रश्न 34
९, १९, ३९, ७९, ______
उत्तर: १५९
प्रश्न 35
एका सांकेतिक भाषेत “समाजसेवा” हा शब्द २९४१६ असा लिहितात, “देवघर” हा शब्द ८३५७ असा लिहितात तर याच भाषेत “सेवाघर” हा शब्द कसा लिहाल?
उत्तर: १६५७
प्रश्न 36
द.स.द.शेकडा १० रु. दराने ६००० रु. मुद्दलाचे एका वर्षाचे सरळ व्याज किती होईल?
उत्तर: ६०० रु.
प्रश्न 37
ज्या कोनाचे माप ९०° पेक्षा जास्त व १८०° पेक्षा कमी असते अशा कोणाला काय म्हणतात?
उत्तर: विशाल कोन
प्रश्न 38
२३ कि.ग्रॅम ५०० ग्रॅम + २१ कि.ग्रॅम ७५० ग्रॅम = ?
उत्तर: ४५ कि.ग्रॅम २५० ग्रॅम
प्रश्न 39
नेहालने प्रत्येक १५ फुलांचे ४८ हार केले. पूर्वाने तेवढ्याच फुलांचे ९ हार केले तर पूर्वाच्या प्रत्येक हारात किती फुले असतील?
उत्तर: ८०
प्रश्न 40
प्रतिक ७.३० ला शाळेत आला आणि १.०० वाजता शाळेतून घरी गेला तर तो किती मिनिटे शाळेत राहिला?
उत्तर: ३३० मिनिटे
प्रश्न 41
वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषेला त्या वर्तुळाची ______ म्हणतात.
उत्तर: जीवा
प्रश्न 42
तारेने बनविलेल्या ७ बाजू असलेल्या सप्तकोनाची प्रत्येक बाजू ३.५ से.मीटर आहे. तो तार सरळ केल्यास तिची लांबी किती भरेल?
उत्तर: २४.५ से.मीटर
प्रश्न 43
“क्ष” किरणांचा शोध कोणी लावला?
उत्तर: रॉन्टजेन
प्रश्न 44
आपल्या सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
उत्तर: गुरु
प्रश्न 45
पाण्याच्या उत्कलन बिंदू किती आहे?
उत्तर: १००° C
प्रश्न 46
भारताने पहिली अणुभट्टी अप्सरा कधी सुरू केली?
उत्तर: ४ ऑगस्ट १९५६
प्रश्न 47
सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध कोणी लावला?
उत्तर: जॅन्सन
प्रश्न 48
तुरटीचे रासायनिक नाव काय आहे?
उत्तर: पोटॅशियम अॅल्युमिनियम सल्फेट
प्रश्न 49
उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस कोणता?
उत्तर: २२ डिसेंबर
प्रश्न 50
ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूत पुन्हा जाते, त्या गतीला काय म्हणतात?
उत्तर: नियतकालिक गती

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
'विद्यार्थी' हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे 'महादीप एक संकल्प' हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment