वर्णनात्मक नोंदी इयत्ता चौथी | varnanatmak nondi in marathi
varnanatmak nondi in marathi pdf, varnatmak nondi iyatta chouthi, वर्णनात्मक नोंदी 4 थी
वर्ग ४ थी-विषय निहाय नोंदी
वर्णनात्मक नोंदी 4 थी | वर्णनात्मक नोंदी चौथी:-शालेय मुल्यामापानात ‘सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन‘ करीत असताना मुलांचे सतत व सर्व अंगाने होणारे मूल्यमापन होणे गरजेचे आहे. आपण वर्णनात्मक नोंदी 4 थी सर्व नोंदी अगदी सुटसुटीत उपलब्ध करून देत आहोत.
सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यामापानात प्रामुख दोन घटकांचा समावेश करण्यात आला आहे- आकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन.
सातत्यपूर्ण आकारिक मूल्यमापन करणे म्हणजे अभ्यासक्रमात दिलेल्या निकषांनुसार विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडत आहे किंवा नाही, याची सातत्याने पडताळणी करणारे मूल्यमापन होय, यालाच आपण वर्षभर अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया सुरू असतांना केले जाणारे मूल्यमापन, अध्ययनातील प्रत्येक उद्दिष्ट साध्य करण्यापूर्वीच्या प्रक्रियेची पडताळणी करणारे मूल्यमापन म्हणजे आकारिक मूल्यमापन म्हणतो. यासाठी अकारिक मूल्यमापनाच्या नोंदी नियमित घेणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व आकार घेत आसतांना नियमितपणे करावयाचे हे मूल्यमापन होय. या मध्ये खालील साधन तंत्रांचा वापर केला जातो.
- दैनंदिन निरीक्षण
- तोंडीकाम ( प्रश्नोत्तरे, प्रकट वाचन, भाषण संभाषण, गटचर्चा, मुलाखत इत्यादी. )
- प्रात्यक्षिक / प्रयोग
- उपक्रम / कृती
- प्रकल्प
- चाचणी
- स्वाध्याय
- इतर : ( स्वयं मूल्यमापन,प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन, गटकार्य इत्यादी. )
आम्ही आपणासाठी आकारिक वर्णनात्मक नोंदी इयत्ता पहिली ते आठवी ( विषयनिहाय ) म्हणजे वर्ग १ ली ते ८ वी सर्व विषय वर्णनात्मक नोंदी varnanatmak nondi उपलब्ध करून देत आहोत. आपण त्या पाहून नोंदी करू शकता किव्हा आकारिक मूल्यमापन नोंदी PDF डाऊनलोड करून घेवू शकता.
या पोस्ट च्या खाली आकारिक मूल्यमापन नोंदी PDF स्वरुपात दिल्या आहे. त्या तुम्ही बघू शकता.
वर्णनात्मक नोंदी इयत्ता चौथी मराठी | marathi varnanatmak nondi
वर्ग 4 थी-मराठी
दैनंदिन निरीक्षण नोंदी
1) मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो.
2) ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो.
3) बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो.
4) कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो.
5) प्रभावीपणे प्रकटवाचन करतो.
6) आपले विचार, अनुभव, भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो.
7) आत्मविश्वासपूर्वक बोलतो.
8) दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो.
१) लक्षपूर्वक, एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो.
10) योन्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो.
11) विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो.
12) स्वतःहून प्रश्न विचारतो.
13) कविता तालासुगत साभिनय म्हणतो.
14) नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो.
15) नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो.
16) भाषण, संभाषण, संवाद, चर्चा एकाग्रतेने ऐकतो.
17) विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो.
18) बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो.
19) व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो.
20) दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो.
वर्ग 4 थी-मराठी
अडथळ्यांच्या नोंदी
१) कविता पाठांतर करत नाही.
२) अशुद्ध भाषा वापरतो, सहजपणे भाषण करता येत नाही.
३) बोलीभाषेचे प्रमाण बोलण्यात जास्त आहे.
४) प्रमाण भाषेचा वापर करत नाही.
५) मित्रांचे बोलणे ऐकून घेत नाही.
६) सुचवलेला भाग वाचताना कंटाळा करतो.
(७) प्रश्नाची चुकीच्या पद्धतीने उत्तरे देतो.
८) इतरांशी संवाद साधत नाही.
९) कविताचे कृतीयुक्त गायन करत नाही.
१०) स्वत:च्या भावना व्यक्त करता येत नाही.
११) सुचविलेल्या भागाचे सादरीकरण करता येत नाही.
१२) इतरांशी बोलताना चुकीचे संबोधन वापरतो.
१३) प्रकट वाचन, मौन वाचन करता येत नाही.
१४) दिलेल्या सूचनांचा अर्थ समजून घेत नाही.
१५) वर्णन सांगता येत नाही, लिहिता येत नाही.
१६) एखादी कथा स्वत:च्या भाषेत सांगता येत नाही.
१७) गाणे कविता विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर येत नाही.
१८) वर्णकार्य उपक्रमात सहभागी होत नाही.
१७) गाणे,कविता, विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर येत नाही.
१८) वर्गकार्य उपक्रमात सहभाग होत नाही.
१९) दिलेला स्वाध्याय वेळेत करत नाही.
२०) भाषेच्या वापरात व्याकरणिक चुका खूप करतो.
वर्णनात्मक नोंदी इयत्ता चौथी गणित | ganit varnanatmak nondi
वर्ग 4 थी-गणित
दैनंदिन निरीक्षण नोंदी
1) पाढे पाठांतर करतो.
2) लहान मोठ्या संख्या ओळखतो.
3) संख्याचा क्रम ओळखतो.
4) संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो.
5) बेरीज, वजाबाकी, गुणकार, भागाकार क्रिया समजून घेतो.
6) संख्या वाचन करतो.
7) गुणाकाराने पाढे तयार करतो.
8) संख्या अक्षरी लिहितो.
9) अक्षरी संख्या अंकात मांडतो.
10) संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो.
11) संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो.
12) सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडवितो.
13) संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो.
14) विविध भौमितिक संबोध समजून घेतो.
15) विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो.
16) भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो.
17) गणितीय चिन्हे ओळखतो.
18) चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो.
19) गणितातील सूत्रे समजून घेतो.
20) तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो.
वर्ग 4 थी-गणित
अडथळ्यांच्या नोंदी
१) साधे सोपे हिशोब करता येत नाहीत.
२) संख्यालेखन करताना चुका करतो.
३) संख्या वाचन करताना चुका करतो.
४) भौमितिक आकाराची माहिती सांगता येत नाही.
५) पैशाचे साधे व्यवहार करता येत नाही.
६) सुचवलेला पाढा म्हणता येत नाही.
७) दिलेला पाढा म्हणताना चुका करतो.
८) स्वाध्याय सोडवताना नेहमी चुकीच्या पद्धतीने सोडवतो.
९) गणिती चिन्हाबद्दल चुकीची प्रतिक्रिया देतो.
१०) गणिताचे महत्व व उपयोग सांगता येत नाही.
११) संख्या उलट-सुलट क्रमाने वाचन-लेखन करतो.
१२) सूचनेप्रमाणे कृती करत नाही.
१३) विविध गणितीय संकल्पना मांडता येत नाहीत.
१४) गणिती क्रिया वरील उदाहरणे सोडवताना चुका करतो.
१५) चित्र पाहून त्याचे वर्णन सांगता येत नाही.
१६) दिलेल्या संख्यावरील क्रिया करता येत नाहीत.
१७) सुचवलेला आलेख काढता येत नाही.
१८) स्वाध्याय वेळेवर सोडवत नाही.
१९) सुचवलेल्या संख्याचे वाचन करताना अडखळतो.
२०) दिलेली उदाहरणे सोडवता येत नाहीत.
वर्णनात्मक नोंदी इयत्ता चौथी इंग्रजी | ingraji varnanatmak nondi
वर्ग 4 थी-इंग्रजी
दैनंदिन निरीक्षण नोंदी
1. Collect and write idioms.
2. Copy and understand the various formats of writing.
3. Build a story using a given outline.
4. Collect and create slogans.
5. Write bio-data for self.
6. Write answers to question on their daily routine.
7. Describe objects and personalities in writing.
8. Complete gapped dialogues.
9. Write natural and meaningful dialogues.
10. Write questions for an interview.
11. Write precise composition.
12. Write a diary on their daily routine.
13. Compare a program.
14. Listen to announcement and follow them.
15. Listen and respond appropriately.
16. Listen and locate the stress, intonation, contracted forms and question-tags.
17. Listen and write words, phrase and sentences.
18. Listen and interpret poems.
19. Listen with concentration to get specific information.
20. Listen and understand commentaries.
वर्ग 4 थी-इंग्रजी
अडथळ्यांच्या नोंदी
1. Never Participatng in conversation.
2. Structure of projects is very bad.
3. Sing rhymes in rough tone.
4. Never describe pictures in English.
5. Never try to devlope hand writings.
6. Misguide to other students.
7. He drops hard words while reading.
8. He uses many Marathi words while speaking English.
9. He is unable to participate in conversation.
10. He gives wrong answers.
11. He doesn’t respond in English.
12. He does not use proper words while speaking.
13. He afraids to speak in English.
14. He can’t express his feeling in English.
15. He doesn’t participate in chatting hour.
16. He uses rough language
15. He is not eager to learn new words.
16. He uses rough language.
17. He discourages other student from learning.
18. He can’t reads aloud and carefully.
19. He does not speak English.
20. He is not eager to learn new words.
वर्णनात्मक नोंदी इयत्ता चौथी परिसर अभ्यास | ingraji varnanatmak nondi
वर्ग 4 थी–परिसर अभ्यास
दैनंदिन निरीक्षण नोंदी
१) प्राण्यांच्या प्राथमिक गरजा समजून सांगतो.
२) नागरी जीवनात मिळणाऱ्या सुविधा बाबत जाणतो.
३) प्राथमिक गरजा व संवर्धन याबाबत माहिती सांगतो.
४) नकाशात परिसरातील ठिकाणी विविध भौगोलिक जीवनाचे माहिती देतो.
५) परिसरात घडणाऱ्या बदलांची तात्काळ नोंद घेतो.
६) ज्ञानेंद्रियाची निगा कशी घ्यावी, ते सांगतो.
७) सुचवलेल्या वस्तूची प्रतिकृती तयार करतो.
८) कोणत्या सवयी योग्य ते इतरांना पटवून देतो.
९) स्वतः पडलेले प्रश्न विचारतो.
१०) का घडले? यासारखे प्रश्न विचारतो.
११) विज्ञानातील गमती जमती सांगतो.
१२) वैज्ञानिक बातम्यांचे वाचन करतो.
१३) आरोग्यदायी सवयीचे पालन करतो.
१४) सुचवलेल्या वस्तूची प्रतिकृती तयार करतो.
१५) ऐतिहासिक ठिकाण यांचे जतन करावे याबाबत जाणतो.
१६) दिलेला स्वाध्याय वेळेत सोडवतो.
१७) प्रकल्प तयार करुन सादर करतो.
१८) लक्षपूर्वक ऐकतो, विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देतो.
११) ऐतिहासिक वस्तू चित्र यांचा संग्रह करतो.
२०) सुचविलेली घटना अचूक व स्पष्ट शब्दात सांगतो.
वर्ग 4 थी–परिसर अभ्यास
अडथळ्यांच्या नोंदी
१) नकाशा चुकीच्या पद्धतीने मांडतो.
२) कृतीचा क्रम मागे पुढे सांगतो.
३) विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नाही.
४) सुचवलेल्या घटकाला अनुसरून सादरीकरण करता येत नाही.
५) केलेल्या कृतीचा योग्य क्रम सांगता येत नाही.
६) सार्वजनिक ठिकाणी ठेवायची स्वच्छता सांगता येत नाही.
७) वैज्ञानिक प्रयोग करताना घाबरतो.
८) मित्रांसोबत नीट वागत नाही.
१) एखाद्या प्रसंगी काय करावे ते समजत नाही.
१०) ज्ञानेंद्रियांची निगा घेत नाही.
११) आकृती पाहून प्रयोगाचे नाव सांगता येत नाही.
१२) ऐतिहासिक स्थळाची काळजी घेत नाही.
१३) विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नाही.
१४) प्रायोगिक साहित्याची मांडणी चुकीच्या पद्धतीने करतो.
१५) वर्गकार्यात सक्रिय भाग घेत नाही.
१६) सुचवलेल्या प्रसंगाचे नाट्यीकरण करता येत नाही.
१७) काळानुरूप पडलेला फरक सांगता येत नाही.
१८) परिसरातील ऐतिहासिक स्थळाची माहिती नाही.
१९) इतिहासामुळे बदलते जीवन सांगता येत नाही.
२०) परिसरातील स्थानाविषयी माहिती नाही.
वर्णनात्मक नोंदी इयत्ता चौथी कला | kala varnanatmak nondi
वर्ग 4 थी-कला
दैनंदिन निरीक्षण नोंदी
1) कलात्मक दृष्टीकोन ठेवतो.
2) मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो.
3) चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो.
4) चित्रे सुंदर काढतो.
5) प्रमाणबद्ध रेखाटन करतो.
6) मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो.
7) रंगाच्या छटातील फरक ओळखतो.
8) चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो.
9) चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो.
10) कलेचे विविध प्रकार समजून घेतो.
11) विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो.
12) कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो.
13) दिलेल्या कृतीनुसार मातीकाम करून वस्तू बनवतो.
14) मातीपासून विविध आकार बनवितो.
15) स्वनिर्मितीतून आनंद मिळवितो.
16) नृत्य, नाट्य व गायन मध्ये सहभाग घेतो.
17) घेतलेल्या विविध उपक्रमात सक्रिय भाग घेतो.
18) सुचविलेल्या विषयावर अतिशय सुंदर रेखाटन काढतो.
19) दिलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करतो.
20) वर्ग सजावट करतो.
वर्ग 4 थी-कला
अडथळ्यांच्या नोंदी
१) सुचवलेले गीत गायन करत नाही.
२) चित्र काढण्यास कंटाळा करतो.
३) कृतीचा सराव मन लावून करत नाही.
४) मातीकामात जराही श्रम घेत नाही.
५) इतरांना कृती कताना मदत करत नाही.
६) सुचवलेल्या कृती चूकीच्या पध्दतीने करतो.
(७) चित्राचे विविध प्रकार ओळखता येत नाहीत.
८) वर्ग सजावटीत भाग घेत नाही.
१) कागद काम करत नाही, चुका करतो.
१०) चिञ रंगवताना रंग व वेळ वाया घालवतो.
११) सूचवलेल्या नृत्याचा प्रकार करता येत नाही.
१२) सुचवलेल्या प्रसंगाचे माढरीकरण करता येत नाही.
१३) दिलेले संवाद व्यवस्थित म्हणत नाही.
१४) सुचवलेले कृतीचे सादरीकरण करता येत नाही.
१५) सुचवलेल्या चित्रावर रंगकाम करता येत नाही.
१६) कृतीचा सराव निष्काळजीपणे करतो.
१७) कागद काम करताना कागदाचा वापर नीट करत नाही.
१८) कृतीचा सराव निष्काळजीपणे करतो.
१९) गीत गायन करताना हवभाव हालचाली करत नाही.
२०) आत्मविश्वासाचा अभाव आढळतो.
वर्णनात्मक नोंदी इयत्ता चौथी कार्यानुभव | karyanubhav varnanatmak nondi
वर्ग 4 थी-कार्यानुभव
दैनंदिन निरीक्षण नोंदी
१) विविध मुल्यांची जोपासना करतो.
२) उपक्रम आवडीने करतो.
३) उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो.
४) तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन माडतो.
५) परिसर स्वच्छ ठेवतो.
६) नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो.
७) कृती करताना नवीन तंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो.
८) आधुनिक साधनाचा वापर करतो.
९) व्यावसायिक कौशल्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो.
१०) चर्चेत सहभागी होतो.
११) समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो.
१२) कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो.
१३) साहित्य साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो.
१४) शिक्षकांचे सहकार्य घेतो.
१५) प्रकल्पात स्वत:हून सहभाग घेऊन पूर्ण करतो.
१६) समाजशील वर्तन करतो.
१७) ज्ञानाचा उपयोग उपजीविकेसाठी करतो.
१८) समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्न करतो.
१९) दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो.
२०) आत्मविश्वासाने कृती करतो.
वर्ग 4 थी-कार्यानुभव
अडथळ्यांच्या नोंदी
१) दिलेल्या साहित्याचा योग्य वापर करत नाही.
२) कृती करताना स्वत:चे मत सांगत नाही.
३) कृती केल्यानंतर स्वत:चे मत सादर करत नाही.
४) कृती पूर्ण झाल्यावर स्वत:चे मत सांगता येत नाही.
५) सुचवलेल्या वस्तूच्या प्रतिकृती बनवता येत नाहीत.
६) दिलेल्या साहित्याचा योग्य वापर करता येत नाही.
७) दिलेल्या साहित्याचा वापर चुकीच्या पद्धतीने करतो.
८) शालेय सजावटीत वर्ग सजावटीत भाग घेत नाही.
९) मातीपासून वस्तू बनवता येत नाही.
१०) पाण्याचा अपव्यय करतो.
११) वर्ग कार्यात आवडीने सहभागी होत नाही.
१२) दिलेल्या घटनेचा अनुभव घेता येत नाही.
१३) कृतीचा क्रम सांगता येत नाही.
१४) अतिशय निष्काळजीपणे कृती करतो.
१५) मूलभूत गरजांची माहिती नाही.
१६) परिसरातील वनस्पतीची पाने व फांद्या तोडतो.
१७) काम श्रम करणे, कमीपणाचे वाटते.
१८) कामचुकारपणा व कामाचा आळस करतो.
१९)स्वत:ची जबाबदारी घेत नाही.
२०) उपक्रमात भाग घेण्यास कंटाळा करतो.
वर्णनात्मक नोंदी इयत्ता चौथी शारीरिक शिक्षण | PT varnanatmak nondi
वर्ग 4 थी-शारीरिक शिक्षण
दैनंदिन निरीक्षण नोंदी
1) मैदानाची स्वच्छता करतो.
2) आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो.
3) तालबद्ध हालचाली करतो.
4) गटाचे नेतृत्व करतो.
5) खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो.
6) गटातील सहकऱ्यांना मार्गदर्शन करतो.
7) इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो.
8) विविध खेळात व स्पर्धेत भाग घेती.
9) शिस्तीचे पालन करतो.
10) मैदानावरील विविध कामे आवडीने करतो.
11) क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो.
12) आरोग्यदायी सवयीचे पालन करतो.
13) मनोरंजक खेळात सहभागी होतो.
14) शारीरिक श्रम आनंदाने करतो.
15) खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो.
16) जय पराजय आनंदाने स्वीकारतो.
17) पंचाच्या निर्णयाचे आदर करतो.
18) खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो.
19) श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो.
20) खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो.
वर्ग 4 थी-शारीरिक शिक्षण
अडथळ्यांच्या नोंदी
१) नखे व केस वेळेवर काढत नाही.
२) खेळाच्या तासाला वर्गात असतो.
३) मैदानी खेळात सहभागी होत नाही.
४) मुले खेळताना नेहमीच बघत राहतो.
५) खेळायला नेहमी कंटाळा करतो.
६) वैयक्तिक स्वच्छता ठेवत नाही.
७) क्रीडांगणावर उगाच कचरा करतो.
८) सुचवलेली कृती क्रमाने करत नाही.
९) खेळाचे महत्त्व समजून घेत नाही.
१०) स्वच्छतेचे महत्त्व जाणवत नाही.
११) वाईट सवयी च्या आहारी लवकर पडतो.
१२) वाईट सवयी काय आहेत, याविषयी सांगता येत नाही.
१३) फक्त आवडत्या खेळातच भाग घेतो.
१४) इतर खेळात सहभागी होत नाही.
१५) वैयक्तिक शर्यतींमध्ये भाग घेत नाही.
१६) सांघिक खेळाचा खोटेपणाने खेळतो.
१७) खेळात सहकार्य वृत्ती जोपासत नाही.
१८) आवडत्या खेळाविषयी माहिती सांगता येत नाही.
१९) सुचवलेला व्यायाम प्रकार योग्यरित्या करता येत नाही.
२०) चांगल्या सवयीचे पालन करत नाही.
विशेष प्रगती नोंदी इयत्ता चौथी| vishesh pragati nondi in marathi
वर्ग 4 थी-विशेष प्रगती नोंदी
1) आत्मविश्वासाने काम करतो.
2) आपली मते ठामपणे मांडतो.
3) आपली मते मुद्देसूद, थोडक्यात मांडतो.
4) कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो.
5) कोणतेही काम एकाग्रतेने करतो.
6) इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो.
7) जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो.
8) वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो.
9) शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो.
10) स्वतःच्या आवडी निवडी बाबत स्पष्टता आहे.
11) नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो.
12) स्वतःची चूक मोकळेपणाने मान्य करतो.
13) गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो.
14) भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो.
15) शाळेच्या नियमाचे पालन करतो.
16) मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो.
17) मित्रांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो.
18) वर्ग, शाळा, परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो.
19)वर्गाचे चांगल्या प्रकारे नेतृत्व करतो.
20) धाडसी वृत्ती दिसून येते.
विशेष प्रगती आवड छंद नोंदी | आवड छंदद वर्णनात्मक नोंदी
वर्ग 4 थी-आवड,छंद इ नोंदी
१) चित्रे काढतो.
२) गीत गायन.
३) संग्रह करणे.
४) प्रतिकृती बनवणे.
५) चित्रे काढणे.
६) गोष्ट सांगतो.
७) गाणी-कविता म्हणतो.
८) नृत्य, अभिनय, नाट्यीकरण करतो.
१) खेळात सहभागी होती.
१०) अवांतर वाचन करणे.
११) कार्यानुभवातील वस्तु बनवितो.
१२) कथा, कविता, संवाद लेखन करतो.
१३) नक्षीकाम करणे.
१४) खो खो खेळणे.
१५) क्रिकेट खेळणे.
१६) नक्षिकाम करणे.
१७) संगीत ऐकणे.
१८) नृत्य करणे.
१९) उपक्रम तयार करणे.
२०) सायकल खेळणे.
सुधारणा आवश्यक नोंदी | sudharna avashyak nondi
वर्ग 4 थी-सुधारणा आवश्यक
1 नियमित शुद्धलेखन लिहावे.
2 अभ्यासात सातत्य असावे.
3 अवांतर वाचन करावे.
4 शब्दांचे पाठांतर करावे.
5 शब्दसंग्रह करावा.
6 बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे.
7 वाचन, लेखनाकडे लक्ष द्यावे.
8 गुणाकारात मांडणी योग्य करावी.
9 खेळात सहभागी व्हावे.
10 गणित विषयाकडे लक्ष द्यावे.
11 परिपाठात सहभाग घ्यावा.
12 विज्ञानाचे प्रयोग करून पहावे.
13 हिंदी भाषेचा उपयोग करावे.
14 शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा.
15 गटचर्चेत सहभाग घ्यावा.
16 चित्रकलेचा छंद जोपासावा.
17 वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे.
18 संगणकाचा वापर करावा.
19 प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा. 20 संवाद कौशल्य वाढवावे.
व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी | vyaktimatva vikas nondi in marathi
वर्ग 4 थी-व्यक्तिमत्व गुणविशेष
१) कोणतेही काम एकाग्रतेने करतो. |
२) आपली मते ठामपणे मांडतो. |
3) शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो. |
४) स्वत:च्या आवडी – निवडी बाबत स्पष्टता आहे. |
५) आत्मविश्वासाने काम करतो . |
६) स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो. |
७) गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो. |
८) दररोज शाळेत उपस्थित राहतो. |
९) कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो. |
१०) धाडसी वृत्ती दिसून येते. |
११) इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो. |
१२) जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो. |
१३) वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो. |
१४) भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो. |
१५) वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. |
१६) दररोज शाळेत उपस्थित राहतो. |
१७) मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो. |
१८) वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. |
१९) मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो. |
२०) आपली मते ठामपणे मांडतो. |
वर्णनात्मक नोंदी pdf | वर्णनात्मक नोंदी दुसरी pdf | वर्णनात्मक नोंदी pdf इयत्ता चौथी | आकारिक मूल्यमापन नोंदी PDF
varnatmak nondi in marathi pdf download करा 👇