वर्णनात्मक नोंदी इयत्ता तिसरी | varnanatmak nondi in marathi
varnanatmak nondi in marathi pdf, varnatmak nondi iyatta tisari, वर्णनात्मक नोंदी 3 री
वर्ग ३ री-विषय निहाय नोंदी
वर्णनात्मक नोंदी 3 री | वर्णनात्मक नोंदी तिसरी:-शालेय मुल्यामापानात ‘सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन‘ करीत असताना मुलांचे सतत व सर्व अंगाने होणारे मूल्यमापन होणे गरजेचे आहे. आपण वर्णनात्मक नोंदी 3 री सर्व नोंदी अगदी सुटसुटीत उपलब्ध करून देत आहोत.
सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यामापानात प्रामुख दोन घटकांचा समावेश करण्यात आला आहे- आकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन.
सातत्यपूर्ण आकारिक मूल्यमापन करणे म्हणजे अभ्यासक्रमात दिलेल्या निकषांनुसार विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडत आहे किंवा नाही, याची सातत्याने पडताळणी करणारे मूल्यमापन होय, यालाच आपण वर्षभर अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया सुरू असतांना केले जाणारे मूल्यमापन, अध्ययनातील प्रत्येक उद्दिष्ट साध्य करण्यापूर्वीच्या प्रक्रियेची पडताळणी करणारे मूल्यमापन म्हणजे आकारिक मूल्यमापन म्हणतो. यासाठी अकारिक मूल्यमापनाच्या नोंदी नियमित घेणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व आकार घेत आसतांना नियमितपणे करावयाचे हे मूल्यमापन होय. या मध्ये खालील साधन तंत्रांचा वापर केला जातो.
- दैनंदिन निरीक्षण
- तोंडीकाम ( प्रश्नोत्तरे, प्रकट वाचन, भाषण संभाषण, गटचर्चा, मुलाखत इत्यादी. )
- प्रात्यक्षिक / प्रयोग
- उपक्रम / कृती
- प्रकल्प
- चाचणी
- स्वाध्याय
- इतर : ( स्वयं मूल्यमापन,प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन, गटकार्य इत्यादी. )
आम्ही आपणासाठी आकारिक वर्णनात्मक नोंदी इयत्ता पहिली ते आठवी ( विषयनिहाय ) म्हणजे वर्ग १ ली ते ८ वी सर्व विषय वर्णनात्मक नोंदी varnanatmak nondi उपलब्ध करून देत आहोत. आपण त्या पाहून नोंदी करू शकता किव्हा आकारिक मूल्यमापन नोंदी PDF डाऊनलोड करून घेवू शकता.
या पोस्ट च्या खाली आकारिक मूल्यमापन नोंदी PDF स्वरुपात दिल्या आहे. त्या तुम्ही बघू शकता.
वर्णनात्मक नोंदी इयत्ता तिसरी मराठी | marathi varnanatmak nondi
वर्ग 3 री-मराठी
दैनंदिन निरीक्षण नोंदी
१. बोलताना शब्द व वाक्य अचूक व समर्पक वापरतो.
२. भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो.
३. उदाहरणे पटवून देताना म्हणींचा वापर करतो.
४. अभ्यासक्रमातील नवीन शब्दांचा वापर करून बोलतो.
५. इतरांनी प्रमाण भाषा वापरावी यासाठी प्रयत्न करतो.
६ बोलीभाषेत प्रमाणभाषेचा वापर करतो.
७. बोलताना योग्य वयाप्रमाणे संबोधन करतो.
८. प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो.
९. स्वतःच्या गरजा योग्य भाषेत सांगतो.
१०. मोठ्यांशी बोलताना फार नम्रतेने बोलतो.
११. एखाद्या बाबींचे कारण सुंदर रीतीने पटवून देतो.
१२ सुचविलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहितो.
१३. स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करतो.
१४. स्वतःच्या कथा सुंदर रीतीने सांगतो.
१५. स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो.
१६. कुठे काय बोलावे, काय बोलू नये, याचे अचूक ज्ञान आहे.
१७. इतरांचे न पटलेले मत सौम्य भाषत सांगतो.
१८.बोलण्याच्या सुंदर शैलीमुळे सर्वाना खूप आवडतो.
१९. संवाद साधण्याचे कौशल्य उत्तम आहे.
२०. बोलण्याची भाषा लाघवी व सुंदर आहे.
वर्ग 3 री-मराठी
अडथळ्यांच्या नोंदी
१. इतरांशी बोलताना चुकीचे संबोधन करतो.
२. बोलताना शब्दावर तारतम्य ठेवत नाही.
३. सहजपणे भाषण करता येत नाही.
४. बोलताना उगाचच अंगविक्षेप करतो.
५. बोलीभाषेत प्रमाणभाषा वापरत नाही.
६. स्वतः खूपच अशुद्ध बोलतो.
७ मोठ्यांचा मान ठेवताना चुकीचे शब्द वापरतो.
८. स्वतःच्या गरजा योग्य भाषेत मांडता येत नाही.
९. प्रश्नांची चुकीच्या पद्धतीने उत्तरे देतो.
१०. योग्य भाषेत कारणे सांगता येत नाही.
११. इतरांचे बोलणे ऐकून घेत नाही.
१२. इतरांशी संवाद साधू शकत नाही.
१३. लिखाणाची भाषा अगदीच अशुद्ध वापरतो.
१४. वर्णन सांगता येते, पण लिहिता येत नाही.
१५. कोणाला,कुठे ,केव्हा, काय बोलावे, हे कळत नाही.
१६. शब्द व वाक्य यांचा चुकीचा वापर करतो.
१७. भाषेच्या वापरात खूप व्याकरणीय चुका करतो.
१८. स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नाही.
१९. इतरांच्या मताबाबत खिल्ली उडवितो.
२०. बोलण्याची भाषा राकट आहे.
वर्णनात्मक नोंदी इयत्ता तिसरी गणित | ganit varnanatmak nondi
वर्ग 3 री-गणित
दैनंदिन निरीक्षण नोंदी
१. परिसरातील भौमितिक आकार सांगतो.
२. विविध प्रकारच्या संख्या लिहितो.
३. गणिती स्वाध्याय सोडवतो.
४. भौमितिक आकृत्या व नावे अचूक सांगतो.
५. विविध प्रकारच्या संख्या ओळखून सांगतो.
६. मापनाची विविध परिमाणे व उपयोग सांगतो.
७. संख्यांचे क्रम अचूकपणे ठरवतो.
८. संख्यांची अगदी योग्य तुलना करतो.
९. दैनदिन जीवनातील घटनांचा गणितीय दृष्टीकोनातून विचार करतो.
१०. संख्यांची ओळख व नामे अचूकपणे सांगता येतात.
११. गणिताचे व्यवहारिक जीवनातील उपयोग सांगतो.
१२. गणिताचे व्यवहारिक जीवनातील महत्व जाणतो.
१३. प्रत्येक गोष्टीमागे गणित आहे हे समजून सांगतो.
१४. दैनंदिन जीवनातील हिशोबाची गणिते अचूक सोडवतो.
१५. संख्यावरील क्रिया जलद व सफाईने करतो.
१६. हिशोब ठेवण्यात सर्वाना मदत करतो.
१७. संख्यातील प्रत्येक स्थान व किंमत सांगतो.
१८. संख्या कशा तयार होतात ,ते स्पष्ट करतो.
१९. आकृत्यांची नावे व ओळख आहे.
२०. विविध आकृत्या जलद गतीने काढतो.
वर्ग 3 री-गणित
अडथळ्यांच्या नोंदी
१. संख्यांचे वाचन करता येत नाही.
२. रुपये पैशाचे साधे व्यवहार करता येत नाहीत.
३. संख्या लेखन करता येत नाही.
४. स्वाधय नेहमीच चुकीच्या पद्धतीने सोडवितो.
५. गणिती चीन्हाबाबत चुकीची प्रतिकिया देतो.
६. दैनंदिन व्यवहारात गणन क्रिया चुकवितो.
७. गणितीय दृष्टीकोनातून विचार करत नाही.
८. गणिताचे महत्व व उपयोग समजत नाही.
९. साधी सोपी संख्यावरील क्रिया चुकीच्या करतो.
१०. भौमितिक आकारांची माहिती नाही.
११. मापनाची परिमाणे व उपयोग समजत नाही.
१२. साधे सोपे हिशोब करता येत नाही.
१३. आकृत्या काढताना खूपच गोंधळतो.
१४. सूचनेप्रमाणे परंतु चुकीच्या कृती करतो.
१५. संख्या उलट सुलट क्रमाने सांगतो.
१६. सुचविलेले पाढे म्हणता येत नाही.
१७. पाठ्यांशातील विचारलेले सूत्र व क्रम सांगता येत नाही.
१८. सुचविलेल्या उदाहरणांची रीत सांगता येत नाही.
१९. सुचविलेल्या उदाहरणांची रीत व क्रम चुकीचा सांगतो.
२०. सुचविलेले पाढे म्हणताना चुकवितो.
वर्णनात्मक नोंदी इयत्ता तिसरी इंग्रजी | ingraji varnanatmak nondi
वर्ग 3 री-इंग्रजी
दैनंदिन निरीक्षण नोंदी
1. Listen and say.
2.Listen and classify.
3. Follow instructions, commands and requests.
4. Listen and sequence the events.
5. Listen and repeat as per model.
6. Listen and identify the picture/objects.
7. Listen and learn new words/phrases related to various professions.
8. Listen to rhymes / songs .poems and follow the beat.
9. listen and do/act.
10. Listen and note the characteristics of spoken.
11. Follow the chain of instructions.
12. Listen to material with the help of audio and video devices.
13. Listen and guess the contextual meaning.
14. Repeat words, phrases, sentences as per model.
15. Narrate a story with pictures I key words I with verbal guideline, on their own.
16. Interact among themselves.
17. Speak about a given topic for a given duration.
18. Express needs, demands, feelings, opinions and ideas.
19. Speak about themselves / their surroundings / relatives /family/hobbies, etc.
20. Answer questions in appropriate words, phrases and sentences.
वर्ग 3 री-इंग्रजी
अडथळ्यांच्या नोंदी
1. He do not listen anyone.
2. He can’t talk with good rhythm.
3. He use wrong speech while conversation.
4. He use wrong words while elders respects.
5. He can’t tell his needs in correct words.
6. He tells answer of questions with wrong method.
7. He can’t tell reasons of correct language.
8. He talk with impurity words.
9. He do mistakes in writing.
10. He describe points, but can’t write it.
11. He can’t expression his emotions.
12. He pronounce words, sentences with wrong method..
13. He can’t complete lines of poem.
14. He can’t make questions.
15. He can’t understanding meaning of instructions.
16. He don’t follow the instructions.
17. He stumble in reading sentences.
18. He tell wrong meaning of sentences.
19. He tell suggested part in wrong method.
20. He don’t listen stories carefully.
वर्णनात्मक नोंदी इयत्ता तिसरी परिसर अभ्यास | parisar abhyas varnanatmak nondi
वर्ग 3 री–परिसर अभ्यास
दैनंदिन निरीक्षण नोंदी
१. सर्व प्राणिमात्रांच्या प्रामाणिक गरजा समजून घेतो.
२. प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासु व निरिक्षणवादी वृत्तीने बघतो.
३. केव्हा काय करणे योग्य / अयोग्य इतरांना व स्वतःला सांगतो.
४. परिसरातील घडणाऱ्या बदलांची तात्काळ नोंद घेतो.
५. प्राणीमात्रासंबंधाने विविध प्रश्न विचारतो.
६. सेल च्या आधारे पंखा तयार करतो.
७. वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो.
८. विज्ञान प्रदर्शनीत भाग घेण्यासाठी साहित्य तयार करतो.
९. ज्ञानेंद्रियांची स्वच्छता गरज व महत्व जाणतो.
१०. मोबाईल कसा काम करतो, याबाबत प्रयोग करून सांगतो.
११. कोणत्या सवयी योग्य / अयोग्य इतरांना पटवून देतो.
१२. वैज्ञानिक दृष्टीकोनातून घडणाऱ्या बदलाबाबत विचारतो.
१३. विविध छोटेखानी प्रयोग स्वतः करून बगतो.
१४. स्वतःला पडलेले प्रश्न विचारतो.
१५. विज्ञानाचे चमत्कार या संदर्भाने माहिती घेतो.
१६. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्नशील असतो.
१७.का घडले असेल? या सारखे प्रश्न विचारतो.
१८. विज्ञानासंदर्भाने स्वतःच्या कल्पना मांडतो.
१९. विविध ऋतू बाबत सखोल व अभ्यासू माहिती ठेवतो.
२०. आरोग्यदायी सवयींचे पालन करतो.
वर्ग 3 री–परिसर अभ्यास
अडथळ्यांच्या नोंदी
१. अस्वच्छ व घाणेरडे राहणीमान ठेवतो.
२. आरोग्यदायी सवयीचे पालन करत नाही.
३. आजारपणात मांत्रिक / देव यांना प्राधान्य देतो.
४. परिसरात घडनाऱ्या बदलाबाबत माहिती ठेवत नाही.
५. घडलेल्या घटनेबाबत खुळचट कल्पना मांडतो.
६. इतरांनी मांडलेले वैज्ञानिक विचार धुडकावून लावतो.
७. ज्ञानेन्द्रीयाची स्वछता ठेवत नाही.
८. विज्ञानाबाबत कोणताही प्रश्न कधीच विचारत नाही.
९. कोणत्याही गोष्टीचे कारण जाणून घेत नाही.
१०. जादूटोणा, मांत्रिक याकडे जास्त आकर्षित होतो.
११. अंधश्रद्धेवर जास्त विश्वास ठेवतो.
१२. भूत यासारख्या कल्पनेकडे जास्त आकर्षित होतो.
१३. विज्ञान प्रयोग करताना खूपच घाबरतो.
१४. केव्हा काय करावे काय नाही समजत नाही.
१५. परिसरातील सजीवा बाबत माहिती नाही.
१६. सुचविलेला पाठ्यभाग विषय अनुषंगाने विविध उपयोग
सांगता येत नाही.
१७. जादूटोणावर विश्वास ठेवतो.
१८. इतरांना आजारपणात डॉक्टरकडे न जाण्याचा सल्ला देतो.
१९. सुचविलेल्या घटनेमागची कारणे चुकीची सांगतो. २०. अमावस्या /पौर्णिमा घातक आहेत, असा समज पसरवितो.
वर्णनात्मक नोंदी इयत्ता तिसरी कला | kala varnanatmak nondi
वर्ग 3 री-कला
दैनंदिन निरीक्षण नोंदी
१. सर्वांना उपयोगी वस्तूबाबत माहिती देतो.
२. आकर्षक चित्र काढतो.
३. स्वतः नेतृत्व करून इतरांना मदत व मार्गदर्शन करतो.
४. वस्तूविषयीचे योग्य विश्लेषण व वर्गीकरण करतो.
५. वर्ग सजावटीसाठी नेहमी प्रयत्नशील राहतो.
६. नृत्याची आवड आहे. सुंदर नृत्य करतो.
७. चित्रकलेत फारच रुची घेतो.
८. प्रत्येक कार्यक्रमात उपक्रमात स्वतःहून भाग घेतो.
९. हस्ताक्षर खूपच सुंदर मोत्याप्रमाणे ठळक काढतो.
१०. चित्रकलेच्या पर्यटक स्पर्धेत भाग घेतो.
११. योग्य हावभावासह संवाद साधतो.
१२. छोट्या छोट्या अभिनयाच्या गमती करून दाखवितो.
१३. देहबोलीचा खूपच सुंदर रीतीने वापर करतो.
१४. कथा सांगताना पर्यटक भाव अचूक करतो.
१५. कोणतीही कृती अधिक सरस होण्यासाठी मेहनत घेतो.
१६. सराव करताना अगदी रममाण होऊन सराव करतो.
१७. संवादफेकिचे कौशल्य उत्तम आहे.
१८. आवाजात चढउतार ठेऊन बोलतो.
१९. पुस्तकातील गीतांना कवितांना स्वतःच्या चाली लावतो.
२०. पाहिलेल्या चित्रातील नृत्यातील उणीवा सांगतो.
वर्ग 3 री-कला
अडथळ्यांच्या नोंदी
१. जीवनातील कलेचे महत्व जाणत नाही.
२. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत नाही.
३. सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड नाही.
४. मातीकामात जराही रस घेत नाही.
५. गाणे, कविता म्हणताना खूपच लाजतो.
६. नृत्याची कृती करताना फारच लाजतो.
७. कोणताही संवाद एकाच सुरात म्हणतो.
८.कृतीचा सराव निष्काळजीपणे करतो.
९. कृती कशी व का करावी याबाबत संभ्रमात पडतो.
१०. चित्र काढण्याचा खूपच कंटाळा करतो.
११. मातीकाम करताना पाणी व माती याचे प्रमाण समजत नाही.
१२. कोणत्याही कृतीसाठी अति घाई करतो व पूर्ण कृती बिघडवतो.
१३. नाट्यछटा पाहण्यात काहीच रस नाही.
१४. सुचविलेल्या बाबी व कृती करण्याचा खूपच कंताला करतो.
१५. इतरजन व्यवस्थित कृती करताना त्यांना हसतो.
१६. सुचविलेल्या कामासाठी आवश्यक नसलेले साहित्य
सांगतो.
१७. इतरांना लक्षपूर्वक कृती करू देत नाही.
१७. कागद काम करताना खूप कागद उगाचच वाया घालवितो.
१८. चित्र काढताना खूपच रंग वाया घालवितो.
१९. वर्ग सजावटीत भाग घेत नाही.
२०. इतरांना कृती करताना पाहून चिडवतो व नावे ठेवतो.
वर्णनात्मक नोंदी इयत्ता तिसरी कार्यानुभव | karyanubhav varnanatmak nondi
वर्ग 3 री-कार्यानुभव
दैनंदिन निरीक्षण नोंदी
१. मानवाच्या मुलभूत गरजा कोणत्या माहित ठेवतो.
२. इतरांना उपक्रमात भाग घेण्यासाठी तयार करतो.
३. दैनदिन जीवनातील प्राथमिक गरजा सांगतो.
४. विविध उपक्रमात स्वत:हून भाग घेतो.
५. सुचविलेले प्रत्येक उपक्रम गतीने पूर्ण करतो.
६. उपक्रमातील केलेल्या कृती या लक्षणीय असतात.
७, अचूक व सुंदरता या दोन बाबींमुळे इतरांचे लक्ष खेचून घेतो.
८. पाणी एक महत्वपूर्ण संपत्ती जाणतो.
९. पाण्याच्या संदर्भाने छोटेखानी नाट्य तयार करतो.
१०. नळावरचे भांडण खूपच सुंदररित्या सांगतो.
११. वर्ग सुशोभनासाठी खूपच सुंदर कल्पना वापरतो.
१२. वर्गातील सर्वाना खूप मोलाची मदत करतो.
१३. इतरांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतो.
१४. सुचविलेल्या घटकांबाबत अधिक माहिती गोळा करतो.
१५. परिसरातील नाविन्यपूर्ण रचना संग्रह करतो.
१६. सामाजिक उपक्रमात आवडीने भाग घेतो.
१७. प्रत्येक कृती स्वतःहून करण्याची आवड आहे.
१८. प्रत्येक वर्गमित्राला वाढदिवसाचे भेटकार्ड देतो.
१९. टाकाऊ तून नेहमी काहीतरी उपयोगी वस्तू तयार करतो.
२०. मातीकाम व कागदकामात विशेष रुची आहे.
वर्ग 3 री-कार्यानुभव
अडथळ्यांच्या नोंदी
१. उपक्रमात जरा सुद्धा रुची ठेवत नाही.
२. इतरांच्या तयार केलेल्या वस्तू मोडतो.
३. मुलभूत गरजांची माहिती नाही.
४. परिसरातील आवश्यक घटकाबाबत ज्ञान नाही.
५. पाणी व त्याचे महत्व नाही.
६. परिसरातील वनस्पतीची पाने व फांद्या तोडतो.
७. उपक्रमात भाग घेण्यास खूपच कंटाळा करतो.
८. स्वतः कृती करीत नाही व इतरांना हि करू देत नाही.
९. मानवी जीवनात होणारे अन्नाचे उपयोग सांगता येत नाही.
१०. मानवी जीवनात होणारे वस्त्राचे उपयोग सांगता येत नाही.
११. मानवी जीवनात होणारे निवाऱ्याचे उपयोग सांगता येत नाही.
१२. पाण्याचा खूप अपव्यय करतो.
१३. पाणी पिणे झाल्यावर नळाची तोटी सुरूच ठेवतो.
१४. स्वतःच्या चुकांची जबाबदारी घेत नाही.
१५. इतरांशी मिळून मिसळून सहकार्य करीत नाही.
१६. आळशी स्वभावामुळे इतर मुले गटात होत नाही.
१७. अतिशय निष्काळजीपणे कृती करतो व चुकतो.
१८. श्रम करणे चुकीचे वाटते.
१९. कामचुकारपणा करतो व कामाची टाळाटाळ करतो.
२०. इतरांना हिणवतो.
वर्णनात्मक नोंदी इयत्ता तिसरी शारीरिक शिक्षण | PT varnanatmak nondi
वर्ग 3 री-शारीरिक शिक्षण
दैनंदिन निरीक्षण नोंदी
१. वाईट सवयी व व्यसनापासून स्वतः दूर राहतो.
२. दररोज कोणता तरी एक खेळ खेळतो.
३. नियमित स्वछ व नीटनेटका राहतो.
४. खेळ व विश्रांतीचे महत्व पटवून देतो.
५. चौरस आहार घेण्याबाबत जागरूक राहतो.
६. व्यायामाचे फायदे इतरांना पटवून देतो.
७. आरोग्यदायी जीवनशैलीमुळे आजारी पडत नाही.
८. वाईट सवयी कशा घातक आहेत, इतरांना सांगतो.
९. दररोज नियमितपणे व्यायाम करतो.
१०. विविध एरोबिक्सची कृती स्वयंप्रेरणेने करतो.
११. स्पर्धेच्या वेळी आपल्या गटाचे नेतृत्व करतो.
१२. खिलाडूवृत्तीने खेळ चुरशीने खेळतो.
१३. दररोज प्राणायाम करतो.
१४. दररोज किमान एक तरी आसन करतो.
१५. दररोज रात्री झोपण्यापुर्वी दात घासतो.
१६. नखे व केस नियमित कापतो.
१७. स्वतःच्या पोशाखाबाबत अतिशय दक्ष असतो.
१८. प्रामाणिकपणा व खिलाडू वृत्ती हे महत्वाचे गुण आहेत.
१९. एरोबिक्सचे प्रकार मन लावून करतो.
२०. कोणत्याही खेळात स्वतःहून भाग घेतो.
वर्ग 3 री-शारीरिक शिक्षण
अडथळ्यांच्या नोंदी
१. इतर मुले खेळताना नुसतेच बघत राहतो.
२. खेळाच्या तासाला वर्गातच बसतो.
३. मैदानी खेळत सहभागी होतो.
४. व्यायामाचे महत्व लक्षात घेत नाही व करत नाही.
५. खेळायला चल असे सांगितल्यावर आजारी आहे असे खोटे सांगतो.
६. आसने करावयाचा कंटाळा करतो.
७. वैयक्तिक खेळत कधीच सहभागी होत नाही.
८. खेळ खेळताना अप्रामाणिक राहून भांडण करतो.
९. खेळात सहकार्यवृत्ती व आपसी संबंध जपत नाही.
१०. क्रीडांगणावर उगाचच कचरा करतो.
११. चांगल्या सवयींचे पालन करत नाही.
१२. नखे व केस आकारण वाढवितो.
१३. स्वछतेचे महत्व जाणत नाही.
१४. खेळांची नावे माहिती नाहीत.
१५. वाईट सवय वाईट आहे असे सांगतो ,पण सोडत नाही.
१६. फक्त आवडत्या खेळातच भाग घेतो,इतर खेळात सहभाग सुद्धा घेत नाही.
१७. वैयक्तिक शर्यतीत भाग घेत नाही.
१८. सांघिक खेळात खोटेपणाने खेळतो.
१९. खिलाडूवृत्तीने व प्रामाणिकपणे खेळत नाही. २०. वाईट सवयींच्या आहारी लवकर जातो.
विशेष प्रगती नोंदी इयत्ता तिसरी| vishesh pragati nondi in marathi
वर्ग 3 री-विशेष प्रगती नोंदी
१) वेळेवर अभ्यास पूर्ण करतो.
२) दररोज शाळेत उपस्थित राहतो.
३) शालेय शिस्त आत्मसात करतो.
४) कविता पाठांतर करतो, सुरात गातो.
५) दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करतो.
६) अभ्यासात सातत्य आहे.
(७) वर्गात क्रियाशील असतो.
८) सर्व विषयाचा अभ्यास उत्तम आहे.
९) वर्गात लक्ष देवून ऐकतो.
१०) गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो.
११) अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो.
१२) उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो.
१३) वर्गात नियमित हजर असतो.
१४) शालेय उपक्रमात सहभाग घेतो.
१५) Activity मध्ये सहभाग घेतो.
१६) सांस्कृतिक कार्यात सहभागी होतो.
१७) विविध प्रकारची चित्रे काढतो.
१८) वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो.
१९) गणितातील उदाहरणे अचूक सोडवितो.
२०) अभ्यासात नियमितता आहे.
विशेष प्रगती आवड छंद नोंदी | आवड छंदद वर्णनात्मक नोंदी
वर्ग 3 री-आवड,छंद इ नोंदी
१) चित्रे काढतो.
२) गीत गायन.
३) संग्रह करणे.
४) प्रतिकृती बनवणे.
५) चित्रे काढणे.
६) गोष्ट सांगतो.
७) गाणी-कविता म्हणतो.
८) नृत्य, अभिनय, नाट्यीकरण करतो.
१) खेळात सहभागी होती.
१०) अवांतर वाचन करणे.
११) कार्यानुभवातील वस्तु बनवितो.
१२) कथा, कविता, संवाद लेखन करतो.
१३) नक्षीकाम करणे.
१४) खो खो खेळणे.
१५) क्रिकेट खेळणे.
१६) नक्षिकाम करणे.
१७) संगीत ऐकणे.
१८) नृत्य करणे.
१९) उपक्रम तयार करणे.
२०) सायकल खेळणे.
सुधारणा आवश्यक नोंदी | sudharna avashyak nondi
वर्ग 3 री-सुधारणा आवश्यक
१) नियमित शुद्धलेखन सराव आवश्यक.
२) अभ्यासात सातत्य आवश्यक.
३) संवाद कौशल्य वाढवण्यासाठी सराव आवश्यक.
४) वाचन, लेखनाकडे सराव आवश्यक.
५) गणित विषय संख्यावरील क्रिया सराव आवश्यक.
६) लेखनातील चुका टाळाव्या.
७) मराठी वाचन लेखन सराव आवश्यक,
८) मराठी उच्चर सगव आवश्यक.
९) गटकार्यात सहभाग वाढवणे आवश्यक,
१०) गणितीक्रियाकडे लक्ष देणे आवश्यक.
११) इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे.
१२) उढाहरणे सोडविण्याचा सगव करावा
१३) नियमित अभ्यासाची सवय लावावी.
१४) नियमित उपस्थित राहावे.
१५) जोडाक्षर वाचनाचा सराव करावा.
१६) वाचन व लेखनात सुधारणा करावी.
१७) अक्षर सुधारणे आवश्यक.
१८) दैनंदिन उपस्थितीकडे लक्ष द्यावे.
१९) स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे.
२०) भाषा विषयात प्रगती करावी.
व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी | vyaktimatva vikas nondi in marathi
वर्ग 3 री-व्यक्तिमत्व गुणविशेष
१) कोणतेही काम एकाग्रतेने करतो. |
२) आपली मते ठामपणे मांडतो. |
3) शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो. |
४) स्वत:च्या आवडी – निवडी बाबत स्पष्टता आहे. |
५) आत्मविश्वासाने काम करतो . |
६) स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो. |
७) गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो. |
८) दररोज शाळेत उपस्थित राहतो. |
९) कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो. |
१०) धाडसी वृत्ती दिसून येते. |
११) इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो. |
१२) जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो. |
१३) वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो. |
१४) भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो. |
१५) वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. |
१६) दररोज शाळेत उपस्थित राहतो. |
१७) मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो. |
१८) वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. |
१९) मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो. |
२०) आपली मते ठामपणे मांडतो. |