Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

UDISE Plus Student Pramotion 2024-25 UDISE+ 2024-25 स्टुडन्ट प्रमोशन कसे करावे?

मित्रानो आपल्याला आपल्या शाळेतील UDISE Plus मधील सर्व वर्गातील सर्व विद्यार्थ्याचे 2024-25 साठी पुढील वर्गात प्रमोशन करणे गरजेचे आहे. UDISE+ 2024-25 स्टुडन्ट प्रमोशन कसे करावे? हे प्रमोशन करताना कोणत्या गोष्टीचे काळजी घ्यावी.या संदर्भात या पोस्टमध्ये माहिती घेणार आहोत.

UDISE Plus Student Pramotion 2024-25 कसे करावे या संदर्भात सर्व स्टेप खालील प्रमाणे करा.ज्यामुळे आपले काम अगदी सुलभ होईल.

UDISE+ 2024-25 स्टुडन्ट प्रमोशन करण्यासाठी खालील step by step प्रक्रिया अनुसरून करा.

1) प्रथमतः आपल्या ब्राउझरमध्ये https://udiseplus.gov.in/ असा सर्च द्या.

2) त्यानंतर Login For All Modules ला क्लिक करा.

3) नंतर Students Module मधून आपले राज्य निवडा व GO ला क्लिक करा.

4) त्यानंतर तुमचा User ID व Enter Password या ठिकाणी User ID मध्ये तुमच्या शाळेच यु-डायस क्रमांक व Enter Password मध्ये तुम्ही तयार केलेला पासवर्ड टाकून Enter Captcha टाका व Login ला क्लिक करा.

(किव्हा या https://sdms.udiseplus.gov.in/p0/v1/login?state-id=127 लिंकला क्लिक करून थेट पुढील विन्डो वर जाता येते.)

5) यु-डायस मधील स्टुडन्ट पोर्टल ओपन झाल्यावर सन 2024-25 वर क्लिक करावे.

6) त्यानंतर प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी मध्ये जाऊन प्रोग्रेशन मॉडेलवर GO या बटनावर क्लिक करावे.

7) नंतर ज्या वर्गाचे प्रमोशन करायचे तो वर्ग आणि तुकडी निवडून GO बटनावर क्लिक करावे

8) नंतर आपल्याला आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल त्याच्यामध्ये प्रोग्रेशन स्टेटस मध्ये योग्य पर्याय निवडून, 2023-24 चे % टाकून, विद्यार्थ्यांचे शाळेतील उपस्थित दिवस टाकून, शाळेत शिकत असला किंवा TC दिली असल्यास ते ऑप्शन निवडून तुकडीचे ऑप्शन निवडून UPDATE या बटन वर क्लिक करावे.

अशी ही प्रोसेस शाळेतील सर्व वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी पूर्ण करावी. जे विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत आहे त्यांच्यासाठी STUDY IN SAME SCHOOL हे ऑप्शन निवडावे आणि ज्या शाळांना आपण टीसी दिली आहे त्या विद्यार्थ्यांकडे LEFT SCHOOL WITH TC/WITHOUT TC हे ऑप्शन निवडावे.

(टीप:-सदर प्रक्रिया ही सर्व शाळांनी दिनांक 12 जून 2024 पर्यंत 100% पूर्ण करणे गरजेचे आहे..)

महत्वपूर्ण लिंक-

UDISE + सर्व मोड्यूल्स ऑफीसीयल साईट- https://udiseplus.gov.in/

UDISE +महाराष्ट्र राज्य स्टुडन्ट पोर्टल ऑफीसीयल साईट- https://sdms.udiseplus.gov.in/p0/v1/login?state-id=127

Please enable JavaScript in your browser to complete this form.

Leave a Comment