अबब ! कमाल झाली, गुरुजींनी अवघ्या महिनाभरात सातशे पुस्तके लिहून काढली | Teachers written 700 books within month

By Neha

Published On:

teachers written 700 books
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

अबब ! कमाल झाली, गुरुजींनी अवघ्या महिनाभरात सातशे पुस्तके लिहून काढली.

Teachers written 700 books within month:- आवडीचे काम मिळाले की, कोणीही उत्साहाने मेहनत करतो. त्याचाच प्रत्यय एससीईआरटीच्या एका उपक्रमाच्या निमित्ताने राज्यातील शिक्षणक्षेत्र सध्या घेत आहे. वरिष्ठांनी एक आवाज दिला अन् गुरूजींनी अवघ्या महिनाभरात चक्क सातशे पुस्तके लिहून पूर्ण केली.

पण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने गुरूजींना पुस्तक लिहिण्याचे काम का दिले? तर तेही जाणून घ्या. त्या अनुभवातून मुलांना शिकविण्याची अनोखी हातोटी साधलेली असते. ती हातोटी सर्वांना कळावी अन सर्वच शाळांमध्ये अशा चांगल्या अध्यापन पद्धतींचा अवलंब करता यावा, यासाठी गुरूजींनी आपल्या अनुभवावर आधारित पुस्तक लिहिण्याचे आवाहन ऑगस्टमध्ये करण्यात आले होते.

त्याला उत्तम प्रतिसाद देत राज्यभरातील शिक्षकांनी आपापल्या जिल्हास्तरावरील ‘डायट’कडे सप्टेंबरमध्ये पुस्तके लिहून सोपविली. डायट प्राचार्यांच्या नेतृत्वातील समितीने त्यातील चांगली पुस्तके निवडून एससीईआरटीकडे पाठविली. अशा पद्धतीने राज्यभरातून आलेल्या ६९० पुस्तकांतून उत्तम पुस्तकांची निवड करण्यासाठी एससीईआरटीने ५४ तज्ज्ञांची समिती नेमली. या समितीने ११ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत सर्व पुस्तकांचे परिक्षण केले. प्रत्यक्ष लेखकांनाही बोलावून लेखनामागील त्यांची भूमिका जाणून घेण्यात आली.

राज्यभरातील सदर उपक्रमास भरभरून प्रतिसाद दिला.

खालील शिक्षकांची पुस्तके निवडली

 यवतमाळ : अपर्णा सतपाल सोवळे (शाळा, मालखेड/पुस्तक : विज्ञान गाणी),

स्वप्ना विठ्ठलराव पावडे (शाळा राजूर/पुस्तक दादूचे स्वप्न)

वर्धा : संगीता तपासे (शाळा जुवाडी/पुस्तक: आजोळ)

गडचिरोली : रोहीत खापरे (शाळा कॉजेड/पुस्तक रघू-कथा)

चंद्रपूर : प्रीती विलास जगझाप (शाळा बामणी/पुस्तक वाचनगंध),  

मालती भास्कर सेमले (शाळा मोखाळा/पुस्तक: चला करुया झाडांशी गट्टी)

बुलडाणा : मनोजकुमार उत्तमराय दराडे (शाळा देवखेड/पुस्तक: आधुनिक तंत्रज्ञानाची गोष्ट), पुष्पा लालचंद गुळये (शाळा डोंगरखंदाळा/पुस्तक: नाट्यछटा चिमुकल्यांच्या), संदीप निवृत्ती गवई (शाळा आंधृड/पुस्तक : गावठी खेळ)

अमरावती : छाया सुरेशराव बोहरुपी (शाळा पिंपळखुटा/पुस्तक: कविता राजभाज्यांच्या)

अकोला : मनोज गजानन लेखनार (शाळा राजुरा /पुस्तक: भोवऱ्यातला भुतोबा)

Leave a Comment