Teacher Payment AC Change In Shalarth: शिक्षकांचे वेतन खाते व IFSC कोड DDO-3 बदल

By Neha

Updated On:

Teacher-Payment-Shalarth
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

‍Teacher Payment AC Change In Shalarth: शिक्षकांचे वेतनाचे खाते क्र व IFSC कोड DDO-3 (शिक्षणाधिकारी) लॉगिन वरुण बदल करणे बाबत.

मित्रांनो नमस्कार आपण आजच्या या पोस्टमध्ये बघणार आहोत शिक्षकांच्या पगाराचे खाते क्रमांक व आय.एफ.एस.सी. कोड हे या अगोदर DDO1 (मुख्याध्यापक) लॉगीन वरून अपडेट करून फॉरवर्ड केल्यानंतर DDO2 (गटशिक्षणाधिकारी) यांच्या लॉगिन अपडेट होत होते.

परंतु शिक्षण संचालनालय पुणे यांचे पत्र क्र. शिसंमा/टि-७/शालार्थ/वेतन/ ई-कुबेर/२०२१ दि.०५/०४/२०२४ यांच्या पत्रानुसार माहे एप्रिल २०२४ पासून शिक्षकांचे वेतन हे SBI CMP ऐवजी RBI ( Reserve Bank Of India) द्वारा संचलित E-Kuber प्रणाली मार्फत सुरु झाले आहे.

त्या नुसार शिक्षकांचे वेतनाचे व्हाउचर एंट्री झाल्यानंतर ते बिल जनरेट करण्यापुर्वी या कालावधित सबंधित शिक्षकाने खाते क्रमांक व आय.एफ.एस.सी. कोड बदलविण्याची विनंती केल्यास बँक खाते क्रमांक बदल करण्यात यावा. त्याकरिता सबंधित शिक्षकांचा विनंती अर्ज, बँक पासबुक झेरॉक्स आणि जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बाबतीत गट शिक्षणाधिकारी यांचे पत्रजिल्हा परिषद माध्यमिक शिक्षकांच्या बाबतीत सबंधित मुख्याध्यापक यांचेपत्र प्रत्यक्ष लेखा शाखा (शिक्षण विभाग प्राथमिक) जिल्हा परिषद, यवतमाळ येथे सादर करुण खाते क्रमांक बदल करुण अप्रोबल घेण्यात यावे.


Teacher Payment AC Change In Shalarth:यानतंर एकाही शिक्षकाने जिल्हा कार्यालयाची पुर्वपरवानगी घेतल्या शिवाय आपल्या वेतनाचा बँक खाते क्रमांक व IFSC कोड बदल करु नये. तसेच देयक Forward केल्यानंतर एकाही शिक्षकांनी वेतन अदा होईपर्यंत आपले शाखा बदल करू नये.

याबाबत अधिनस्त सर्व शिक्षकांना आपले स्तरावरून सुचित करण्यात यावे अशा सुचना गटशिक्षणाधिकारी व मुख्याध्यापक माध्यमिक यांना देण्यात आल्या.

वारंवार सुचना देऊनसुद्धा शिक्षक आपले शाखा बदल करत आहेत व त्यामुळे वेतन जमा होण्यास अडचणी होत आहेत. तसेच सदर पत्र डाकेतून किवा व्हाट्सअप पाठविण्यात येउ नये. प्रत्यक्ष लेखा शाखेत सादर करावे.
उपरोक्त सुचनांचे वेतनाचे खाते बदल करणे बाबत काटेकोरपणे पालन करण्यात यावे असे पत्र शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ यांच्याकडून देण्यात आले.

📝 मूळ GR / आदेश :- येथे क्लीक करून पहा

Leave a Comment