स्वामी विवेकानंद जयंती | Swami Vivekanand jayanti | राष्ट्रीय युवा दिन
आदरणीय विचारपीठ, माननीय अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो,
१. भारतमातेचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे.
२. स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता येथे झाला.
३. त्यांचे मूळ नाव नरेंद्र असे होते. आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते तर, वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त होते.
४. त्यांचे वडील वकील होते. आई धार्मिक प्रवृत्तीची होती.
५. आईवडिलांनी त्यांच्यावर बालपणी उत्तम संस्कार केले.
६. विवेकानंद अत्यंत तल्लख बुद्धिमत्तेचे होते.
७. त्यांनी रामकृष्ण परमहंस यांना आपल्या गुरुस्थानी मानले.
८. आपल्या आचरणातून विवेकानंदानी तरुणांसमोर आदर्श ठेवला.
९. म्हणून त्यांचा जन्मदिवस हा ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो.
१०. स्वामी विवेकानंद हे थोर विचारवंत होते.
११. त्यांनी हिंदू धर्मातील कालबाह्य रूढी, परंपरा, चालीरितीवर कठोर टीका केली.
१२. त्यांनी धर्मसुधारणा व समाजसुधारणा यांवर भर दिला.
१३. ते अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या विश्वधर्म परिषदेस उपस्थित होते.
१४. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन ची स्थापना केली.
१५. युवकांना दिलेल्या संदेशात ते म्हणतात ,
“उठा, जागे व्हा आणि आपले ध्येय साध्य झाल्याशिवाय स्वस्थ बसू नका.”
१६. स्वामी विवेकानंदाच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ….जय हिंद, जय भारत….