विद्यार्थ्यांची TC नाकारणाऱ्या शाळांवर होणार आता कडक कारवाई-शिक्षण विभाग
महारष्ट्रातील जिल्हा परिषद व बहुतांश खाजगी शाळा १ जुलैपासून सुरू होणार आहे. या अगोदरच राज्यातील काही खासगी व्यवस्थापनाच्या शाळा १५ जून पासूनच सुरू झाल्या आहे.
खाजगी शाळांची फी परवडत नसतानाही अनेक पालक आपल्या मुलांना या खासगी शाळेमध्ये टाकतात. पालक ऐनवेळी फी झेपत नसल्याने शाळा बदलविण्याचा निर्णय घेतात. परंतु थकीत फी जमा केल्याशिवाय शाळा टीसी देत नाही. दुसरे कारण असे कि प्रत्येक शाळा आपली पटसंख्या टिकविण्यासाठी धडपड करताना दिसून येत आहे.
नवीन शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्याना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जाताना किव्हा शाळा बदलवू इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना जुन्या शाळेतून टीसी काढणे कठीण जात आहे.
अशावेळी टीसी रोखणाऱ्या शाळांवर कारवाईचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. याचाच परिणाम विद्यार्थ्याना TC काढताना अडचणी येत आहे.
अनेक खाजगी इंग्रजी शाळा वेगवेगळ्या कारणातून टीसी रोखून धरण्याचे प्रकार करीत आहे हे शासनाच्या निदर्शनात आले आहे. बरेच ठिकाणी खासगी शाळा फी थकलेल्या कारणांना पुढे करून नाहक पालकांना TC अडवून त्रास देताना दिसून येत आहे.
या दरवर्षी घडणाऱ्या या प्रकाराबाबत यावर्षी शालेय शिक्षण विभागाने कठोर पाऊल उचलेली आहे. Strict action will now be taken against schools that refuse TC to students-Education Department विद्यार्थ्यांची टीसी नाकारणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे तरीही अनेक शाळा शासनाच्या या आदेशाला जुमानत नसल्याचे पालकांमधून बोलले जात आहे.
यापुढे कोणतीही शाळा TC रोखून धरण्याचा प्रकार करीत असल्यास फी किंवा टीसीबाबत तक्रार असल्यास संबंधित पालकांना गटशिक्षणाधिकारी किंवा थेट शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करता येते. याबाबत पालकाने जाहीरपणे तक्रार नोंदविण्याचे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.