शालेय क्रीडा स्पर्धेसाठी लागणारे सर्व Print मटेरियल डाऊनलोड करा
Sport Print Material Download:- शालेय क्रीडा स्पर्धा ह्या विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी आयोजित केल्या जातात. या स्पर्धांचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा भावनेचा विकास करणे, त्यांची शारीरिक क्षमता वाढवणे आणि टीमवर्क, नेतृत्वगुण तसेच प्रतिस्पर्ध्याचा सन्मान करण्याची शिकवण देणे हा असतो.
शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यासाठी विविध नोंदी घेण्यासाठी कागदपत्रांची गरज असते आम्ही आपणासाठी संपूर्ण स्पर्धा घेण्यासाठी लागणारे सर्व Print मटेरियल डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.
शालेय क्रीडा स्पर्धा विषयी थोडक्यात माहिती.
शालेय क्रीडा स्पर्धा खालील विविध स्तरात आयोजित केल्या जातात.
- शालेय/केंद्र स्तर: स्थानिक शाळांमध्ये व शेजारील शाळांमध्ये आयोजन.
- तालुका: तालुका स्तरावर तालुक्यातील शाळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात.
- जिल्हा स्तर: जिल्हा स्तरावर जिल्ह्यातील शाळांच्या स्पर्धाजिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित केल्या जातात.
शालेय क्रीडा स्पर्धांचे प्रकार:–
- व्यक्तिगत क्रीडा प्रकार:
- धावणे (100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर)
- उंच उडी, लांब उडी
- भालाफेक, गोळाफेक
- जलतरण
- सामूहिक क्रीडा प्रकार:
- क्रिकेट, फुटबॉल, हॉकी
- कबड्डी, खो-खो
- व्हॉलीबॉल, बास्केटबॉल
- बौद्धिक क्रीडा प्रकार:
- बुद्धिबळ
- कराटे, तायक्वांदो (मार्शल आर्ट्स)
शालेय क्रीडा स्पर्धेसाठी लागणारे सर्व Print मटेरियल खालील प्रमाणे डाऊनलोड करा.
खेळ गुणपत्रक
खेळ घेण्यासाठी गुणपत्रकाची गरज असते हे खेळ गुणपत्रक A4 किवा Legale पेज वरती प्रिंट काढून घ्यावे. एका पेजवर दोन गुणपत्रक प्रिंट होते.
खेळाडू शपथ
खेळ घेण्यासाठी खेळाडूची शपथ घ्यावयाची असते. आपणासाठी खेळाडूची शपथ pdf स्वरुपात उपलब्ध करून देत आहोत.
पंच शपथ
खेळ घेण्यासाठी पंचांची शपथ घ्यावयाची असते. आपणासाठी पंचांची शपथ pdf स्वरुपात उपलब्ध करून देत आहोत.
कवायत (Show Drill) नोंदणी
खेळ घेण्यासाठी कवायत (शो ड्रील) घेतल्या जातात. शाळांची नोंदणी क्रमानुसार कार्रून घेण्यासाठी हा कागद उपयोगी पडतो. आपणासाठी कवायत (शो ड्रील) नोंदणी pdf स्वरुपात उपलब्ध करून देत आहोत.
कवायत (Show Drill) गुणनोंद पत्रक
खेळ घेण्यासाठी कवायत (शो ड्रील) घेतल्या जातात. या कवयातींची गुणांची नोंदणी परीक्षकाद्वारा केली जाते. आपणासाठी कवायत (शो ड्रील) गुणनोंदपत्रक pdf स्वरुपात उपलब्ध करून देत आहोत.
पंच आदेश
खेळ घेण्यासाठी पंच नेमणे गरजेचे असते. या पंचाची नेमणूक करण्यासाठी पंच आदेश काढावा लागतो. हा पंच आदेश A4 पेज वरती प्रिंट काढून घ्यावे. एका पेजवर दोन पंच आदेश प्रिंट होते.
क्रीडा फी पावती
खेळ घेताना शाळेकडून क्रीडा फी पावती पंच नेमणे गरजेचे असते. क्रीडा फी पावती A4 पेज वरती प्रिंट काढून घ्यावे. एका पेजवर चार क्रीडा फी पावती प्रिंट होते.
शिक्षक उपस्थिती पत्रक
तीन दिवसीय खेळ असल्यास वरील उपस्थिती पत्रक वापरावे.
चार दिवसीय खेळ असल्यास वरील उपस्थिती पत्रक वापरावे.
Vishva lxmi society