स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाईन सराव चाचणी-08 | Scolarship Exam Online practice Test-08
Scolarship Exam Test : स्कॉलरशिप परीक्षा 2024-25 चा online सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाईन सराव चाचणी-08 देत आहोत. Scolarship Exam Online practice Test-08 ही सराव चाचणी 25 प्रश्नांची असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे. परंतु, प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.
स्कॉलरशिप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती की, आपण आपल्या विद्यार्थ्यांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या चाचणीचा सराव करून घ्यावा. अशाच सराव चाचण्या आम्ही आपणासाठी स्कॉलरशिप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.
नक्कीच आपणास या सराव चाचणीचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, हा सराव आपणास कसा वाटला, हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.
1. तीन अंकी सर्वात मोठी विषम व तीन अंकी सर्वात लहान विषम संख्या यांच्यातील फरक किती?
898
2. दोन अंकी सर्वात मोठी मूळ व दोन अंकी सर्वात लहान मूळ संख्येतील फरक किती?
88
3. पुढीलपैकी कोणती क्रिया केल्यानंतर येणारे उत्तर विषम संख्या असेल.
1) दोन विषम संख्यांची बेरीज, 2) दोन विषम संख्यांची वजाबाकी, 3) दोन विषम संख्यांचा गुणाकार, 4) सम व विषम अशा दोन संख्यांचा गुणाकार
3)दोन विषम संख्यांचा गुणाकार
4. ‘क्ष’ ही एक विषम संख्या आहे, तर त्या संख्येनंतर लगेच येणारी पहिली विषम संख्या कोणती ?
1) (क्ष + 1) 2) (क्ष + 2) 3) (थक्ष-2) 4) (+3)
2)(क्ष + 2)
5. 27 नंतर येणारी सातवी सम संख्या कोणती?
40
6. खालील पैकी कोणती संख्या त्रिकोणी आणि चौरस संख्या आहे ?
1) 16 2) 36 3) 21 4) 9
2) 36
7. खालीलपैकी कोणती चौरस संख्या नाही ?
1) 9 2) 21 3) 25 4) 16
2) 21
8. जर पहिली त्रिकोणी संख्या 3 असेल तर क्रमाने येणाऱ्या पाचव्या त्रिकोणी संख्याची दुप्पट किती?
42
9. 1 ते 100 मध्ये सर्वात मोठी सम संख्या कोणती ?
100
10. 1 ते 100 मध्ये सर्वात लहान विषम संख्या कोणती ?
1
11. 1 ते 10 मध्ये विषम संख्या किती ?
5
12. (1,3,5) (2, 4, 6) (2, 3, 4) व (2, 3, 5) या चार गटापैकी कोणत्या गटातील सर्व संख्या मूळ आहेत?
(2, 3, 5)
13. सहा अंकी लहानात लहान सम संख्या व पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या यांच्यामधील फरक किती?
1
14. 1 ते 100 या संख्येतील सर्वांत मोठी जोडमूळ संख्येच्या जोडीतील संख्यांची बेरीज किती ?
144
15. खालीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती नाही?
1) 3, 5 2) 11, 13 3) 15, 17 4) 29, 31
3) 15,17
16.खालीलपैकी कोणती जोडी सहमूळही आहे आणि जोडमूळही आहे?
1) 47, 53 2) 37, 38 3) 59, 61 4) 89, 97
3) 59,61
17. पुढील संख्यापैकी चौरस संख्या कोणती? 4, 10, 14, 6
4
18. पुढील संख्यापैकी त्रिकोणी संख्या कोणती ? 5, 10, 15, 20
10
19. पहिली चौरस संख्या 9 मानली, तर क्रमाने येणारी 5 वी चौरस संख्या कोणती?
64
20. खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यापैकी किती जोड्या सहमूळ संख्यांच्या जोड्या नाहीत?
(9, 12) (15, 22 ) (11, 55) (85, 51)
2 जोड्या
21. 46 नंतर येणारी चौथी विषम संख्या कोणती ?
53
22. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 या संख्यामालेत एकूण किती विषम संख्या आहेत ?
पाच
23. 6, 4, 2, 7, 2, 2, 7, 4, 2, 7, 2, 1 या अंकमालेत 7 नंतर लगेच 2 हा अंक किती वेळा आला आहे?
दोन वेळा
24. पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज पुढीलपैकी कोणती ?
तिसऱ्या संख्येची पाचपट
25. 72, 31, 58, 14, 16 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल ?
31