स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाईन सराव चाचणी-06 | Scolarship Exam Online practice Test-06

By Neha

Published On:

Scholarship-Online-Test-practice-06
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाईन सराव चाचणी-06 | Scolarship Exam Online practice Test-06

Scolarship Exam Test : स्कॉलरशिप परीक्षा 2024-25 चा online सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाईन सराव चाचणी-06 देत आहोत. Scolarship Exam Online practice Test-06 ही सराव चाचणी 25 प्रश्नांची असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे. परंतु, प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.

स्कॉलरशिप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती की, आपण आपल्या विद्यार्थ्यांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या चाचणीचा सराव करून घ्यावा. अशाच सराव चाचण्या आम्ही आपणासाठी स्कॉलरशिप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.

नक्कीच आपणास या सराव चाचणीचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, हा सराव आपणास कसा वाटला, हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.

1. 3, 2, 4, 5, 7, 1 या अंकांचा प्रत्येकी एकदा वापर करून सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या बनवा.      

754321

2. 8, 4, 6, 2, 3 हे यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून लहानात लहान संख्या बनवा.

23468

3. 1 ते 6 या क्रमिक अंकांपैकी कोणतेही 6 अंक प्रत्येकी एकदाच वापरून लहानात लहान संख्या तयार करा.    

123456

4. 4,6,0,3, 2, 7 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून लहानात लहान सहा अंकी संख्या बनवा.

203467

5. 4 ते 9 या क्रमिक अंकाचा प्रत्येकी एकदाच वापर करून तयार होणारी सहा अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती?

987645

6. 1,3,5,2, 7, 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सहा अंकी लहानात लहान सम संख्या कोणती?

135792

7. 2,0,4,6,9, 1 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून सहा अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या बनवा.      

964201

8. 0 ते 9 या क्रमिक अंकांपैकी कोणतेही 6 अंक प्रत्येकी एकदा वापरून सहा अंकी लहानात लहान विषम संख्या तयार करा.

102345

9. 0,1,2,3 हे सर्व अंक वापरून सहा अंकी लहानात लहान सम संख्या तयार करा.

100032

10. 9,0, 3, 4 हे सर्व अंक वापरून सहा अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा. 

999403

11. 0,3, 5, 7, 9 या अंकांचा वापर करून सात अंकी मोठ्यात मोठी पूर्ण शतक संख्या तयार करा.

9975300

12. 9, 5, 4, 6, 1, 2 या अंकांपैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून सहा अंकी लहानात लहान संख्या बनवा.

124569

13. 8, 3, 7, 5, 4, 2 यातील कोणतेही 5 अंक प्रत्येकी एकदाच वापरून मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या बनवा.

87543

14. 1 ते 9 क्रमिक अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून नऊ अंकी लहानात लहान संख्या तयार करा.

123456789

15. 1 ते 7 हे क्रमिक अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सात अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती?

7654321

16. 0 ते 5 या क्रमिक अंकापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी सहा अंकी विषम संख्या तयार करा.

543201

17. 1,8,3,7,5,6 यांपैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी सहा अंकी सम संख्या बनवा.

875316

18. 0, 2, 4, 7, 5, 9 हे अंक वापरून लहानात लहान सहा अंकी सम संख्या तयार करा.

975204

19. 2 ते 9 या क्रमिक अंकांपैकी कोणतेही 6 अंक प्रत्येकी एकदा वापरून सहा अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या बनवा.

986547

20. 4, 0, 3, 5 यातील प्रत्येक अंकाचा वापर करून सहा अंकी लहानात लहान सम संख्या बनवा.

300054

21. 5, 2, 1, 6 हे सर्व अंक वापरून सहा अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या बनवा.

666521

22. 8,9 या दोन अंकांचा वापर करून सात अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या बनवा.

9999989

23. 35777, 35950, 35705, 35999 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास शेवटची संख्या कोणती?  

35705

24. 12642, 85521, 54829, 782899, 352749 या संख्यांचा चढता क्रम लावल्यास तिसऱ्या संख्येतील सहस्त्र स्थानचा अंक कोणता येईल ?

5

25. 224321 > 224021 > 224012 > 112421 जर या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास डावीकडून दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? 

224012

2 thoughts on “स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाईन सराव चाचणी-06 | Scolarship Exam Online practice Test-06”

Leave a Comment