स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाईन सराव चाचणी-05 | Scolarship Exam Online practice Test-05
Scolarship Exam Test : स्कॉलरशिप परीक्षा 2024-25 चा online सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाईन सराव चाचणी-05 देत आहोत. Scolarship Exam Online practice Test-05 ही सराव चाचणी 25 प्रश्नांची असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे. परंतु, प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.
स्कॉलरशिप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती की, आपण आपल्या विद्यार्थ्यांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या चाचणीचा सराव करून घ्यावा. अशाच सराव चाचण्या आम्ही आपणासाठी स्कॉलरशिप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.
नक्कीच आपणास या सराव चाचणीचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, हा सराव आपणास कसा वाटला, हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.
1. 673493 मधील एकक स्थानच्या 3 ची स्थानिक किंमत हजार स्थानच्या 3 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे ?
1000
2. 1 ते 100 मधे, 5 हा अंक किती वेळा येतो ?
20 वेळा
3. दोन अंकी संख्येत 7 हा अंक नसलेल्या संख्या किती ?
72
4.1 ते 100 मधे, एकूण मूळ संख्या किती आहेत ?
25
5.1 ते 100 मधे 6 हा अंक दशक स्थानी किती वेळा आला आहे?
10 वेळा
6. 1 ते 100 मधे 8 हा अंक एककस्थानी किती वेळा आला आहे ?
10 वेळा
7. 1 ते 100 मधे, 1 नसलेल्या संख्या किती ?
80
8. 1 ते 100 मधे, 4 दशकस्थानी आणि 3 एककस्थानी आहेत अशा दोन अंकी संख्या अनुक्रमे किती ?
10, 9
9. 1 ते 100 मधे, एकूण किती वर्गसंख्या आहेत?
10
10. 1 ते 50 मधे अशा किती मूळ संख्या आहेत की ज्यांच्या अंकांची अदलाबदल केली, तरी तयार होणारी संख्या ही मूळ संख्याच राहते ?
3 संख्या
11. 1 ते 100 मधे 1 व 2 हे अंक अनुक्रमे किती वेळा येतात ?
21 व 20 वेळा
12.1 ते 100 मधे 9 हा अंक किती वेळा येतो ?
20 वेळा
13. 6 हा अंक असलेल्या दोन अंकी संख्या किती ?
19 वेळा
14. दोन अंकी संख्यांमध्ये, 7 हा अंक किती वेळा येतो ?
19 वेळा
15. 1 ते 100 मधे, 5 हा अंक असलेल्या दोन अंकी संख्या किती आहेत ?
18
16. 1 ते 100 मधे, 0 असलेल्या संख्या किती ?
10
17. 1 ते 100 मधे, 4 हा दशकस्थानी किती वेळा आला आहे?
10 वेळा
18. 1 ते 100 मधे, 3 एककस्थानी आहे अशा दोन अंकी संख्या किती ?
9 संख्या
19. 1 ते 100 मधे, 5 एककस्थानी आणि 2 दशकस्थानी असलेल्या एकूण संख्या किती?
20
20. 1 ते 100 मध्ये, 2 ते 9 हे सर्व अंक समाविष्ट नाहीत अशा संख्या किती ?
4
21. 1 ते 100 मध्ये, वर्गसंख्या व घनसंख्या नाहीत अशा दोन अंकी संख्या किती ?
82
22. 1 ते 100 मधे, 1 व 0 अंक असणाऱ्या एकूण संख्या किती ?
30
23. 1 ते 100 मधे 1 नसणाऱ्या दोन अंकी संख्या किती ?
72
24. 5 चा वर्ग किती?
25
25.) 81 चे वर्गमूळ किती?
9
नाव सिद्धेश्वर सचिन इंगळे राहणार कावळा