स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाईन सराव चाचणी-04 | Scolarship Exam Online practice Test-04
Scolarship Exam Test : स्कॉलरशिप परीक्षा 2024-25 चा online सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाईन सराव चाचणी-04 देत आहोत. Scolarship Exam Online practice Test-04 ही सराव चाचणी 25 प्रश्नांची असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे. परंतु, प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.
स्कॉलरशिप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती की, आपण आपल्या विद्यार्थ्यांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या चाचणीचा सराव करून घ्यावा. अशाच सराव चाचण्या आम्ही आपणासाठी स्कॉलरशिप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.
नक्कीच आपणास या सराव चाचणीचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, हा सराव आपणास कसा वाटला, हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.
1. 5 दशहजार+22 हजार +8 = ……..?
72008
2. 34,942 मधील 4 या अंकाच्या स्थानिक किंमतींची बेरीज किती ?
4040
3. 14,35,27,809 मधील 9 ची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांतील फरक किती ?
0
4.85,204 मधील दशहजार व दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती ?
0
5.8324 या संख्येमधील हजार व दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किंमतीची बेरीज आणि शतक व एकक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किंमतीची बेरीज या दोघांची एकूण बेरीज किती ?
8324
6……….. या पाच अंकी संख्येत ……..च्या जागी समान अंक असून त्यांच्या सर्वांच्या दर्शनी किंमतीची बेरीज 35 आहे. या संख्येतील हजार व एकक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती ?
6993
7. 3 दशहजार 4 लक्ष+ 27 शतक 5 हजार + 62 दशक = ……?
438320
8.’सात लक्ष सात’ ही संख्या अंकात लिहिताना एक शून्य कमी दिले तर उत्तर कितीने चुकेल ?
630000
9. 34959 मधील 9 च्या स्थानिक किमतीबाबत योग्य विधान कोणते?
(अ) एकक स्थानच्या 9 ची स्थानिक किंमत ही शतक स्थानच्या 9 च्या स्थानिक किमतीच्या 1/100 पट आहे.
(ब) शतक व एकक या दोन्ही स्थानांवरील 9 ची स्थानिक किंमत सारखीच आहे.
(क) शतक व एकक या दोन्ही स्थानांवरील 9 ची दर्शनी किंमत सारखीच आहे.
‘अ’ व ‘क’ योग्य
10. 9342185 मधील 4 व 5 या अंकांच्या स्थानिक किंमतींचा गुणाकार किती?
2 लक्ष
11.5*4*39 मधे * च्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किंमतीमधील फरक 19800 आहे. तर तो अंक कोणता ?
2
12.36,58,408 मधील 6 ची स्थानिक किंमत काय ?
6,00,000
13. 95,40,127 ची योग्य विस्तारीत मांडणी कशी दर्शवता येईल ?
9000000+500000+40000+100+20+7
14. 72,96,984 मध्ये, दर्शनी किंमत व स्थानिक किंमत सारखीच असणारा अंक कोणता ?
4
15. (3×10000) + (9×100) + (5×100000) +(7×1)=…..?
530907
16. 34,07,832 मधील अधोरेखित अंकाच्या स्थानिक व दर्शनी किमतींमधील फरक किती ?
2
17. 400 + 30000 + 2 + 1000 + 900000 = ……….?
931402
18. 57,37,921 मधील ‘7’ या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती ?
707000
19. 45,337 मधील ‘3’ च्या स्थानिक किंमतीमधील फरक किती ?
270
20.5 दशलक्ष 14 लक्ष……..?
64 लक्ष
21. 73230 मधे, अधोरेखित अंकांच्या दर्शनी किंमतींचा गुणाकार किती?
0
22. 89032 ची योग्य विस्तारीत मांडणी खालीलप्रमाणे कोणती ?
30 + 9000 + 80000 + 2
23. ****** या सहा अंकी संख्येतील सर्व अंक समान असून, त्या सर्व अंकांच्या दर्शनी किंमतीची बेरीज 18 आहे. तर शतक व हजार स्थानच्या स्थानिक किंमतींचा गुणाकार किती?
नऊ लक्ष
24. 3 लक्ष + 25 शतक 13 हजार + 9 = ……..?
315509
25.) ऐंशी हजार आठ ही संख्या लिहितांना दोन्ही आठच्यामध्ये एक शून्य जास्त लिहिले गेल्यास तर उत्तर कितीने चुकेल ?
720000