स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाईन सराव चाचणी-03 | Scolarship Exam Online practice Test-03
Scolarship Exam Test : स्कॉलरशिप परीक्षा 2024-25 चा online सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाईन सराव चाचणी-03 देत आहोत. Scolarship Exam Online practice Test-03 ही सराव चाचणी 25 प्रश्नांची असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे. परंतु, प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.
स्कॉलरशिप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती की, आपण आपल्या विद्यार्थ्यांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या चाचणीचा सराव करून घ्यावा. अशाच सराव चाचण्या आम्ही आपणासाठी स्कॉलरशिप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.
नक्कीच आपणास या सराव चाचणीचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, हा सराव आपणास कसा वाटला, हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.
1. बारा लक्ष बाराशे बारा = ……………?
1201212
2.’तीन कोटी सत्याहत्तर लक्ष अकरा हजार सहाशे नव्याण्णव’ या संख्येनंतर लगेच येणारी क्रमिक संख्या कोणती ?
3,77,11,700
3.10,00,000 च्या लगतची मागील क्रमिक संख्या ?
9,99,999
4.प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा आणि अक्षरी लेखन करा.
20,00,021 20,00,020, ….?….. 20,00,018
वीस लक्ष एकोणवीस
5.पंधरा लक्ष + पंधरा हजार + पंधराशे + पंधरा म्हणजे कोणती संख्या ?
15,16,515
6.प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखून तिचे अक्षरी वाचन कसे कराल?
30,01,100 30,01,000 …..?….. 30,00,800
तीस लक्ष नऊशे
7. एका बेटावरील लोकसंख्या 4,16,00,17,318 आहे. ही लोकसंख्या अक्षरी कशी लिहावी ?
चार अब्ज सोळा कोटी सतरा हजार तीनशे अठरा
8. एका सहकारी पतसंस्थेकडे ‘नऊ कोटी चोवीस लक्ष साठ हजार’ रकमेच्या ठेवी जमा आहेत, ही रक्कम अक्षरात लिहा.
9,24,60,000
9. खालील पर्यायातील कोणता पर्याय ‘500000’ ही संख्या दर्शवत नाही ?
1) 500 हजार 2) 5000 शतक 3) 50 लक्ष 4) 5 लक्ष
3) 50 लक्ष
10. सव्वा पस्तीस हजार म्हणजे किती ?
35250
11.500 रु. च्या शंभर नोटा म्हणजे किती रुपये ?
अर्धा लक्ष रु.
12.प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखून तिचे अचूक वाचन पर्यायांतून निवडा ?
4,57,18,320 4,57,18,330 4,57,18,340 ….?….
चार कोटी सत्तावन्न लक्ष अठरा हजार तीनशे पन्नास
13.सतरा हजार सतराशे सतरा = ……… ?
18717
14.चिन्मयने साडे चार लाखाची मोटार घेण्यासाठी काही रक्कम अॅडव्हान्स म्हणून जमा केली. ती रक्कम देताना त्याने 1000 ₹ च्या 100 नोटा आणि 500 ₹ च्या 100 नोटा जमा केल्या. तर अॅडव्हान्स दिलेली रक्कम किती ?
दीड लाख
15. 8 कोटी = …..?
80 दशलक्ष
16.2,50,000 या संख्येचे योग्य वाचन कोणते ?
(अ) दोन लाख पन्नास हजार (ब) अडीच लाख (क) अडीचशे हजार
‘अ’,’ब’,’क’ योग्य
17. ‘नऊ लक्ष सात दशहजार चार हजार तीन दशक’ ही संख्या अंकात मांडा.
9,74,030
18. 6 अंकी सर्वात मोठ्या सम संख्येचे अक्षरी वाचन कसे कराल ?
नऊ लक्ष नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव
19. 60,00,000 चे योग्य वाचन कोणते ?
6 दशलक्ष
20.47,59,321 मधील 7 ची स्थानिक किंमत खालीलपैकी कोणती?
योग्य ते पर्यायांतून शोधा. (अ) 700000 (ब) 7 × 100000 (क) 70000
‘अ’ आणि ‘ब’ योग्य
21. 57,32,479 मधील सर्वात कमी स्थानिक किंमत असलेला अंक कोणता ?
9
22. 2,34,65,789 मधील कोणत्या अंकांची दर्शनी किंमत सर्वात कमी आहे?
2
23. विस्तारीत मांडणीवरून दिलेली संख्या ओळखा.
5000000 + 400000 + 30000 + 9000 + 200 + 60 + 8 = …… ?
5439268
24. 32,57,086 ची योग्य विस्तारीत मांडणी कशी करावी ?
3000000+200000+50000+7000+0+80+6
25.) 90000 + 600000 + 1000 + 3 + 400 + 50=………?
691453