प्रजासत्ताक दिन भाषणे | Republic Day speeches |

By Neha

Published On:

प्रजासत्ताक दिन भाषणे Republic Day speeches
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

प्रजासत्ताक दिन भाषणे | Republic Day speeches |

प्रजासत्ताक दिन-01

१. सर्वाना माझा नमस्कार, माझे नाव ………….. आहे. मी वर्ग …………मध्ये शिकत आहे.

२. आज दिनांक 26 जानेवारी म्हणजे आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन होय.

३. दरवर्षी प्रमाणे आपण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत.

४. सर्वप्रथम, सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

५. प्रजासत्ताक दिन हा आपला एक राष्ट्रीय सण आहे.

६. २६ जानेवारी १९५० रोजी भारतात संविधान लागू झाले.

७. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘भारतीय संविधानाचे शिल्पकार’ म्हणतात.

८. ज्या व्यक्तीला वर्गात बसून शिक्षण घेऊ दिल्या जात नव्हते, त्याच व्यक्तीने भारताचे संविधान लिहिले.

९. यावरून त्या व्यक्तीची महानता, त्यांनी केलेले कष्ट दिसून येते.

१०. ….जय हिंद, जय भारत….

प्रजासत्ताक दिन-02

१.   सर्वांना माझा नमस्कार.

२. माझे नाव ………………………………………… आहे. मी ……………. वर्गात शिकत आहे.

3. आज २६ जानेवारी हा दिवस आपण आपला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत.

४.  प्रजासत्ताक दिन हा आपला एक राष्ट्रीय सण आहे.

५. २६ जानेवारी १९५० रोजी भारतात संविधान लागू झाले.

६. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.

७. भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे.

८.  प्रजासत्ताक दिन आपल्याला शांतता व एकतेची शिकवण देतो.

९. भारत माझा देश आहे, याचा मला अभिमान आहे.

तैरना है तो, समंदर मे तैरो,
नदी नालो मे, क्या रखा है |
प्यार करना है, तो अपने वतन करो,
मतलबी लोगो मे क्या रखा है |

१०. जय हिंद ! जय  संविधान !! जय भारत !!!

प्रजासत्ताक दिन-03

१. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग, ग्रामस्थ आणि माझ्या बालमित्रांनो,

२. आजचा दिवस आपल्या प्रत्येकासाठी आनंदाचा , अभिमानाचा आणि उत्साहाचा आहे.

३. आजच्या दिवशी म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी आपला भारत प्रजासत्ताक झाला.

गुलामगिरी संपली, झाले गणराज्य,
सत्ताधारी बनले चालक, जनता झाली खरी मालक…

४. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेने निवडलेली सत्ता होय.

५. कोणाला सत्तेवर बसवायचे ? कोणाला सत्तेवरून खाली खेचायचे, हे ठरविण्याचा अधिकार प्रजेला प्राप्त झाला.

६. संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकास समानतेचा दर्जा मिळवून दिला.

७. प्रत्येकास विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले. न्याय, समता व बंधुता प्रस्थापित झाली.

८. संविधानामुळेच आज आपला देश जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश बनला आहे.

९. आज आपण सुखा-समाधानाने जे प्रजासत्ताक राज्य उपभोगत आहोत, त्यामागे हजारो क्रांतिकारकांचे बलिदान आहे, हे विसरून चालणार नाही.

१०. देशासाठी अमर झालेल्या सर्व वीरांना नमन करूया.

११. देशाची एकता व शांतता वाढीसाठी प्रयत्न करूया.

जय हिंद ! जय  संविधान !! जय भारत !!!

1 thought on “प्रजासत्ताक दिन भाषणे | Republic Day speeches |”

Leave a Comment