२६ जानेवारी- प्रजासत्ताक दिन भाषण – 01 | Republic day speech
१. नमस्कार मित्रांनो मी…………………………………………., वर्ग…………चा विद्यार्थी / ची विद्यार्थिनी.
२. आज मी तुम्हांला आपल्या प्रजासत्ताक दिनाबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकावे ही नम्र विनंती.
३. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्व मान्यवरांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
४. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात. २६ जानेवारी १९५० रोजी भारतात खऱ्या अर्थाने लोकशाही सुरु झाली.म्हणून आपण दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतो.
५. डॉ. बाबासाहेबांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवस अथक परिश्रम करून आपली घटना लिहिली. या महामानवाबद्दल मला असे म्हणावेसे वाटते,
असा मोहरा झाला नाही, पुढे न होणार
भीमरावांचे नाव, सतत गर्जत राहणार …
६. आज आपणा सर्वांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. हा आपला राष्ट्रीय सण आहे.
७. आपल्याला मिळालेल्या हक्कांबरोबरच आपल्या कर्तव्याची आपल्याला जाणीव असावी.
शेवटी एवढच सांगतो /सांगते.
अनेकता में एकता ,
इस देश की शान है |
इसलिये मेरा भारत महान है |
जय हिंद, जय भारत !