राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मां साहेब | Rashtramata Rajmata Jijau Maa Saheb |

By Neha

Published On:

Rashtramata Rajmata Jijau Maa Saheb bhashne
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मां साहेब | Rashtramata Rajmata Jijau Maa Saheb |

१. माननीय अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन आणि माझ्या बाल मित्रांनो,

२. आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मां साहेबांची जयंती आहे.

३. दि. १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे त्यांचा जन्म झाला.

४. जिजाऊच्या आईचे नाव म्हाळसाराणी तर वडिलांचे नाव लखुजीराजे जाधव असे होते.

५. बालपणापासून त्या धाडसी होत्या. तलवार चालवणे, घोडेस्वारी करणे त्यांना आवडायचे.

६. वेरूळच्या भोसले घराण्यातील शहाजीराजे भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

७. जिजाऊनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला. म्हणून त्यांना स्वराज्यजननी असे म्हणतात.

८. याच वीरमातेच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला.

९. बाल शिवबांना राज्यकारभार, युद्धनीती, शस्त्र चालवणे, घोडेस्वारी, विविध भाषांचे ज्ञान त्यांनी दिले.

१०. शहाजीराजांच्या मागे त्यांनी उत्तम राज्यकारभार करून शिवरायांना घडविले.

“हीच जिजाऊ जिच्या प्रेरणे उजळे स्वराज्यज्योती,

हीच जिजाऊ जिने घडविले राजे शिवछत्रपती “

११. दरवर्षी १२ जानेवारीला मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जातो.

१२. सर्वांना जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ……जय जिजाऊ

Leave a Comment