पोस्टल मतदान करताना या चुका टाळाव्या, म्हणजे आपले मत बाद होणार नाही.
Need to Know About Postal Ballots
पोस्टल मतदान करताना या चुका टाळाव्या, म्हणजे आपले मत बाद होणार नाही.
पोस्टल मतदान करताना कोणती काळजी घ्यावी हे खालील प्रमाणे सविस्तर सांगितले आहे. पोस्टल मतदान करणाऱ्या कर्मचाऱ्याने ते समजून घ्यावे.
१. आपणास पोस्टल मतदान संबंधीत सुविधा केंद्रावर मोठे पाकीट दीले जाईल. (C)
२. ते पाकीट एका योग्य प्रकारे बाजूने फाडून उघडणे/उघडावे .
3. त्यात आणखी एक पाकीट आहे (B)
4. ह्या B पाकीट मध्ये यापेक्षा छोटे (A) पाकीट व घोषणा पत्र आहे. हे मतदान कक्षात जाऊन बाहेर काढणे / काढावे.
व सर्वात छोटे असणारे A पाकिटातून मत पत्रिका बाहेर काढणे/काढावे.
5. मत पत्रिकावरील क्रमांक प्रथम घोषणापत्रावर नमूद ठिकाणी व छोट्या पाकिटावर पण अचूकपणे पेननी टाकावा.
घोषणा पत्रावरील संपूर्ण मजकूर भरावा. घोषणा पत्रावर तेथे उपस्थीत अधिकारी यांची सही व शिक्का घ्यावा.
6. मत पत्रिकेवर आपल्या आवडत्या उमेदवारासमोर नमूद ठिकाणीं ✔️ किंवा ❌ असे चिन्ह ची खूण करावी.
हे करत असताना वरच्या व खालच्या उमेदवार यांच्या पर्यंत आपली खुणाची रेषा चिटकायला नको
7. पहिल्या सारखी घडी घालून A पाकीट मध्ये पत्रिका टाकून डिंक ने बंद करणे/करावे.
8. घोषणापत्र व हे पाकीट B पाकिट मध्ये टाकून बंद करणे/करावे.
इथे चूक होते ती टाळावी. घोषणापत्र व A पाकीट वेगळे आहे. घोषणापत्र मत पत्रिका सोबत A मध्ये बंद करायचे नाही.
9. मग B पाकिटावर खालच्या बाजूला विहित ठिकाणी सही करायची आहे व हे B पाकिट पेटीत टाकायचे आहे. यानातारच आपल्या मताची मोजणी होईल अन्यथा बाद होण्याचा शक्यता नाकारता येत नाही.
पोस्टल मतदान रद्द होण्याची कारणे.
पोस्टल मतदान रद्द किव्हा बाद होण्याची पुढील कारणे आहेत.
१. घोषणा पत्रावर मत पत्रिका क्रमांक नसणे.
२. Attestation अधिकाऱ्याची सही नसणे.
3. खूण चुकीच्या पद्धतीने म्हणजे नेमके मत कोणाला दिले असे न समजण्यासारखी करणे.
४. B पाकिटावर सही नसणे.