दिव्यांग अधिकारी/ कर्मचारी यांची निवडणूक कामातून सुटका-नवीन आदेश | mahaelection 2024
Mahaelection 2024 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ दिव्यांग अधिकारी/ कर्मचारी यांना निवडणूक कामातून वगळणे बाबत शासन निर्णय २२ ऑक्टोबर, २०२४ रोजी निर्येगमित करण्तेयात आला.
भारत निवडणूक आयोगाद्वारे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार, प्रस्तुत निवडणूकीच्या मतदान प्रक्रियेकरीता विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी १ ते ३ यांचे प्रशिक्षण आदेश निर्गमित करण्यात आले आहे.
जिल्हा सचिव, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना, मुंबई शाखा छत्रपती संभाजीनगर यांनी संदर्भीय निवेदनाद्वारे प्रस्तुत निवडणूकीकरीता दिव्यांग अधिकारी/कर्मचारी यांची माहिती विहीत नमून्यात भरली असतांना सुद्धा दिव्यांग अधिकारी/कर्मचारी यांना निवडणूक आदेश प्राप्त झाल्याचे नमूद केले आहे असून संबंधित दिव्यांग अधिकारी/कर्मचारी यांचे निवडणूक आदेश रद्द करणे बाबत विनंती केली आहे.
त्या अनुषंगाने याद्वारे आपणास निर्देशित करण्यात येते की, दिव्यांग संचलित मतदान केंद्रे आणि स्वच्छेने निवडणूक कामकाज करण्यास इच्छूक दिव्यांग वगळता दिव्यांग अधिकारी/कर्मचारी यांची निवडणूक कामी नियुक्ती करण्यात आली असल्यास सदर नियुक्ती आदेश रद्द करण्यात यावे.
दिव्यांग अधिकारी/ कर्मचारी यांची निवडणूक कामातून वगळण्याचा आदेश / निर्णय 👇