महादीप परीक्षा सराव पेपर-13 | Mahadeep Test Paper-13
Mahadeep Test Paper: महादीप परीक्षा 2024-25 सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी महादीप परीक्षा सराव पेपर-13 देत आहोत. Madeep Test Paper-13 हा सराव पेपर 50 प्रश्नांचा असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे परंतू प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.
महादीप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती कि,त्यांनी आपल्या मुलांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या पेपरचा सराव करून घ्यावा. असेच सराव पेपर आम्ही आपणासाठी महादीप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.
नक्कीचं आपणास या सराव पेपरचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रानो हा सराव आपणास कसा वाटला हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.
1. कृष्णा नदी कोठे उगम पावते ?
महाबळेश्वर
2. कोकणतील प्रसिद्ध जंजिरा हा किल्ला कोणता किल्ला आहे ?
जलदुर्ग
3.सूर्याच्या जवळचा ग्रह कोणता ?
बुध
4.बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध सरोसर कोणते ?
लोणार सरोवर
5.गणित तज्ञ भास्कराचार्य यांनी कोणता ग्रंथ लिहीला ?
सिद्धांत शिरोमणी
6.सर्वोच्च न्यायालयाची पहिली भारतीय न्यायाधीश कोण ?
फातिमा बिबी
7.भारतातील सर्वात उंच वृक्ष कोणता ?
देवदार
8. भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता ?
जोग, कर्नाटक
9. नद्याजोड प्रकल्प म्हणजे कोणती क्रांती आहे ?
नीली क्रांती
10. भारताची पूर्व-पश्चिम लांबी किती आहे ?
2933 किमी
11.मलेरियाच्या जंतुचा शोध कोणी लावला ?
रोनाल्ड रॉस
12.वनस्पती तुप तयार करताना कोणता वायू वापरतात ?
हायड्रोजन
13.भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता ?
आर्यभट्ट
14. सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहचण्यासाठी किती कालावधी लागतो ?
8.3 मिनिटे
15. चुंबकसुई नेहमी कोणत्या दिशेला स्थिर असते ?
उत्तर
16.सिंधू नदी कोणत्या दोन देशातून वाहते ?
भारत-पाकिस्तान
17. त्रिभूवन विमानतळ कोठे आहे ?
नेपाळ
18. जर्मनीची राजधानी कोणती ?
बर्लिन
19.नासा ही संस्था कशाशी संबंधित आहे?
अवकाश संशोधन
20.पिसाचा झुलता मनोरा कोणत्या देशात आहे ?
इटली
21.रॅड नावाच्या जुलमी अधिकाऱ्याचा वध कोणी केला ?
चाफेकर बंधू
22.वैयक्तीक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते ?
विनोबा भावे
23.डॉ. विजय भटकर यांच्या नेतृत्वात कोणता संगणक तयार झाला ?
परम संगणक
24.स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे गव्हर्नर जनरल कोण ?
सी. राजगोपालाचारी
25.’जयहिंद’ व ‘चलो दिल्ली’ या घोषणा कोणी दिल्या ?
सुभाषचंद्र बोस
26. भारतीय घटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
27.“स्वतःहून संकटात पडणे” ह्या अर्थाचा वाक्प्रचार लिहा.
पायावर कुऱ्हाड मारणे
28.काफिला कोणाचा ?
जहाज
29.उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह म्हणजे ?
धबधबा
30. अलंकारीक शब्द “काडी पहिलवान” म्हणजे ?
हाडकुडा
31.उपाय या शब्दाचा विरूद्ध शब्द लिहा ?
निरुपाय
32.समानार्थी शब्द लिहा – भू
जमीन
33. वर्तमानपत्र या शब्दाला इंग्रजी पर्यायी शब्द कोणता ?
न्यूजपेपर
34.म्हण पूर्ण करा – नळी फुंकली सोनारे.
इकडून तिकडून गेले वारे
35.’कोठेही गेलो तरी परिस्थिती तीच असणे’ या अर्थाची म्हण लिहा ?
घरोघरी मातीच्या चुली
36.१८५३ या संख्येस १७ ने भागल्यास भागाकार किती येईल ?
108
37.९७० रूपयात ५० रू. च्या जास्तीत जास्त किती नोटा येतील ?
19
38. साडेपासष्ट हजाराला घेतलेली गाडी चौपन्न हजाराला विकली तर किती तोटा झाला ?
11500 रु.
39. घड्याळात किती वाजता काटकोन तयार होतो ?
3 व 9 वाजता
40. आयताला किती बाजू असतात ?
4 बाजू
41.घनाला किती चौरसाकार पृष्ठे असतात ?
6 पृष्ठे
42.एका चौरसाची परिमिती ३२ मी. आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल ?
64 चौमी
43.वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेला काय म्हणतात ?
व्यास
44.दिड मिटर + पावणे तीन मिटर = किती ?
सव्वा चार मीटर
45.त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज किती असते ?
180 अंश
46. A ते Z मधील P हे कितवे अक्षर आहे ?
16 वे
47. ४५ या संख्येचे एकूण विभाजक किती ?
6 विभाजक
48.दिल्ली, मुंबई, कोलकाता, रंगून- विसंगत ओळखा.
रंगून
49.५७२, ६३२, ७२८, ८६२ – विसंगत ओळखा.
७२८
50. एका रांगेतील आसनांचे क्रमांक XXVI पासून XXXIV पर्यंत आहे तर त्या रांगेत एकूण किती खुर्च्या आहेत ?
9 खुर्च्या