महादीप परीक्षा सराव पेपर-12 | Mahadeep Test Paper-12
Mahadeep Test Paper: महादीप परीक्षा 2024-25 सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी महादीप परीक्षा सराव पेपर-12 देत आहोत. Madeep Test Paper-12 हा सराव पेपर 50 प्रश्नांचा असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे परंतू प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.
महादीप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती कि,त्यांनी आपल्या मुलांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या पेपरचा सराव करून घ्यावा. असेच सराव पेपर आम्ही आपणासाठी महादीप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.
नक्कीचं आपणास या सराव पेपरचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रानो हा सराव आपणास कसा वाटला हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.
1. विमानाचा शोध कोणी लावला ?
राईट बंधू
2. सर्वात हलका वायु कोणता ?
हायड्रोजन
3. हृदयाचे विश्रांती अवस्थेत किती ठोके पडतात ?
72 ठोके
4.दूध नासणे ही कोणती प्रक्रिया आहे ?
जीव रसायन
5.सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाभोवती कडी आहे ?
शनि
6. झाडाचे वय कशावरून ठरवितात ?
खोडाच्या वर्तुळावरून
7.कोणत्या पिकाच्या मुळावर गाठी असतात ?
हरभरा
8. ऊसाच्या रसात कोणते जीवनसत्व असते ?
क जीवनसत्व
9. आगपेटीवर लावलेल्या गुलामध्ये कोणता अधातू असतो ?
फॉस्फरस
10. लाल रक्तपेशी किती दिवस जगतात ?
120 दिवस
11.उष्णतेचा सर्वात सुवाहक कोणता धातू आहे ?
तांबे
12.भारतातील पहिल्या महिला अंतराळवीर कोण आहेत ?
कल्पना चावला
13. हिमनगाचा कितवा भाग पाण्यावर तरंगतो ?
1/10 भाग
14. इलेक्ट्रॉनचा प्रभार कोणता असतो ?
ऋण प्रभार
15. माणसाने प्रथम कोणत्या धातूचा शोध लावला ?
तांबे
16.कांदा कापतांना कोणता वायू बाहेर पडतो ?
अमोनिया
17. कोणत्या वायूचा वास कुजक्या अंड्यासारखा येतो ?
हायड्रोजन सल्फाईड
18. पृथ्वीच्या गाभाऱ्यास काय म्हणतात ?
निफे
19.पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास काय म्हणतात ?
परिभ्रमण
20.पाण्याचा गोठन बिंदू किती आहे ?
0 अंश सेल्शिअस
21.जगातील सर्वात लांब नदी कोणती ?
नाईल
22.अणूच्या मध्यभागास काय म्हणतात ?
केंद्रक
23.खालीलपैकी संप्लवनशील पदार्थ कोणता ?
कापूर
24.पाण्यात जळणारा पदार्थ कोणता ?
सोडियम
25. सर्वग्राही रक्त गट कोणता ?
AB रक्तगट
26. ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ कधी साजरा केला जातो ?
28 फेब्रुवारी
27. गुरूत्वाकर्षणाचे नियम कोणत्या शास्त्रज्ञाने सांगितले ?
सर आयझॅक न्यूटन
28.पहाटेच्या वेळेस आकाशात दिसणारा ग्रह कोणता ?
शुक्र
29. पृथ्वीवर वस्तूचे वजन 60 किलो आहे, तेच वजन चंद्रावर मोजले तर किती भरेल ?
10 किलो
30. भारतातील कोणत्या राज्यात ‘सुंदरबन’ हा त्रिभुज प्रदेश आहे ?
पश्चिम बंगाल
31.नीलक्रांती कोणत्या व्यवसायाशी संबंधीत आहे ?
मासेमारी
32.भारतात ‘चिपको आंदोलन’ कोणी सुरू केले ?
सुंदरलाल बहुगुणा
33. मादी बेडकात कोणता अवयव नसतो ?
स्वर कोश
34.भारतीय तिन्ही सेनादलाचा सर्वोच्च सेनापती कोण असतो ?
राष्ट्रपती
35.पंचायत राज व्यवस्थेत महिलांसाठी किती टक्के जागा राखीव आहेत ?
33 टक्के
36. ‘संविधान दिन’ म्हणून कोणता दिवस साजरा करतात ?
26 नोव्हेंबर
37.राज्यपालाची नियुक्ती कोण करतो ?
राष्ट्रपती
38. अग्नीशमन साधनामध्ये कोणता वायू वापरतात ?
कार्बन डायऑक्साईड
39. वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के असते ?
78%
40. कॉपर सल्फेटचे व्यावहारीक नाव कोणते ?
मोरचूद
41.सामान्यपणे सलाईनमध्ये कोणता घटक असतो ?
सोडियम क्लोराईड
42.भारताचा पहिला कृत्रीम उपग्रह कोणता ?
आर्यभट्ट
43.रक्ताचा रंग लाल कशामुळे असतो ?
हिमोग्लोबिन
44.सोन्याचे दागिणे बनवितांना त्यात कोणता धातू मिसळतात ?
तांबे
45.’बर्फ वितळणे’ हा कोणता बदल आहे ?
भौतिक बदल
46. दिवसा वनस्पती कोणता वायू बाहेर सोडतात ?
ऑक्सिजन
47. ‘अ’ जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो ?
रातंधळेपणा
48.आयोडीन अभावी कोणता रोग होतो ?
गलगंड
49.कॅल्शीयमचे प्रमाण कशात सर्वात जास्त असते ?
दुध
50. मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते ?
24