महादीप परीक्षा सराव पेपर-07 | Mahadeep Test Paper-07
Mahadeep Test Paper: महादीप परीक्षा 2024-25 सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी महादीप परीक्षा सराव पेपर-07 देत आहोत. Mahadeep Test Paper-07 हा सराव पेपर 50 प्रश्नांचा असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे परंतू प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.
महादीप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती कि,त्यांनी आपल्या मुलांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या पेपरचा सराव करून घ्यावा. असेच सराव पेपर आम्ही आपणासाठी महादीप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.
नक्कीचं आपणास या सराव पेपरचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रानो हा सराव आपणास कसा वाटला हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.
1. लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
पुणे
2. साईबाबा यांचे प्रसिध्द मंदिर कोठे आहे?
शिर्डी
3. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
अहिल्यानगर
4. बंजारा समाजाची काशी कोणत्या गावाला म्हटल्या जाते ?
पोहरादेवी
5. महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्याचा प्रकार कोणता ?
लावणी
6.नांदेड हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
गोदावरी
7. दिक्षाभुमी हे प्रसिद्ध ठिकाण कोठे आहे ?
नागपूर
8. महाराष्ट्राची राजधानी कोणती ?
मुंबई
9. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ?
36
10. यवतमाळ जिल्ह्यात किती तालुके आहे ?
16
11. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?
हॉकी
12.ख्वाजा मोईनुद्दीन चिस्तीचा दर्गा कोठे आहे ?
अजमेर
13. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण ?
सावित्रीबाई फुले
14. भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान कोणता ?
भारतरत्न
15. भारतातील गुलाबी रंगाचे शहर कोणत्या शहराला म्हणतात ?
जयपूर
16. आपल्या देशाची राष्ट्रभाषा कोणत्या भाषेला म्हणतात ?
हिंदी
17.भारताचे मिसाईल मॅन कोणाला म्हणतात ?
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
18. भारताची राष्ट्रीय नदी कोणत्या नदीला म्हणतात ?
गंगा
19. पंच नद्यांचा प्रदेश कोणत्या राज्याला म्हणतात ?
पंजाब
20. भारताचे राष्ट्रपती पद २ वेळा कुणी भूषविले ?
डॉ. राजेन्द्रप्रसाद
21. विमानाचा शोध कोणी लावला ?
राईट बंधू
22. सर्वात हलका वायु कोणता ?
हायड्रोजन
23. बेडूक हा प्राणी कोणत्या वर्गातील आहे ?
उभयचर
24. हायड्रोजन व ऑक्सीजन यांचे पाण्यातील प्रमाण किती ?
1:8
25. आगपेटीवर लावलेल्या गुलामध्ये कोणता पदार्थ असतो ?
फॉस्फरस
26. पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर कोणता रोग होतो ?
रेबीज
27. कोणत्या धातुला विजेचा सुवाहक म्हणतात ?
तांबे
28.’ड’ जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो ?
मुडदूस
29. मीठाचे शास्त्रीय नांव काय ?
सोडियम क्लोराईड
30. नायट्रोजनची संज्ञा कोणती ?
N
31. व्हाईट हाऊस ही जगप्रसिद्ध इमारत कोणत्या शहरात आहे ?
वाशिंग्टन
32. पिरॅमिडचा देश कोणत्या देशाला म्हणतात ?
इजिप्त
33. कांगारूंची भुमी कोणत्या देशाला म्हणतात ?
ऑस्ट्रेलिया
34. यु.एस. डॉलर हे कोणत्या देशाचे चलन आहे ?
अमेरिका
35.सिलोन या देशाचे नवे नांव कोणते ?
श्रीलंका
36. फ्रान्स या देशाची राजधानी कोणती ?
पॅरीस
37. लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
थेम्स
38. जगात सतत भुकंप होणारा देश कोणता ?
जपान
39. जगात सर्वात जास्त देशात खेळला जाणारा खेळ कोणता ?
फुटबॉल
40. बॉल टेंपरींग प्रकरणात निलंबित झालेले स्टीव्ह स्मीथ व डेव्हीड वॉर्नर हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत ?
ऑस्ट्रेलिया
41.लाल बहादुर शास्त्री यांनी दिलेला प्रसिद्ध नारा कोणता ?
जय जवान,जय किसान
42.मिठाच्या सत्याग्रहासाठी महात्मा गांधींनी कोणते गांव निवडले होते ?
दांडी
43.भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना कोठे फाशी देण्यात आली ?
लाहोर
44.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म गांव कोणते ?
महू
45. विनोबा भावे यांनी केलेली चळवळ कोणती ?
भूदान चळवळ
46. अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली ?
वि.दा. सावरकर
47. महानुभाव संप्रदायाचे प्रणेते कोण होते ?
चक्रधर स्वामी
48. शिवरायांच्या काळातील मोरे हे कुठले जहांगीरदार होते ?
जावळी
49. शिवरायांची मुद्रा ही कोणत्या भाषेत होती ?
संस्कृत
50. भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने घातला ?
लॉर्ड मेकाले
Respected sir /Ma’am
Can you share the same test papers in English language please