महादीप परीक्षा सराव पेपर-05 | Mahadeep Test Paper-05
Mahadeep Test Paper: महादीप परीक्षा 2024-25 सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी महादीप परीक्षा सराव पेपर-05 देत आहोत. Mahadeep Test Paper-05 हा सराव पेपर 50 प्रश्नांचा असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे परंतू प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.
महादीप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती कि,त्यांनी आपल्या मुलांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या पेपरचा सराव करून घ्यावा. असेच सराव पेपर आम्ही आपणासाठी महादीप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.
नक्कीचं आपणास या सराव पेपरचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रानो हा सराव आपणास कसा वाटला हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.
1. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?
हॉकी
2. भारतात एकूण किती घटक राज्य आहेत ?
29
3. भारतात विद्युत उत्पादनात प्रथम राज्य कोणते ?
महाराष्ट्र
4. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे शहर कोणते ?
मुंबई
5. भारतात विजयस्तंभ कोठे आहे ?
चित्तोडगढ
6.भारतातील पहिले नियोजीत शहर कोणते ?
चंदिगढ
7. भारताच्या प्रमाण वेळेचे ठिकाण कोठे आहे ?
मिर्झापूर,अलाहाबाद
8. भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण ?
मीरा कुमार
9. भारताचा पहिला शैक्षणिक उपग्रह कोणता ?
एज्युसॅट
10. भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्ट्ये आहेत ?
बारा
11. ‘स्त्री-पुरूष तुलना’ हा ग्रंथ कोणी लिहीला ?
ताराबाई शिंदे
12.भारतातील पहिले निर्मल ग्राम राज्य कोणते ?
सिक्कीम
13. भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी-रुंदीचे प्रमाण किती आहे ?
3 : 2
14. बालहक्क कायदे कोणत्या कलमानुसार मंजुर करण्यात आले ?
14 व 24
15. सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला भारतीय न्यायाधीश कोण ?
फातिमा बिवी
16. सागर हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे ?
मध्यप्रदेश
17.दक्षिण भारतातील सर्वात उंच रांग कोणती ?
अन्नमलाई
18. पश्चिम मध्यरेल्वेचे विभागीय मुख्यालय कोठे आहे ?
जबलपूर
19. समुद्राच्या निमुळत्या भागात तिनही बाजूंनी जमिनीने वेढलेल्या भागास काय म्हणतात ?
आखात
20. भारतातील सर्वात उंच विमानतळ कोठे आहे ?
लेह,लदाख
21. भारताला लागून सर्वात कमी भूसिमा कोणत्या देशाची आहे ?
अफगाणिस्थान
22. भारतातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीवर आहे ?
चिनाब
23. हिमालयाच्या अंतरंग भागात कोणत्या प्रकारचा खडक आहे ?
स्फटिक
24. भारतातील बाल शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक कोण ?
ताराबाई मोडक
25. अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते ?
गुरुशिखर
26. भारतातील सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता ?
परमवीर चक्र
27. छत्रपती संभाजीनगरचे मिलींद कॉलेज कोणी स्थापन केले ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
28.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
29. भारतात कोणत्या वर्षी प्रथमच सार्वत्रिक निवडणूका झाल्या ?
1951
30. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?
थर वाळवंट
31. भारताच्या सरहद्दीवर एकूण किती देश आहेत ?
सात
32. ब्रह्मा-विष्णू-महेश यांचे त्रिमुर्ती शिल्प कोणत्या लेण्यात आहे ?
घारापुरी
33. डेमॉकॉन हे काय आहे ?
देश
34. कोणत्या राज्याच्या राजधानीतील सचिवालयावर जगातील सर्वात मोठा तिरंगी ध्वज लावण्यात आलेला आहे ?
मध्यप्रदेश
35.भारताला एकूण किती लांबीची भूसिमा लाभलेली आहे ?
15168 किमी
36. अंदमान निकोबार बेट कशाची बनली आहेत ?
ज्वालामुखी
37. देशाची सर्वात मोठी तार कचेरी कोठे आहे ?
कलकत्ता
38. भारतीय शेअर बाजारातील ‘दलाल स्ट्रीट’ कोठे आहे ?
मुंबई
39. क्रिकेटच्या विकेट्सची लांबी किती यार्ड असते ?
22 यार्ड
40. शांततेचे नोबेल पारितोषिक प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
मदर टेरेसा
41. ग्रिनपार्क स्टेडीयम कोठे आहे ?
कानपूर
42. ‘श्यामची आई’ ही कादंबरी कोणी लिहीली ?
सानेगुरुजी
43. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?
पंडित जवाहरलाल नेहरू
44. शांतीनिकेतनची स्थापना कोणी केली ?
रवींद्रनाथ टागोर
45. भारतरत्न मिळविणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ?
सचिन तेंडूलकर
46. भारतातील कोणत्या केंद्रशासीत प्रदेशात स्वतंत्र उच्च न्यायालय आहे ?
दिल्ली
47. केदारनाथ कोणत्या राज्यात आहे ?
उत्तराखंड
48. जूनच्या कोणत्या तारखेनंतर सूर्य दक्षिणेकडे सरकतो ?
21 जून नंतर
49. भारताच्या राष्ट्रचिन्हाला कधी मान्यता मिळाली ?
26 जानेवारी 1950
50. भारताची राज्यघटना पूर्ण होण्यास किती काळ लागला ?
2 वर्ष, 11 महिने, 18 दिवस