महादीप परीक्षा सराव पेपर-04 | Mahadeep Test Paper-04
Mahadeep Test Paper: महादीप परीक्षा 2024-25 सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी महादीप परीक्षा सराव पेपर-04 देत आहोत. Madeep Test Paper-04 हा सराव पेपर 50 प्रश्नांचा असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे परंतू प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.
महादीप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती कि,त्यांनी आपल्या मुलांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या पेपरचा सराव करून घ्यावा. असेच सराव पेपर आम्ही आपणासाठी महादीप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.
नक्कीचं आपणास या सराव पेपरचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रानो हा सराव आपणास कसा वाटला हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.
1. महाराष्ट्रात गुळाची बाजारपेठ कोठे आहे ?
कोल्हापूर
2. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ?
अंबोली
3. ‘प्राणहिता’ संगम कोणत्या दोन नद्यांचा आहे ?
वर्धा व वैनगंगा
4. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?
गंगापूर
5. महाराष्ट्राचे शिल्पकार कोणाला म्हणतात ?
यशवंतराव चव्हाण
6. हापुस आंबा कोणत्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे ?
रत्नागिरी
7. नंदुरबार जिल्ह्यातून वाहणारी पश्चिम वाहिनी नदी कोणती ?
नर्मदा
8. मुंबई मधील पंचतारांकीत हॉटेल कोणते ?
ताज
9. ‘तोरणमाळ’ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
नंदुरबार
10. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो ?
मुख्य कार्यकारी अधिकारी
11. महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी एकूण किती सदस्य नेमले जातात ?
19
12. राधानगरी अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी आरक्षीत आहे ?
रानगवा
13. महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण ?
आनंदीबाई जोशी
14. महाराष्ट्रात जिल्हा परिषद केव्हा निर्माण झाली ?
1 मे 1962
15. महाराष्ट्रातील पठार कोणत्या खडकापासून बनले आहे ?
बेसॉल्ट
16. जैतापूर प्रकल्प कोणत्या शहरात आहे ?
राजापूर
17. पवन विद्युत केंद्र कोठे आहे ?
जामसंडे सिंधुदुर्ग
18. महाराष्ट्रातील पोलीस प्रशिक्षणाचे मुख्य केंद्र कोठे आहे ?
नाशिक
19. महाराष्ट्रातील अनुसंशोधन केंद्र कोठे आहे ?
मुंबई
20. संत ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ चा लेखनारंभ कोठे केला ?
नेवासे
21. सरपंचाची निवड कोणाकडून केली जाते ?
निवडलेले ग्रामपंचायत सदस्य
22. सिंधु संस्कृतीचे महाराष्ट्रातील सापडलेले स्थळ कोणते ?
दायमाबाद
23. जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
राज्यशासन
24. राष्ट्रध्वजामध्ये किती रंग वापरण्यात आले आहेत ?
चार
25. महाराष्ट्रात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनी कोठे आहे ?
खडकवासला (पुणे)
26. विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती कोण असतात ?
राज्यपाल
27. किर्लोस्कर वाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
सांगली
28. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचा जिल्हा कोणता ?
रत्नागिरी
29. कुस्तीगिरांचा जिल्हा कोणता ?
कोल्हापूर
30. पहिली हेरीटेज नगरपालिका कोणती ?
पनवेल
31. महाराष्ट्रातील कोणती नदी चंद्रभागा या नावाने ओळखल्या जाते ?
भीमा नदी
32. महाराष्ट्रात सर्वात जास्त अरण्यांचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
गडचिरोली
33. हिमरू शाली करीता प्रसिद्ध शहर कोणते ?
औरंगाबाद
34. कराड येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो ?
कृष्णा व कोयना
35. विदर्भात सर्वात जास्त पाऊस कोणत्या महिन्यात पडतो ?
ऑगस्ट
36. महाराष्ट्रातील खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान कोठे आहे ?
जेजुरी
37. पैठण ही कोणत्या संताची कर्मभूमी आहे ?
संत एकनाथ
38. आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम कोठे आहे ?
पवनार
39. जैन धर्मियांचे काचेचे मंदिर कोठे आहे ?
आर्वी
40. नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग कोणते ?
त्र्यंबकेश्वर
41. महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध लेणी अजिंठा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
छत्रपती संभाजीनगर
42. महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे ?
नरनाळा किल्ला
43. सिंहगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
पुणे
44. पूर्व विदर्भातील नद्या कोणत्या नदीला मिळतात ?
वैनगंगा
45. कोकणामधील जंजीरा हा कोणता किल्ला आहे ?
जलदुर्ग
46. कोणत्या जिल्ह्याचे नाव किल्ल्यावरून पडलेले आहे ?
रायगड
47. मराठवाडा विभागात किती जिल्हे आहेत ?
आठ
48. महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात जास्तीत जास्त किती तालुके आहेत ?
16
49. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही ?
मुंबई
50. महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी एकुण किती जिल्हे होते ?
26