महादीप परीक्षा सराव पेपर-02 | Mahadeep Test Paper-02

By Neha

Published On:

महादीप-सराव-पेपर-2
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

महादीप परीक्षा सराव पेपर-02 | Mahadeep Test Paper-02

Mahadeep Test Paper: महादीप परीक्षा 2024-25 सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी महादीप परीक्षा सराव पेपर-01 देत आहोत. Madeep Test Paper-02 हा सराव पेपर 50 प्रश्नांचा असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे परंतू प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.

महादीप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती कि,त्यांनी आपल्या मुलांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या पेपरचा सराव करून घ्यावा. असेच सराव पेपर आम्ही आपणासाठी महादीप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.

नक्कीचं आपणास या सराव पेपरचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रानो हा सराव आपणास कसा वाटला हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.

1. समुद्राची खोली मोजण्याचे एकक कोणते ?

फॅदम

2. अग्नीमध्ये न जळणारा पदार्थ कोणता ?     

कार्बनडाय ऑक्साईड

3. निरोगी माणसाचे शरीराचे तापमान किती असते ?

37 अंश सेल्शिअस

4. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे कोणते वारे वाहतात ? 

खारे वारे

5. डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी कोणता शोध लावला ?

वनस्पती संवेदना

6. ‘डेसीबल’ हे कशाचे मापक आहे ?

ध्वनी

7. झिंक फॉस्फाईड काय आहे ?

कीटकनाशक

8. दगड खाणारा पक्षी कोणता ?

शहामृग

9. सर्वाधिक अणुउर्जा कोणत्या खनिजापासून निर्माण होते ?

युरेनियम

10. चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात ?

डायॉप्तर

11. विद्युत बल्बमध्ये कोणत्या धातुची तार वापरतात ?

टंगस्टन

12. माणसाच्या कायीक पेशी गुणसुत्राची संख्या किती असते ?

46

13. सुर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती कालावधी लागतो ?

8 मी.30 सेकंद

14. चंद्रग्रहण केव्हा होते ? 

पौर्णिमा

15. ग्रह व ताऱ्यांचे निरीक्षण करणारे उपकरण कोणते ?

टेलिस्कोप

16. गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाने मांडला ?

भास्कराचार्य

17. इलेक्ट्रीकल इस्त्रीमध्ये तापविणारा घटक कोणता ?

नायक्रोम

18. पिसाळलेला कुत्रा चावला तर कोणता रोग होतो ?

रेबीज

19. लसनासारखा वास असलेले मुलद्रव्य कोणते ?

फॉस्फरस

20. कोणता पक्षी दुसऱ्या पक्षाच्या घरट्यात अंडी घालतो ?

कोकिळा

21. अणु युद्ध झालेच तर पृथ्वीवरील एकमेव कोणता प्राणी जगू शकेल ?

झुरळ

22. पाऱ्याचा उत्कलन बिंदू किती आहे ? 

357 अंश सेल्शिअस

23. पितळी भांड्यांना कल्हईसाठी कशाचा वापर करतात ?

कथिल

24. पोलाद या संमिश्रामध्ये काय असते ?

लोह व कार्बन

25. कृत्रीम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये कोणत्या रसायनाचा वापर करतात ?

सोडियम क्लोराईड

26. मानवाच्या गुडघ्यातील सांद्याचा प्रकार कोणता ?

चल सांधा

27. तुटलेला तारा हा कोणत्या भौगोलिक घटनेचा प्रकार आहे ?

उल्कापिंग

28. शिवणयंत्राचा शोध कोणी लावला ?

ए. वाईसेन्थल

29. क्युसेक ने कोणती बाब मोजता येते ?

धरणाचा पाणीसाठा

30. वातावरणातील दाब मोजण्याचे साधन कोणते ?

बॅरोमिटर

31. खगोल शास्त्रातील ताऱ्याचे अंतर कशात मोजतात ?      

प्रकाशवर्ष

32. सर्वात जास्त लवचिकता कशात असते ?

रबर

33. रबराच्या अंगी कोणता गुणधर्म असतो ?

रंग/गंध नसतो

34. उष्णता दिल्यास द्रवाच्या आकारमानात काय बदल होतो ?

आकारमान वाढते

35. लांबी x रूंदी x उंची = म्हणजे काय ?

घनफळ

36. १००° C म्हणजे किती फॅरेनाईट ?

212 F

37. प्रतीध्वनी ऐकू येण्यास किमान किती फूट अंतर असावे लागते ?

56 फुट

38. बंदूकीच्या गोळ्या तयार करण्यासाठी कोणता धातू वापरतात ?

शिसे

39. सल्फ्युरीक आम्लाचे रासायनिक सुत्र कोणते ?

H2SO4

40. सर्वात हलका वायु कोणता ?

हेलियम

41. झाडाच्या कोणत्या भागापासून रबर काढतात ?

खोड

42. तांबेरा रोग कोणत्या पिकावर पडतो ?

गहू

43. काळी जमीन कोणत्या पिकासाठी अधिक उपयुक्त ठरते ?

कापूस

44. सॅफ्रॉन (केसर) चा रंग कसा असतो ?

केशरी/लाल

45. अमरवेल ही वनस्पती कोणत्या प्रकारात मोडते ?

परपोशी

46. जीवनद्रव्यामध्ये साधारणतः किती टक्के पाणी असते ?

75 ते 95 %

47. कोणता प्राणी उष्ण रक्ताचा आहे ?

देवमासा

48. सर्वप्रथम जीवाची उत्पत्ती कोठे झाली ?     

पाण्यात

49. आधुनिक मानवाला क्रांतीच्या दृष्टीने सर्वात जवळचा प्राणी कोणता ?

चिंपाझी

50. गायीला किती जठरे असतात ?       

एक जठर चार कप्पे

Leave a Comment