महादीप परीक्षा सराव पेपर-01 | Mahadeep Test Paper-01
Mahadeep Test Paper: महादीप परीक्षा 2024-25 सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी महादीप परीक्षा सराव पेपर-01 देत आहोत. Madeep Test Paper-01 हा सराव पेपर 50 प्रश्नांचा असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे परंतू प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.
महादीप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती कि,त्यांनी आपल्या मुलांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या पेपरचा सराव करून घ्यावा. असेच सराव पेपर आम्ही आपणासाठी महादीप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.
नक्कीचं आपणास या सराव पेपरचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रानो हा सराव आपणास कसा वाटला हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.
1. थंड हवेचे ‘चिखलदरा’ हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
अमरावती
2. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे ?
गुरुकुंज मोझरी
3. भूदान चळवळ कोणी सुरू केली ?
विनोबा भावे
4. महाराष्ट्राचे लोकसभेत किती खासदार आहेत ?
48
5. ) कोणत्या नदीच्या खोऱ्यात दगडी कोळसा सापडतो ?
वर्धा
6. लाकडी खेळणी करीता प्रसिद्ध ठिकाण कोणते ?
सावंतवाडी
7. नरनाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
अकोला
8. देवगडची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
सिंधुदुर्ग
9. सर्वात जास्त कच्चे लोखंड उत्पादन कोठे होते ?
ओडीसा
10. चवदार तळे कोठे आहे ?
महाड
11. महानुभाव पंथाची काशी कोठे आहे ?
रीद्धपूर
12. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीचे नाव काय आहे ?
चैत्यभूमी
13. महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोठे आहे ?
मुंबई
14. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणता ?
करबडे
15. शेतीसाठी सात-बारा कोण देतो ?
तलाठी
16. महाराष्ट्रात मॅग्नीजचे उत्पादन किती टक्के होते ?
40 %
17. महाराष्ट्रात मधूमक्षीका पालनासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते?
महाबळेश्वर
18. गावीलगड हा किल्ला कोणत्या पर्वतावर आहे ?
सातपुडा
19. महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालीका आहेत ?
27
20. काजू संशोधन केंद्र कोठे आहे ?
वेंगुर्ला,सिंधुदुर्ग
21. आनंदसागर पर्यटन स्थळ कोठे आहे ?
शेगाव
22. बंजारा समाजाची काशी कोठे आहे ?
पोहरादेवी
23. पारस औष्णीक केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
अकोला
24. महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू कोणते आहे ?
ब्ल्यू मॉरमॉन
25. सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती आहे ?
1200 मीटर
26. पृथ्वीचा उपग्रह कोणता ?
चंद्र
27. पृथ्वीगोलावरील आडव्या रेषांना काय म्हणतात ?
अक्षवृत्त
28. अमरावती विभागात किती जिल्हे आहेत ?
5
29. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे ?
गोदावरी
30. पुलगाव हे शहर कोणत्या नदीकाठी आहे ?
वर्धा
31. महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत्र्याची बाजारपेठ कोठे आहे ?
नागपूर
32. राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
कोल्हापूर
33. महाराष्ट्रातील सर्वात मोठे सरोवर कोणते ?
लोणार
34. शिखांचे दहावे गुरू कोण ?
गुरु गोविंदसिंग
35. महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणते पिक घेतले जाते ?
ज्वारी
36. महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षरतेचा जिल्हा कोणता ?
सिंधुदुर्ग
37. कर्णाळा अभयारण्य हे कशासाठी प्रसिद्ध आहे ?
पक्षी
38. पहिला सहकारी साखर कारखाना कोणता ?
प्रवरानगर
39. मुलींची पहिली शाळा कोठे काढण्यात आली ?
पुणे
40. महाराष्ट्रातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक कोणते ?
भुसावळ
41. महात्मा गांधींचा वर्धा जिल्ह्यातील आश्रम कोणता ?
सेवाग्राम
42. भिमा नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते ?
भीमाशंकर
43. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती चौ.कि.मी. आहे ?
307713 चौ.कि.मी.
44. कोविड-19 च्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते ?
उद्धव ठाकरे
45. बालकदिन केव्हा साजरा करतात ?
14 नोव्हेंबर
46. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे ?
मुंबई
47. सीताफळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते ?
दौलताबाद
48. अरूणावती धरण कोठे आहे ?
चिरकुटा, दिग्रस
49. अणु विद्युत केंद्र कोठे आहे ?
तारापूर
50. मुंगसाजी माऊलीचे समाधीचे ठिकाण कोठे आहे ?
धामणगाव (देव)
Jivika Ramu Nehare