थोर महापुरुषांची छोटी भाषणे | great leader’s small speeches |

By Neha

Published On:

great leader's small speeches थोर महापुरुषांची छोटी भाषणे
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

थोर महापुरुषांची छोटी भाषणे | great leader’s small speeches |

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी

१. नमस्कार मित्रांनो, आज 26 जानेवारी म्हणजे आपल्या देशाचा गणराज्य दिन होय.

२. या दिनानिमित्त आपल्या भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे.

३. महात्मा गांधी यांचा जन्म 02. ऑक्टोबर. 1869 रोजी झाला.

४.त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते.

५.गुजरात राज्यातील साबरमती नदीच्या काठावर वसलेल्या पोरबंदर येथे त्यांचा जन्म झाला.

६. परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेऊन ते बरिस्टर झाले .

७. 1915 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले.

८. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे शेतकरी,कामगार, महिला, विद्यार्थी असे अनेक घटक स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले.

९. त्यांनी ‘करो या मरो ‘ हा मंत्र दिला.

१०. असहकार चळवळ, सविनय कायदेभंग, सत्याग्रह, दांडी यात्रा या माध्यमातून त्यांनी इंग्रजी राजवटीला कडवे आव्हान दिले.

११. महात्मा गांधीना भारताचे राष्ट्रपिता असे म्हणतात.

…जय हिंद, जय भारत ….

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर

1. सर्वाना माझा नमस्कार, माझे नाव ………….. आहे. मी वर्ग …………मध्ये शिकत आहे.

2. आज 26 जानेवारी म्हणजे आपल्या देशाचा गणराज्य दिन होय.

3. आज मी तुम्हाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सांगणार आहे.

4. त्यांचा जन्म 14.एप्रिल.1891 रोजी मध्यप्रदेश राज्यातील महू येथे झाला.

5. त्यांच्या आईचे नाव भीमाई, तर वडिलांचे नाव रामजी होते. 

6. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन ते मोठे नेते बनले.

7. ते थोर देशभक्त होते.

8. त्यांनीच आपल्या भारताची प्रदीर्घ अशी राज्यघटना लिहिली.

9. म्हणूनच डॉ.बाबासाहेबांना ‘भारतीय संविधानाचे शिल्पकार’ असे म्हणतात.

10. ‘मूकनायक’ आणि ‘प्रबुद्ध भारत’ अशा वृत्तपत्रांतून त्यांनी लोकजागृती केली.

11. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी सनदशीर मार्गांचा अवलंब केला.

12. गणराज्य दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा…. जय हिंद, जय भारत ….

आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू

  1. माननीय अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो,
  2. पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री म्हणून ओळखले जातात.
  3. त्यांचा जन्म दिनांक १४ नोव्हेंबर १८८९ रोजी उत्तरप्रदेशातील अलाहाबाद येथे झाला.
  4. त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू, तर आईचे नाव स्वरूपाराणी असे होते.
  5. ते महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात उतरले.
  6. “आराम हराम है”, असा देशवासियांना संदेश देणारे पंडित नेहरू हे वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अंगीकार करणारे नेते होते.
  7. सलग १७ वर्षे ते आपल्या भारताचे प्रधानमंत्री होते.
  8. दि.२७ मे १९६४ रोजी त्यांचे निधन झाले.
  9. त्यांचा जन्मदिवस ‘बालदिन’ म्हणून साजरा केला जातो.
  10. गणराज्य दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा…. जय हिंद, जय भारत …

नेताजी सुभाषचंद्र बोस

  1. माननीय अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो,

    2. मी आज तुम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे.

    3. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23.जानेवारी.1897 रोजी झाला.

    4. ओडिशा राज्यातील कटक येथे त्यांचा जन्म झाला.

    5. त्यांच्या आईचे नाव प्रभावती आणि वडिलांचे नाव जानकीनाथ बोस असे होते.

    6. “तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा” असे आवाहन त्यांनी देशवासीयांना केले.

    7. आझाद हिंद सेनेची स्थापना करून इंग्रजांशी लढणारे ते थोर देशभक्त होते.

    8. त्यांचा जन्मदिवस ‘पराक्रम दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.

    9. विमान अपघातात 18 ऑगस्ट 1945 रोजी त्यांचे निधन झाले.

    10. त्यांच्या पावन स्मृतींना माझे विनम्र अभिवादन ….जय हिंद, जय भारत ….

    शहीद ए आझम वीर भगतसिंग

    1. मी आज तुम्हाला शहीद ए आझम वीर भगतसिंग यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे.

    2. वीर भगतसिंग यांचा जन्म 28.सप्टेंबर.1907 रोजी झाला.

    3. पंजाब राज्यातील बंगा येथे त्यांचा जन्म झाला.

    4. त्यांच्या आईचे नाव विद्यावती व वडिलांचे नाव किशन सिंग होते.

    5. नौजवान भारत सभा, कीर्ती किसान पार्टी आणि हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनांमध्ये ते सक्रीय सहभागी होते.

    6. “माझे जीवन मी हे सर्वोत्कृष्ट कामासाठी समर्पित केले आहे. देशाचे स्वातंत्र्य हेच माझे ध्येय आहे.” असे ते म्हणत.

    7. साम्यवादी समाजरचना व शोषणमुक्त सक्षम समाज घडविण्यासाठी त्यांनी लेनिन, मार्क्स, टॉलस्टाॅय, गॉर्की, बकुनिन यांचे साहित्य अभ्यासले होते.

    8. दि. 23.मार्च.1931 रोजी सुखदेव व राजगुरू यांच्यासह भगतसिंगांना लाहोर येथे फाशी देण्यात आले.

    9. त्यांच्या पावन स्मृतींना माझे विनम्र अभिवादन ….जय हिंद, जय भारत ….

    मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

    1. मी आज तुम्हाला मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे.

    2. तुकडोजी महाराज यांचा जन्म 30.एप्रिल.1909 रोजी झाला.

    3. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात यावली येथे त्यांचा जन्म झाला.

    4. त्यांच्या आईचे नाव मंजुळाबाई व वडिलांचे नाव बंडोजी ठाकूर होते.

    5. इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या तुकडोजीला भजन कीर्तन करण्याचा ध्यास लागला.

    6. याच कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध रान पेटवले.

    7. “या भारतात बंधुभाव नित्य वसू दे”,यासारखी भजने लिहून त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेस हातभार लावला.

    8. लहर की बरखा, ग्रामगीता अशा लोकोपयोगी साहित्यनिर्मितीतून त्यांनी आपली राष्ट्रभक्ती प्रकट केली.

    9. अज्ञान, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार,जातीभेद, अस्वच्छता अशा अनेक समस्यांवर त्यांनी प्रबोधन केले.

    10. दि.11. ऑक्टोबर.1968 रोजी त्यांचे निधन झाले.

    जय हिंद जय भारत…..

    Leave a Comment