डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषणे | Dr. Babasaheb Ambedkar jayanti Speeches |
भाषण क्र.01
- सर्वांना नमस्कार, मी आज तुम्हाला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे.
2. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेश राज्यातील महू येथे लष्करी छावणीत झाला.
3. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई, तर वडिलांचे नाव रामजी होते.
4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे संविधान निर्माते होते.
5. त्यांनी समाजातील अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध लढा दिला.
6. त्यांचे शिक्षण कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे झाले.
7. त्यांनी भारतातील दलितांसाठी अनेक सामाजिक सुधारणा केल्या.
8. ते पहिले कायदामंत्री होते आणि भारतीय संविधानाचा मसुदा त्यांनी तयार केला.
9. १४ ऑक्टोबर, १९५६ मध्ये त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
10.त्यांना “भारतरत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
11. त्यांनी “अन्निहिलेशन ऑफ कास्ट” आणि “बुद्ध आणि त्यांचा धम्म” यासारखी महत्त्वपूर्ण पुस्तके लिहिली.
12. त्यांचे निधन ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे झाले.
भाषण क्र.02
माननीय अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन आणि माझ्या बाल मित्रांनो,
माझे पूर्ण नाव ………………………आहे. मी इयत्ता ….मध्ये शिकत आहे.
आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्या निमित्त मी आपल्यापुढे दोन शब्द बोलणार आहे.
1. दि.14 एप्रिल 1891 रोजी जन्मलेले भीमराव हे अतिशय बुद्धिमान बालक होते.
2. बालपणी त्यांचे वडील रामजी यांनी त्यांना संत कबिरांचे दोहे ऐकवले.
3.तरुण वयात भीमरावांना कृष्णराव अर्जुन केळुसकर गुरुजींनी बुद्धांचे चरित्र भेट दिले.
4. बुद्धांच्या चिकित्सक विचारधारेचा प्रभाव त्यांच्यावर आजन्म राहिला.
5. महाडचा चवदार तळे सत्याग्रह, नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह अशा अनेक घटना त्यांच्या कार्याची दिशा स्पष्ट करणाऱ्या आहेत.
6. भारतीय रिझर्व बँकेची गरज त्यांनी आपल्या ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथात विशद केली.
7. पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज, औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेजची स्थापना करून बहुजनांना शिक्षणाची दारे खुली केली.
8. बाबासाहेबांनी भगवान बुद्ध, संत कबीर आणि महात्मा जोतीराव फुले यांना गुरुस्थानी मानले.
9. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते.
10. त्यांच्या नेतृत्वात लिहिलेली भारतीय राज्यघटना म्हणजे सर्व भारतीयांवर केलेले, कधीही न फिटणारे उपकार आहेत.
त्यांच्या पावन स्मृतींना माझे विनम्र अभिवादन ….जय हिंद, जय भारत ….