जिल्हास्तरीय फेरी महादीप परीक्षा सराव पेपर-10 | District Level Mahadeep Test Paper-10

By Neha

Published On:

District-Level-Mahadeep-Sarav-Paper-10
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

जिल्हास्तरीय फेरी महादीप परीक्षा सराव पेपर-10 | District Level Mahadeep Test Paper-10

District Level Mahadeep Test Paper: महादीप परीक्षा 2024-25 सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी महादीप परीक्षा सराव पेपर-10 देत आहोत. District Level Mahadeep Test Paper-10 हा सराव पेपर 50 प्रश्नांचा असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे. परंतु, प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.

महादीप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती कि,त्यांनी आपल्या मुलांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या पेपरचा सराव करून घ्यावा. असेच सराव पेपर आम्ही आपणासाठी महादीप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.

नक्कीचं आपणास या सराव पेपरचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रानो हा सराव आपणास कसा वाटला हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.

1. गळ घालणे म्हणजे काय ?           

फार आग्रह करणे

2.उपरती म्हणजे काय ?

पश्चाताप होणे

3.”लोखंडाचे चने खाणे” म्हणजे काय ?     

भरपूर परिश्रम घेणे

4.अंगीकार करणे म्हणजे काय ?

स्वीकारणे

5.जीव टांगणीला लागणे म्हणजे काय ?  

चिंताग्रस्त होणे

6.तमा नसणे म्हणजे काय?

पर्वा न करणे

7.’किमान’ या शब्दाचा विरूद्धार्थी शब्द कोणता ?       

कमाल

8. ‘बलवान’ या शब्दाच्या विरूद्धार्थी शब्द कोणता ?

दुर्बल

9. ‘कृपण’ या शब्दाच्या विरूद्धार्थी शब्द कोणता ?

उदार

10. ‘दुष्काळ’ या शब्दाचा विरूद्धार्थी शब्द कोणता ?  

सुकाळ

11.आग्रही याच्या विरूद्धार्थी शब्द कोणता ?

अनाग्रही

12.’उन्नती’ या शब्दाला विरूद्धार्थी शब्द कोणता ?

अवनती

13.’क्षीर’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

दूध

14. ‘उंबराचे फूल’ या शब्दाला अलंकारिक शब्द कोणता ?

दुर्मिळ वस्तू

15. पूल या शब्दाचे लिंग कोणते ?

पुल्लिंग

16.काजूच्या समुहदर्शक शब्दाला काय म्हणतात ?   

गाथण

17. पिकत असलेल्या आंब्याच्या समूहाला काय म्हणतात ?

अढी

18. उंटाच्या समूहाला काय म्हणतात ?

तांडा

19.माणसाच्या समूहाला काय म्हणतात ?

जमाव, गर्दी

20.हत्तीच्या समूहाला काय म्हणतात ?

कळप

21. नाण्यांच्या समूहाला काय म्हणतात ?

चळत

22. पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात ?   

थवा

23. प्रवाशांच्या समूहाला काय म्हणतात ?     

झुंबड

24. मडक्यांच्या समूहाला काय म्हणतात ?

उतरंड

25.) मुलांच्या समूहाला काय म्हणतात ?  

घोळका

26. वाहनांच्या समूहाला काय म्हणतात ?

ताफा

27.बांबूच्या समूहाला काय म्हणतात ?

बेट

28.गाईगुरांच्या समूहाला काय म्हणतात ? 

खिल्लार

29.फळांच्या समूहाला काय म्हणतात ?             

घोस

30. करवंदाच्या समूहाला काय म्हणतात ?

जाळी

31.पालेभाज्यांच्या समूहाला काय म्हणतात ?  

गड्डी/जुडी

32.खेळाडूंच्या समूहाला काय म्हणतात ?      

संघ

33. भाकरीच्या, रूपयांच्या समूहाला काय म्हणतात ?     

चवड

34. वाद्यांच्या समूहाला काय म्हणतात ?     

वृंद

35.मेंढ्यांच्या समूहाला काय म्हणतात ?    

कळप

36.नारळांच्या समूहाला काय म्हणतात ?

ढीग

37.लाकडांच्या / उसाच्या समूहाला काय म्हणतात ? 

मोळी

38. ताऱ्यांच्या समूहाला काय म्हणतात ?  

पुंजका

39. विटांच्या व कलिंगडाच्या समूहाला काय म्हणतात ?

ढीग

40. हरणांच्या समूहाला काय म्हणतात ?

कळप

41.जहाजांच्या समूहाला काय म्हणतात ?        

काफिला

42.कोल्ह्यांच्या आवाजाच्या ध्वनिदर्शक शब्दाला काय म्हणतात ?                 

कोल्हेकुई

43.वाघांच्या ध्वनिदर्शक शब्दाला काय म्हणतात ?  

डरकाळी

44.मोराच्या ध्वनिदर्शक शब्दाला काय म्हणतात ?

केकारव

45.गाईच्या ध्वनिदर्शक शब्दाला काय म्हणतात ?

हंबरणे

46. कोंबड्याच्या ध्वनिदर्शक शब्दाला काय म्हणतात ?         

आरवणे

47. घोड्याच्या ध्वनिदर्शक शब्दाला काय म्हणतात ?

खिंकाळणे

48.कबुतराच्या / पारव्याच्या ध्वनिदर्शक शब्दाला काय म्हणतात ?

घुमणे

49. ढगाच्या ध्वनिदर्शक शब्दाला काय म्हणतात ?  

गडगडाट

50.विजांच्या ध्वनिदर्शक शब्दाला काय म्हणतात ?

कडकडाट

Leave a Comment