जिल्हास्तरीय फेरी महादीप परीक्षा सराव पेपर-04 | District Level Mahadeep Test Paper-04

By Neha

Published On:

District-Level-Mahadeep-Sarav-Paper-04
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

जिल्हास्तरीय फेरी महादीप परीक्षा सराव पेपर-04 | District Level Mahadeep Test Paper-04

District Level Mahadeep Test Paper: महादीप परीक्षा 2024-25 सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी महादीप परीक्षा सराव पेपर-04 देत आहोत. District Level Madeep Test Paper-04 हा सराव पेपर 50 प्रश्नांचा असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे परंतू प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.

महादीप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती कि,त्यांनी आपल्या मुलांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या पेपरचा सराव करून घ्यावा. असेच सराव पेपर आम्ही आपणासाठी महादीप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.

नक्कीचं आपणास या सराव पेपरचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रानो हा सराव आपणास कसा वाटला हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.

1. हृदयातून शरीरात रक्त वाहून नेणाऱ्या नसांना काय म्हणतात ?                

धमन्या

2.लाळेमुळे कोणत्या पदार्थाचे पचन सुरू होते ?

पिष्टमय पदार्थ

3.अन्नाचे शोषण मुख्यतः कोणत्या आंतरेंद्रियात होते ?    

लहान आतडे

4.मानवी चेहऱ्यात एकूण किती हाडे असतात ? 

१४

5.नेत्रभिंग अपारदर्शक होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ? 

मोतीबिंदू

6.चेतासंस्थेचा सर्वात महत्वाचा सुसंघटित भाग कोणता आहे ?

मेंदू

7.नेत्रगोलाच्या बाहेरील आवरणाला काय म्हणतात ?           

श्वेतपटल

8. मेंदूच्या सर्वात मोठ्या भागाला काय मागतात ?

प्रमस्तिष्क

9. भारताने १९ एप्रिल १७९५ रोजी अवकाशात कोणता उपग्रह सोडला ?

आर्यभट्ट

10. मानवी शरीरात विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी कोणते प्रतिजैविके उपयोगात येते ?      

इंटरफेरॉन

11.मोटार गाडयांनी धूर सोडण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात कशाची निर्मिती होते ?

कार्बन मोनॉक्साइड

12.पापोरिया हा आजार कशाशी संबंधित आहे ?

दात

13.गलगंड हा आजार कशामुळे होतो ?  

आयोडीनच्या कमतरतेमुळे

14. डिप्थीरिया या रोगाचा परिणाम मानवाच्या कोणत्या अवयवावर होतो ?

घसा

15. कोणते जीवनसत्व पाण्यात लवकर विरघळते ?   

ब जीवनसत्व

16.क्विनाईन हे तापावरील औषध कोणत्या झाडाच्या सालीपासून तयार करतात ?  

सिंकोना

17. दातावरील कठीण पदार्थ कशाचा बनलेला असतो ? 

एनॅमल

18. मानवी हाडात सर्वात जास्त कोणता रासायनिक घटक असतो ?    

कॅल्शियम

19.भारतातील पहिली न्यूट्रॉन अणुभट्टी ‘कामिनी’ कोठे आहे ?   

कल्पकम

20.मोत्यामध्ये कोणता रासायनिक घटक असतो ?    

कॅल्शियम कार्बोनेट

21.भारतातील पहिला शल्यचिकित्सक कोणाला मानले जाते ?

सुश्रुत

22.भेसळयुक्त मोहरी तेलामुळे हा रोग होतो ?

ड्रॉप सी

23.अस्कॉर्बिक अॅसिड या जीवनसत्वाला म्हणतात ?       

क जीवनसत्व

24.भारत आणि कॅनडाच्या सहकार्याने कोणती अणुभट्टी उभारली ?

सायरस

25.जन्मतःच हृदयात दोष असलेल्या मुलाला काय म्हणतात ?   

ब्लू बेबी

26. ४ ऑगस्ट १९५६ रोजी भारताने  सुरू केलेल्या अणुभट्टीचे नाव काय ?     

अप्सरा

27.रक्ताभिसरणातील दोष शोधण्यास कोणत्या किरणोत्सारी मूलद्रव्याचा वापर करतात?

सोडियम २४

28.ल्युकेमिया ब्लड कॅन्सरवर उपचारासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकांचा वापर करतात ?

फॉस्फरस ३२

29.भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे ?                   

हिमालय

30. भारताच्या पूर्वेला कोणता उपसागर आहे ?

बंगालचा उपसागर

31.भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ?      

अरबी समुद्र

32.भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे ?           

हिन्दी महासागर

33. कोणता व्यापारी मार्ग रेशीम मार्ग माणून ओळखला जातो ?          

चीन ते अरब

34.इ.स. 1947 पूर्वी कोणते देश भारताचा भाग होते ?          

पाकिस्तान-बांगलादेश

35.भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती?   

हडप्पा

36.जगातील सर्वांत मोठे वाळवंट कोणते ?

सहारा

37.आफ्रिका खंडात कोणते वाळवंट आहे ?  

सहारा

38. कोणते वाळवंट राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशात पसरलेले आहे ?

थर

39. हिमाचल प्रदेशात कोणती नदी उगम पावते ?

व्यास नदी

40. पाकिस्तानमध्ये हकरा या नावाने कोणत्या नदीला ओळखते ?

घग्गर नदी

41.दख्खन पठाराच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत ?            

सातपुडा आणि विंध्य पर्वत

42.दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना काय म्हटले जाते ?                     

पूर्व घाट

43.प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य कोणते ?

मौर्य साम्राज्य

44.पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूटान, बांग्लादेश, श्रीलंका व भारताचा भूभाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?

दक्षिण आशिया

45.हडप्पा आणि मोहेंजोदडो ही शहरे कोणत्या देशात आहेत ?      

पाकिस्तान

46. भूर्जपत्र हे कोणत्या वृक्षाच्या सालीपासून बनवले जाते ?        

भूर्ज वृक्ष

47. भूर्ज वृक्ष कोठे आढळते ?

काश्मिर

48.जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे ?

आशिया

49.वैदिक वाड:मयाची भाषा कोणती ?

संस्कृत

50. वैदिक वाड:मयाचा ग्रंथ कोणता ?  

ऋग्वेद

Leave a Comment