जिल्हास्तरीय फेरी महादीप परीक्षा सराव पेपर-01 | District Level Mahadeep Test Paper-01

By Neha

Published On:

District-Level-Mahadeep-Sarav-Paper-01
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

जिल्हास्तरीय फेरी महादीप परीक्षा सराव पेपर-01 | District Level Mahadeep Test Paper-01

District Level Mahadeep Test Paper: महादीप परीक्षा 2024-25 सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी महादीप परीक्षा सराव पेपर-1 देत आहोत. District Level Madeep Test Paper-01 हा सराव पेपर 50 प्रश्नांचा असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे परंतू प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.

महादीप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती कि,त्यांनी आपल्या मुलांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या पेपरचा सराव करून घ्यावा. असेच सराव पेपर आम्ही आपणासाठी महादीप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.

नक्कीचं आपणास या सराव पेपरचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रानो हा सराव आपणास कसा वाटला हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.

1. द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली ?          

1 नोव्हे. 1956

2.महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?

1 मे 1960

3.महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे ?     

3,07,713 चौ.कि.मी.

4.महाराष्ट्र राज्याचा उत्तर-दक्षिण विस्तार किती आहे ?

720 कि.मी.

5.महाराष्ट्र राज्याचा पूर्व-पश्चिम विस्तार किती आहे ?

800 कि.मी.

6.महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून  कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?

नांदेड

7.महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचा जिल्हा म्हणून  कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?      

कोल्हापूर

8. शुरविरांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?

सातारा

9. शिक्षणाचे माहेरघर म्हणून महाराष्ट्रात कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ?

पुणे

10. मिठागरांचा जिल्हा माणून महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे?   

रायगड

11.गोंडराजाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात कोणता जिल्हा ओळखला जातो ?

चंद्रपुर

12.संत्र्याचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात कोणता जिल्हा ओळखला जातो?

नागपुर

13.ऊस कामगारांचा जिल्हा महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?

बीड

14. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?

यवतमाळ

15. काळ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ?

चंद्रपुर

16.घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे ? 

छत्रपती संभाजीनगर

17. त्र्यंबकेश्वर ज्योतिलिंग कोणत्या जिल्ह्यात आहे ?

नाशिक

18. औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे ?  

हिंगोली

19.भीमाशंकर ज्योतिलिंग कोणत्या जिल्ह्यात आहे ?

पुणे

20.परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे ? 

बीड

21.अष्टविनायकातील ‘विघ्नहर गणपती कोठे आहे ?

ओझर (पुणे)

22.अष्टविनायकातील ‘मयुरेश्वर’ गणपती कोठे आहे ?

मोरगाव (पुणे)

23.अष्टविनायकातील चिंतामणी गणपती कोठे आहे ?                

थेऊर (पुणे)

24.अष्टविनायकातील ‘गिरीजात्मक’ गणपती कोठे आहे ?       

लेण्याद्री (पुणे)

25.अष्टविनायकातील ‘महागणपती’ गणपती कोठे आहे ?

रांजणगाव (पुणे)

26. अष्टविनायकातील बल्लाळेश्वर गणपती कोठे आहे ?       

पाली (रायगड)

27.अष्टविनायकातील विनायक गणपती कोठे आहे ? 

महाड (रायगड)

28.अष्टविनायकातील सिध्दी विनायक गणपती कोठे आहे ?     

सिध्दटेक (अहिल्यानगर)

29.एलिफंटा (घारापुरी) गुफा कोठे आहे ?                    

मुंबई

30. अजिंठा, वेरूळ, पितळखोरा गुफा कोठे आहे ?           

छत्रपती संभाजीनगर

31.संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?                    

मुंबई

32.पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?       

नागपुर

33. ताडोबा-इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?         

चंद्रपूर

34.नवेगाव उद्यान कोठे आहे ?       

गोंदिया

35.गुगामल राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

अमरावती

36.खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे ? 

सांगली सातारा कोल्हापूर

37.माळढोक अभयारण्य कोठे आहे ?

अहिल्यानगर

38. मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

अमरावती

39. मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी ओळखले जाते ?   

वाघ

40. नर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

अकोला

41.गौताळा औट्रमघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?                         

छत्रपती संभाजीनगर

42.राधानगरी (गवे) अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?                          

कोल्हापूर

43.आंबाघाट कोणत्या जिल्ह्यामधून जातो ?    

कोल्हापूर-रत्नागिरी

44.भंडारदरा थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? 

अहिल्यानगर

45.माथेरान थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?  

रायगड

46. महाबळेश्वर पांचगणी थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?        

सातारा

47. म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

छत्रपती संभाजीनगर

48.तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

नंदूरबार

49.लोणावळा-खंडाळा थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

पुणे

50.चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

अमरावती

Leave a Comment