छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषणे | Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti speeches |
शिवजयंती भाषण-01
१. माननीय अध्यक्ष महोदय,पूज्य गुरुजन,माझे बालमित्रमैत्रिणी आणि माझ्या गावकरी बांधवांनो,
२. आज दि.19.फेब्रुवारी.2025 म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा 395 वा जयंती उत्सव होय.
३. दि. 19.फेब्रुवारी.1630 रोजी शिवनेरी गडावर राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला.
४.शहाजीराजे भोसले हे त्यांचे वडील होय.
५.आई जिजाऊनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न शिवरायांनी पूर्ण केले.
६. या स्वराज्यात प्रजा सुखी,समाधानी होती.
७. शिवरायांनी त्यांना समतेची,न्यायाची वागणूक दिली.
८. म्हणून आजही आपल्याला शिवरायांची व त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची आठवण होते.
९. या शिवजयंती निमित्य आपल्या सर्वांना शुभेच्छा….. छत्रपती शिवाजी महाराज की जय…
शिवजयंती भाषण-02
1. सर्वाना माझा नमस्कार, माझे नाव ………….. आहे. मी वर्ग …………मध्ये शिकत आहे.
2. माननीय अध्यक्ष महोदय,पूज्य गुरुजन,माझे बालमित्रमैत्रिणी आणि माझ्या गावकरी बांधवांनो,
3. बाल शिवबांवर आई जिजाऊ, वडील शहाजीराजे, वीर बाजी पासलकर यांनी युद्धकला,राज्यकारभार,न्यायदान असे सुसंस्कार केले.
4. आई जिजाऊनी त्यांना बालपणी शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या.
5. बाल शिवबांनी मावळ प्रांतातील विविध जातीजमातीच्या मुलांशी मैत्री केली.
6. पुढे हेच मित्र स्वराज्याचे आधारस्तंभ ठरले.
7. यामध्ये तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, बहिर्जी नाईक, कान्होजी आंग्रे, मुरारबाजी, येसाजी कंक, नेतोजी पालकर, शिवा काशीद, जिवाजी महाले अशा अनेक बहाद्दर मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.
8. सर्व मावळ्यांच्या अथक प्रयत्नांतूनच स्वराज्य उभे राहिले.
9. छत्रपती शिवाजी महाराज हे आपली प्रेरणा आणि आदर्श असायला हवे.
10.या शिवजयंती निमित्य आपल्या सर्वांना शुभेच्छा…छत्रपती शिवाजी महाराज की जय…
शिवजयंती भाषण-03
- माननीय अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो,
- शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली.
- कसेही करून स्वराज्य स्थापन करायचेच,हा निर्धार त्यांनी केला.
- आपल्या मावळ्यांच्या साथीने त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले.
- राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून निवड केली गेली.
- पुढे ही राजधानी बदलून रायगड या किल्ल्यावर स्थलांतरीत झाली.
- येथेच ०६.जून.१६७४ रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला.
- त्यांनी आपल्या आईवडिलांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले.
- शिवराय आता ‘छत्रपती शिवाजी महाराज’ झाले.
- शिव जयंतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा…. जय जिजाऊ.. जय शिवराय…
शिवजयंती भाषण-04
- माननीय अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो,
2. मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे.
3. शिवरायांनी स्वराज्यातील शेतकऱ्यांना कसण्यासाठी जमिनी दिल्या.
4. बी-बियाणे,शेतीची औजारे दिली.
5. दुष्काळात शेतसारा माफ केला.
6. त्यांनी कधीही परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहिले नाही.
7. शिवरायांनी रयतेला पोटच्या लेकराप्रमाणे वागवले.
8. त्यांनी कधीही कोणत्याही धर्माचा द्वेष केला नाही.
9. अन्याय व अत्याचाराला तेथे स्थान नव्हते.
10.स्वराज्यात विविध जाती धर्माची माणसं शांततेने नांदत होती.
शिवजयंती निमित्य आपल्या सर्वांना शुभेच्छा….. छत्रपती शिवाजी महाराज की जय…
शिवजयंती भाषण-05
1. माननीय अध्यक्ष महोदय,पूज्य गुरुजन,माझे बालमित्रमैत्रिणी आणि माझ्या गावकरी बांधवांनो,
2. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सांगणार आहे.
3. छत्रपती शिवराय अत्यंत बुद्धिमान व्यक्ती होते.
4. त्यांना विविध भाषांचे ज्ञान होते.
5.ते सज्जनांचे कैवारी होते आणि दुर्जनांचे कर्दनकाळ होते.
6. त्यांनी समुद्रात आपले सैन्य उभे करून शत्रूंना जेरीस आणले.
7. त्यांना भारतीय आरमाराचे जनक असे म्हणतात.
8. त्यांनी कधीही पंचांग पाहून,मुहूर्त पाहून लढाया केल्या नाही. परंतु, तरीही शिवराय सतत यशस्वी होत राहिले.
9. रायगड, प्रतापगड, पुरंदर, सिंधुदुर्ग, राजगड, पन्हाळा हे किल्ले आजही शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देतात.
10. या शिवजयंती निमित्य आपल्या सर्वांना शुभेच्छा….. छत्रपती शिवाजी महाराज की जय…
शिवजयंती भाषण-06
1. माननीय अध्यक्ष महोदय,पूज्य गुरुजन,माझे बालमित्रमैत्रिणी आणि माझ्या गावकरी बांधवांनो,
2. मोठी स्वप्न पहावी आणि ती पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून द्यावे, ही शिकवण देणारे थोर व्यक्तीमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय.
3. शून्यातूनही विश्व निर्माण करता येते, ही शिकवण देणारे थोर व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजी महाराज होय.
4. प्रेरणा आणि ऊर्जा मिळण्यासाठी पुरेसे ठरणारे एकमेव नाव म्हणजे शिवाजी महाराज होय.
5. समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुभावाचं प्रतिक म्हणजे शिवराय होय.
6. संपूर्ण जगातील योद्ध्यांचे प्रेरणास्थान म्हणजे आपले शिवराय होय.
7. “परनारी रखुमाई समान” हे तत्व स्वतःसह आपल्या सैन्यालाही अंगीकारायला लावणारे थोरपुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय.
8. पर्यावरणाचे रक्षण कसे करावे, याचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारे शिवराय हे आपले आदर्श आहेत.
9. अज्ञान, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार,जातीभेद, अस्वच्छता अशा अनेक समस्या आपल्या वर्तनातून दूर सारणारे थोर व महान व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजी महाराज होय.
10. या शिवजयंती निमित्य आपण त्यांच्या विचारांचा जागर करूया…
शिवजयंतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा…..छत्रपती शिवाजी महाराज की जय…