shabdsamuhabadal ek shabd | शब्द समूहाबद्दल एक शब्द | भाग 2
शब्द समूहाबद्दल एक शब्द म्हणजे काय ?
अर्थ – शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे अनेक शब्दांच्या एका वाक्याचा एकच शब्द तयार होणे होय.
उदाहरणार्थ, कथा लिहिणारा – कथाकार
शब्द समूहाबद्दल एक शब्द | shabdsamuhabadal ek shabd
- अग्रपूजा – सन्मानाने प्रथम केलेली पूजा
- अश्रुतपूर्व – पूर्वी कधीही न ऐकलेले
- अभ्राच्छादित – ढगांनी झाकलेले
- आगंतुक – सूचना न देता येणारा पाहुणा
- अन्योक्ती – एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे
- अजातशत्रू – ज्याला एकही शत्रू नाही असा
- अरण्यरुदन -अतिशय मोठ्याने व तीव्र वेदनेने केलेला शोक
- अलभ्यलाभ – अतिशय दुर्मिळ गोष्ट प्राप्त होणे
- आमरण – मरण येईपर्यंत
- आजानुबाहू – ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा
- आसेतुहिमाचल – हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत
- आपादमस्तक – संपूर्ण शरीरभर किंवा पायापासून डोक्यापर्यंत
- आस्तिक – देव आहे असे मानणारा
- आत्मवृत्त, आत्मचरित्र – स्वतःच लिहिलेले स्वतः चरित्र
- उभयचर – जमिनीवर आणि पाण्यात दोन्हीही ठिका राहू शकणारा
- उत्तरायण – सूर्याचे उत्तरेकडे जाणे
- उःशाप – शापापासून सुटका
- एकलकोंडा – सतत एकटे राहण्याची आवड असलेला
- अंगाईगीत – लहान मुलाला झोपविण्यासाठी म्हटलय गीत
- आरंभशूर – कोणत्याही गोष्टीची उत्साहाने सुरुवात करणारा पण ती पूर्णतः तडीस न नेणारा
- अनादि – ज्याचा आरंभ माहित नाही
- अन्नछत्र – मोफत अन्न मिळण्याचे ठिकाण
- अनुपम, अनुपमेय – ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही असे
- अनुज – मागाहून जन्मलेला (धाकटा भाऊ)
- अभूतपूर्व – पूर्वी कधीही न घडलेले
- अष्टावधानी – एकाच वेळी अनेक अवधाने राखून काम करणारा
- अनन्यभक्ती एखाद्या देवावर असलेली अविचल श्रध्दा
- अद्वैत – परमेश्वराशी पूर्णतः एकरूप होणे
- अकारविल्हेक्रम मुळाक्षरे व बाराखडीच्या क्रमाने केलेली मांडणी
- आसन्नमरण – मरणाच्या दारात असलेला
- इतिकर्तव्यता – जीवनाचे आवडते व प्रमुख ध्येय
- इष्टापत्ती – शत्रुची आपल्याला अनुकुल अशी कृती
- अंगचोर – अंग राखून काम करणारा
- कर्तव्यपराङ्मुख – कर्तव्याकडे पाठ फिरविणारा
- कर्णमधूर – कानास गोड लागणारे
- काथवट – भाकरी करण्याची लाकडी परात
- कामधेनू – सर्व इच्छा पूर्ण करणारी (पुराणात कल्पिलेली) गाय
- कृष्णपक्ष – अंधाऱ्या रात्रींचा पंधरवडा
- कृतघ्न – केलेले उपकार विसरणारा
- कृतज्ञ – केलेले उपकार जाणणारा
- कुंजविहारी – कुंजात विहार करणारा
- गर्भश्रीमंत – जन्मतःच श्रीमंत असलेला
- गजगामिनी – जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशी
- गावगाडा – गावाचा कारभार
- पदन्यास – डौलदार वा दिमाखदार चाल
- पंचामृत – दूध, दही, लोणी, मध व साखर यांचे पवित्र मिश्रण
- पाथरवट – दगडाला विशिष्ट आकार देणारा दगड घडविणारा
- प्रतिक्रांती – क्रांतिविरोधी केलेला उठाव
- प्रलयकाळ – जगाचा नाश होण्याची वेळ
- बहुश्रुत – ज्याने खूप काही ऐकले आहे असा
- बुध्दिंप्रामाण्यवादी – बुध्दी प्रमाण मानून त्याप्रमाणे वागणारा
- कर्णोपकर्णी – कानोकानी पसलेली गोष्ट
- कुलाचार – कुटुंबाच्या पारंपरिक धार्मिक प्रथा परंपरा
- घरकोंबडा – नेहमी घरात बसून राहणारा
- गिरिजन – डोंगरात राहणारे लोक
- गुरुबंधू – गुरूकडे आपल्याबरोबर शिकणारा
- चतुष्पाद – चार पायांवर चालणारा
- चतुर्वेदी – चारही वेदांमध्ये पारंगत असणारा
- चक्रपाणी – ज्याच्या हातात चक्र आहे असा
- चिरंजीव – पुष्कळ दिवस जगणारा
- चंद्रमुखी – जिचे मुख चंद्राप्रमाणे आहे अशी
- जागल्या – रात्री जागून गावात पहारा करणारा
- तहनामा – तहांच्या अटींची सनद
- ताम्रपट – तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख
- दक्षिणायन – सूर्याचे दक्षिणकडे जाणे
- गोरजमुहूर्त – सूर्यास्तापूर्वीची व नंतरची ३० पळे मिळून बनणारा विवाहासाठीचा पवित्र मुहूर्त
- दरवेशी – अस्वलांचा खेळ करणारा
- दिवाभीत – दिवसाला भिणारे, घुबड
- द्विज – दोन वेळा जन्मलेला
- दिपस्तंभ – जहाजांना दिशा दाखविणारा मनोऱ्यावरील दिवा
- द्वीपकल्प – तीन बाजूंनी पाणी असलेला प्रदेश
- देशांतर – एक देश सोडून दुसऱ्या देशात जाणे
- दैववादी – नशिबावर विश्वास ठेवून वागणारा
- दैनिक – दररोज प्रसिध्द होणारे
- दंतकथा – एकाने दुसऱ्यास सांगणे या पध्दतीने वर्षानुवर्षे चालत आलेली, परंतु आधार नसलेली गोष्ट
- धर्मातर – एक धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणे
- धर्मशाळा – यात्रेकरूंच्या निवाऱ्यासाठी धर्मार्थ बांधलेली इमारत
- नखशिखांत – शंडीपर्यंत पायाच्या नखापासून डोक्याच्या
- न्यायनिष्ठूर – न्याय देण्याच्या बाबतीत कठोर
- निरपेक्ष – कसलीही अपेक्षा नसणारा
- निर्भय – ज्याला कशाचीही भीती वाटत नाही असा
- नेत्रपल्लवी – डोळ्यांनी ऐकमेकांना केलेल्या खाणाखुणा
- निष्पक्षपाती – कोणत्याही पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा
- निर्वासित – घरादारास व मायभूमीस मुकलेला
- निशाचर – रात्री फिरणारा
- नियतकालिक – ठराविक कालानंतर प्रसिध्द होणारे
- टाकसाळ – नाणी पाडण्याचा कारखाना
- पर्वणी -फार दिवसांनी येणारी संधी वा शुभकाल
- परिचारिका – रोग्याची शुश्रुषा करणारी सेविका
- पंचवटी – पाच वडांचा समुदाय असलेली जागा
- पंचक्रोशी – विशिष्ट स्थळापासून पाच कोसांचा प्रदेश
- पंधरवडा – पंधरा दिवसांचा कालावधी
- पंकज – चिखलात उगवलेले कमळ
- पागा – घोडे बांधण्याची जागा
- पाक्षिक – पंधरा दिवसांनी प्रसिध्द होणारे
- पाणबुडी – पाण्याखालून संचार करणारी युध्दनौका
- पाणपोई – मोफत पाणीवाटपाची केलेली सोय
- पारलौकिक – या जगापलीकडील जग
- परकायाप्रवेश – शरीरात प्रवेश करणे जादूच्या सहाय्याने दुसऱ्याच्या
- बेट – चारी बाजूंनी पाण्याने वेढलेला प्रदेश
- भाकडकथा – निरर्थक गोष्टी किंवा गप्पा
- भाट – राजाची स्तुती करणारा
- मदारी – माकडांचा खेळ करणारा
- मदिराक्षी – जिचे डोळे मदिरेप्रमाणे धुंद आहेत अशी
- बहुउद्देशीय – अनेक हेतू बाळगून करावयाची गोष्ट
- माहूत – हत्तीला काबूत ठेवणारा
- मन्यांतर – एका युगाचा कालावधी
- मरणोन्मुख – मरणाच्या बेतात असलेला
- माथाडी – डोक्यावरून ओझे वाहून नेणारा
- मचाण – मांडव पिकांची राखण करण्यासाठी घातलेला
- मूर्तिभंजक – मूर्तीचा नाश करणारा
- मृत्युंजय – ज्याने मृत्यूवर विजय मिळविला आहे असा
- मूर्खशिरोमणी अतिशय मूर्खपणा करणाऱ्या मूर्खातील मूर्ख
- मिताहारी – मोजका आहार नेमाने घेणारा
- मृगनयना – जिचे डोळे हरिणीच्या डोळ्यांप्रमाणे सुंदर आहेत अशी
- रामबाण – हमखास लागू पडणारा उपाय
- रामप्रहर – पहाटेचर्चा सुखद समय
- लोकोत्तर – सामान्य माणसांमध्ये न आढळणारे गुण असणारा
- लब्ध प्रतिष्ठित – खोटा वा पोकळ अभिमान वाटणारा केवळ स्वतःचा बडेजाव मिरविणारा
- रणकंदन – अतिशय तुंबळ असे युध्द
- रंध्रान्वेषी – सूक्ष्म दोषदेखील शोधून काढणारा
- वडवानल – समुद्राला लागलेली प्रचंड अशी आग
- वज्राघात – अतिशय भीषण असा प्रहार
- व्यवच्छेदक – दोन गोष्टीतील फरक स्पष्ट करणारे
- विदग्ध – जळून राख झालेले
- विजिगीषा – विजयासाठीची तीव्र इच्छा
- वल्कल – झाडांच्या सालींपासून बनविलेले वस्त्र
- वामकुक्षी – दुपारच्या भोजनानंतरची डाव्या कुशीवरची अल्पशी निद्रा
- वार्षिक – प्रतिवर्षी प्रकाशित होणारे
- विधूर – ज्याची पत्नी मृत्यू पावली आहे असा
- शतपावली – जेवण झाल्यानंतर थोडेसे अंतर फिरण्याचा परिपाठ
- शुक्लपक्ष – चांदण्या रात्रींचा पंधरवडा
- सभाधीट – सभेत निभर्यपणे भाषण करणारा
- विरहिणी – विरहाच्या वेदनने पोळणारी स्त्री
- वृंदगायन – सामुहिकपणे केलेले गायन
- शककर्ता – एका नवीन युगाची स्थापना करणारा
- शापमोचन – विशिष्ट शापापासून मूक्त होणे
- शीघ्रकवी – एखाद्या विषयानुरोधानें तात्काळ कविता करणारा
- श्राव्य – ऐकता येण्याजोगे / ऐकण्यासाठी योग्य
- षोडशोपचार – सोळा वस्तूंसह केलेली पूजा
- साम्यवादी – समाजात समता नांदावी असे म्हणणा
- संन्याशी – संसाराचा त्याग केलेला
- संपादक – वृत्तपत्र वा तत्सम प्रकाशानांचे संपादन करणारा
- संधिप्रकाश – सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर दिसणारा प्रकाश
- साप्ताहिक – आठवड्याने प्रसिध्द होणारे वर्तमानपत्र
- सांडणीस्वार – उंटावरून टपाल नेणारा स्वार
- सुखलोलुप – सुखाच्या मागे लागलेला
- स्थानबध्द – एकाच ठिकाणी राहण्याची सक्ती केली गेलेला
- स्वाभिमानशून्य – स्वत्त्वाच्या अभिमानाचा अभाव असलेला
- स्थितप्रज्ञ – कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुध्दी स्थिर असते असा
- सिंहकटी – जिची कमर सिंहाच्या कमरेप्रमाणे बारीक आहे अशी
- सिंहावलोकन – मागील कालखंडाचा आढावा घेणे
- शैव – शंकराची उपासना करणारा
- संक्रामक – अवस्थांतर वा बदल होत असलेला
- सचैल स्नान – अंगावर पूर्ण कपडे ठेऊन केलेली मनसोक्त आंघोळ
- सडासंमार्जन – झाडलोट सडा टाकणे, रांगोळी काढणे इत्यादी
- संततधार – न थांबता अविरत पंडणारा पाऊस
- सव्यापसव्य – चांगल्या वाईट, डाव्या उजव्या अशा दोन्ही गोष्टी
- सासुरवास – विवाहित स्त्रीला सासरी मिळणारी वाईट वागणूक
- हविर्भाग – यज्ञात टाकावयाचा भाग किंवा पदार्थ
- हृदयद्रावक – मनाला पाझर फोडणारी
- षण्मासिक – सहा महिन्यांतून एकदा प्रसिध्द होणारे
- त्रैमासिक – तीन महिन्यांतून एकदा प्रसिध्द होणारे
- युगप्रवर्तक – युग-परिवर्तन करणारा
- स्वगत – स्वतःशीच केलेले भाषण
- खग – आकाशात गमन करणारा
- सुतोवाच – एखाद्या गोष्टीची केलेली प्रस्तावना
- हेत्वारोप – जाणिवपूर्वक दोष देण्याच्या हेतूने केलेय आरोप
- क्षंतव्य – क्षमा करण्यास योग्य
- पंचांग – तिथी, वार, नक्षत्र, योग व करण या पाच दिनवैशिष्ट्यांची माहिती असणारी पुस्तिका
- मनकवंडा – दुसऱ्याच्या मनातील विचार जाणणारा
- क्षीराब्धि – दुधाचा समुद्र
- ज्ञानोपासक – शोध घेणारा अभ्यास साधनेद्वारा शहाणपणाचा
- मितव्ययी – काटकसरीने राहणारा
- झावळ्या – नारळाच्या झाडाची पाने
- तगाई – शेतकऱ्यांना मिळणारे शासकीय कर्ज
- लवाद – उभयपक्षांच्या सहमतीने नेमलेला मध्यस्थ
- ज्वालामुखी – ज्याच्या तोंडातून ज्वाळा निघतात असा पर्वत
- तुलादान – आपल्या वजना एवढ्या वस्तुंचे केलेले दान
- तैलबुध्दी – एखादी गोष्ट लवकर आकलन होणारा
- पारिश्रमिक – कामाचा द्रव्यरुप मोबदला
- रक्षा करणारा – रक्षक
- लग्नासाठी जमलेले लोक – वराडी
- प्राणी एकत्र ठेवण्याची जागा – प्राणीसंग्रहालय
- जगाचा नाश होण्याची वेळ – प्रलयकाळ
- पाहण्यायोग्य वस्तू मांडलेली जागा – प्रदर्शन
- पिण्यास योग्य असलेला द्रव पदार्थ- पेय
- लोकांनी मान्यता दिलेला – लोकमान्य
- लोकांच्या मदतीने चाललेले राज्य – प्रजासत्ताक
- पीक न उगवणारी जमीन – नापीक
- पुन्हा मिळालेला जन्म – पुनर्जन्म
- शोध लावणारा – संशोधक
- पाण्याखालून चालणारी बोट – पाणबुडी
- शहाणपणा अर्थात मूर्ख – दीडशहाणा
- लोकांचे पुढारी पण करणारा – पुढारी
- बर्फाने आछाडलेले – बर्फाच्छादित
- समाजाची सेवा करणारा – समाजसेवक
- बरोबर की चूक योग्य की अयोग्य हा विचार न करता ठेवलेली श्रद्धा – अंधश्रद्धा
- संकट दूर करणारा – विघ्नहर्ता
- बारकाईने चौकशी करणारा – चिकित्सक
- भविष्य सांगणारा – ज्योतिषी
- स्वतःबद्दल अभिमान असलेला – स्वाभिमानी
- मनाला वाटेल तसे – मनसोक्त
- लग्न झालेल्या मुलीच्या आई वडिलांचे घर – माहेर
- मिठाई तयार करणारा – हलवाई
- मालाच्या देव घेवाण च्या व्यवहारात मिळणारा मोबदला – अडत
- ज्याला खंड नाही असा – अखंड
- सुंदर असलेले – निसर्गसुंदर
- मोजकाच आहार घेणारा – मिताहारी
- मोजकेच बोलणारा – मितभाषी
- ज्याची किंमत होऊ शकत नाही असा – अनमोल
- देव लोकातील स्त्रिया – अप्सरा
- रक्त गोळा करून ठेवण्याचे ठिकाण – रक्तपेढी
- पूर्वी कधीही पडले नाही असे – अपूर्व
- राष्ट्राला पित्याप्रमाणे असणारा – राष्ट्रपिता
- जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे वाटणे -आभास
- लहानपणी मिळालेले वळण किंवा शिक्षण – बाळकडू
- लहान मुलांना समजेल असे – बालबोध
- मृत्यूवर विजय मिळवणारा – मृत्युंजय
- लोकांच्या सत्तेखाली त्यांच्या संमतीने त्यांच्या हितासाठी असलेली राज्यपद्धत – लोकशाही
- व्यवस्थित आखलेले – रेखीव
- वर्तमानपत्र चालवणारा – संपादक
- वनात राहणारे लोक – वनवासी
- वनस्पतीच्या मुळाशी पाणी साठण्यासाठी केलेला खोलगट भाग – आळे
- वाजवीपेक्षा कमी खर्च करणारा – कंजूस
- वारस नसलेला – बेवारशी
- मोठ्या शहराला लागून असलेले लहान नगर – उपनगर
- वाईट मार्गाने जाणारा – अधोगामी
- विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी जबरदस्त इच्छा – महत्त्वकांक्षा
- विशिष्ट ध्येय समोर ठेवून वागणारा – ध्येयनिष्ट
- विवाह समय नवरा नवरी मध्ये धरायची वस्त्र – अंतरपाट
- कमळासारखे डोळे आहेत अशी-कमलनयना
- कामात तत्पर असलेला – कार्यतत्पर
- खूप आयुष्य असलेला – दीर्घायुषी
- कविता गाऊन दाखवणारे – काव्यगायिका
- दुसऱ्या मध्ये न मिसळणारा – एकलकोंडा
- गावाभोवताचा तट – गावकूस
- जे माहित नाही ते – अज्ञात
- ज्याच्या हातात चक्र आहे असा – चक्रधर
शब्द समूहाबद्दल एक शब्द मराठी PDF डाऊनलोड करा 👇