shabdsamuhabadal ek shabd | शब्द समूहाबद्दल एक शब्द |

By Neha

Published On:

shabdsamuhabaddal-ek-shabd-1
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

shabdsamuhabadal ek shabd | शब्द समूहाबद्दल एक शब्द |

शब्द समूहाबद्दल एक शब्द म्हणजे काय ?

अर्थ – शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे अनेक शब्दांच्या एका वाक्याचा एकच शब्द तयार होणे होय. 

उदाहरणार्थ, कादंबरी लिहिणारा – कादंबरीकार.

शब्द समूहाबद्दल एक शब्द | shabdsamuhabadal ek shabd |

  • १. दुसऱ्यावर जिवंत राहणारा – उपजीवी
  • २.अन्न देणारा – अन्नदाता
  • ३.ज्याचा विसर पडणार नाही असा – अविस्मरणीय
  • ४.पायात काहीही न घालणारा – अनवाणी
  • ५.एखाद्याचे मागून येणे – अनुगमन
  • ६.माहिती नसलेला – अज्ञानी
  • ७.राखून काम करणारा – अंगचोर
  • ८.शिल्लक राहिलेले – उर्वरित
  • ९.वाटेल तसा पैसा खर्च करणे – उधळपट्टी
  • १०. थोरपुरुष, समाजसेवक, साधू ,संत यांच्या जन्मतिथीचा दिवस – जयंती
  • ११.सूर्योदयापूर्वीची वेळ – उषःकाल
  • १२.नदीची सुरुवात होते ते ठिकाण – उगम
  • १३.कविता करणारा – कवी
  • १४.कविता करणारी – कवयत्री
  • १५.कादंबरी लिहिणारा – कादंबरीकार
  • १६.सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष – कल्पवृक्ष
  • १७.दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा – कनवाळू
  • १८.कलेची आवड असणारा – कलाप्रेमी
  • १९.सतत कष्ट करणारा – कष्टाळू
  • २०.कार्य करण्याची जागा – कर्मभूमी
  • २१.देवालयाचे शिखराचे टोक – कळस
  • २२.सहसा न घडणारे – क्वचित
  • २३.केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा – कृतज्ञ
  • २४.केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा – कृतघ्न
  • २५.आकाशात गमन करणारा – खग
  • २६.नदीच्या दोन्ही बाजूंचा सुपीक प्रदेश – खोरे
  • २७.दोन डोंगरामधील चिंचोली वाट – खिंड
  • २८.एकाच वेळी अनेक जण बोलत असल्यामुळे होणारा आवाज – गलका
  • २९.भावनेच्या अतिरेकाने कंठ दाटून येणे – गहिवर
  • ३०.देवळाच्या आतील भाग -गाभारा
  • ३१.नेहमी घरात बसून राहणारा – घरकोंबडा
  • ३२.ज्याच्या हातात चक्र आहे असा – चक्रधारी
  • ३३.नक्षत्रासारखी सुंदर स्त्री – चटकचांदणी
  • ३४.गावच्या कामकाजाची जागा – चावडी
  • ३५.चार रस्ते एकत्र मिळालेले ठिकाण – चौक
  • ३६.चित्रे काढणारा – चित्रकार
  • ३७.जगाचा स्वामी – जगन्नाथ
  • ३८.जेथे जन्म झाला आहे तो देश – जन्मभूमी
  • ३९.पाण्यात राहणारे प्राणी – जलचर
  • ४०.पाण्यामध्ये जन्मणारा प्राणी – जलज
  • ४१.जाणून घेण्याची इच्छा – जिज्ञासा
  • ४२.जीवाला जीव देणारा मित्र – जिवलग
  • ४३.खूप जोरात किंवा एक सारख्या टाळ्या वाजवणे – टाळ्यांचा कडकडाट
  • ४४.झाडांचा दाट समूह – झाडी
  • ४५.सतत पडणारा पाऊस – झडी
  • ४६.कधीही मृत्यू न येणारा – अमर
  • ४७.मिळून मिसळून वागणारा – मनमिळावू
  • ४८.गुप्त बातम्या काढणारा – गुप्तहेर
  • ४९.आई-वडील नसणारा – अनाथ
  • ५०.विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा – वस्तीग्रह
  • ५१.संख्या मोजता न येणारा – असंख्य
  • ५२.कोणतीही तक्रार न करणारा – विनातक्रार
  • ५३.देवावर विश्वास ठेवणारा – आस्तिक
  • ५४.महिन्यातून प्रसिद्ध होणारे – मासिक
  • ५५.मन आकर्षण करणारे – मनमोहक
  • ५६.दगडासारखे हृदय असणारा – पाषाणहृदयी
  • ५७.दुसऱ्यांना मार्गदर्शन करणारा – मार्गदर्शक
  • ५८.सत्याचा आग्रह धरणारा – सत्याग्रही
  • ५९.कधीही न जिंकला जाणारा – अजिंक्य
  • ६०.कायमचे लक्षात राहणारे – अविस्मरणीय
  • ६१.लोकांचे नेतृत्व करणारा – नेता
  • ६२.लोकांची वस्ती नसलेला भाग – निर्जन
  • ६३.श्रम करून जगणारा – श्रमजीवी
  • ६४.भले हो अशी मंगल कामना – आशीर्वाद
  • ६५.अग्नीची पूजा करणारा – अग्निपूजक
  • ६६.दान करणारा – दानशूर
  • ६७.देशासाठी लढणारा – देशभक्त
  • ६८.दुसऱ्यावर अवलंबून असणारा – परावलंबी
  • ६९.ईश्वराच अस्तित्व न मानणारा – नास्तिक
  • ७0.थोडक्यात समाधान मानणारा – अल्पसंतुष्ट
  • ७१,.एखाद्या संस्थेची स्थापना करणारा – संस्थापक
  • ७२.सेवा करणारा – सेवक
  • ७३.शंभर वर्षे आयुष्य जगणारा – शतायुषी
  • ७४.स्वतःचे काम स्वतः करणारा – स्वावलंबी
  • ७५.स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारा – स्वच्छंदी
  • ७६.श्रम करून जीवन जगणारा – श्रमिक
  • ७७.जमिनीचे दान – भूदान  
  • ७८.वाट दाखवणारा – वाटाड्या
  • ७९.देशासाठी प्राण अर्पण करणारा – हुतात्मा
  • ८०.क्षमा करणारी व्यक्ती – क्षमाशील
  • ८१.दगडावर कोरीव काम करून मूर्ती बनवणारा – मूर्तिकार
  • ८२.अस्वलाचा खेळ करणारा – दरवेशी
  • ८३.गावच्या न्याय निवाड्याची जागा – चावडी
  • ८४.ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असे – अतुलनीय
  • ८५.वर्णन करता येणार नाही असे – अवर्णनीय
  • ८६.किल्ल्याच्या भोवती बांधलेली भिंत – तट
  • ८७.धान्य साठवण्याची जागा – कोठार
  • ८८.कोणत्याही क्षेत्रात एकाकी घडून येणारा मोठा बदल – क्रांती
  • ८९.कसलाही लोभ नसलेला – निर्लोभी
  • ९०.पाणी मिळण्याची केलेली फुकट सोय – पाणपोई
  • ९१.लोकांना आवडणारा – लोकप्रिय
  • ९२.वर्षाने प्रसिद्ध होणारे – वार्षिक
  • ९३.आपल्या देशात तयार झालेल्या वस्तू –  स्वदेशी
  • ९४.मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व – सूत्र
  • ९५.क्षणात नष्ट होणारे – क्षणभंगुर
  • ९६.केवळ स्वतःचा फायदा करून पाहणारा – स्वार्थी
  • ९७.कैदी ठेवण्याची जागा – तुरुंग
  • ९८.शरण आलेला –  शरणागत
  • ९९.लाज नाही असा -निर्लज्ज  
  • १००.वाद्य वाजवणारा – वादक
  • १०१.वाडवलांनी मिळवलेली संपत्ती – वडीलोपार्जित
  • १०२.शोध लावणारा – संशोधक
  • १०३.ऐकायला येत नाही असा – बहिरा
  • १०४.ऐकायला व बोलायला येत नाही असा – मूकबधिर
  • १०५.कथा सांगणारा – कथेकार
  • १०६.कपडे शिवण्याचे काम करणारा – शिंपी
  • १०७.कपडे धुण्याचे काम करणारा –  धोबी
  • १०८.खूप पाऊस पडणे – अतिवृष्टी
  • १०९.खूप आयुष्य असणारा –  दीर्घायुषी
  • ११०.गुरे राखणारा – गुराखी
  • १११.घरापुढे मोकळी जागा – अंगण
  • ११२.घरे बांधणारा –  गवंडी
  • ११३.जादूचे खेळ करून दाखवणारा – जादूगर
  • ११४.जिथे वस्तू विकल्या जातात ती जागा – दुकान
  • ११५.जमिनीवर राहणारे प्राणी – भूचर
  • ११६.लाकूड काम करणारा –  सुतार
  • ११७.अनेक फळांचा समूह –  घोस
  • ११८.झाडांची निगा राखणारा –  माळी
  • ११९.उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह – धबधबा
  • १२०.दररोज प्रसिद्ध होणारे –  दैनिक
  • १२१.आठवड्याने प्रसिद्ध होणारे –  साप्ताहिक
  • १२२.दारावरील पहारेकरी –  द्वारपाल
  • १२३.दुसऱ्यावर उपकार करणारा –  परोपकारी
  • १२४.देवा पुढे सतत जळणारा दिवा –  नंदादीप
  • १२५.पायी चालणारा – पादचारी
  • १२६.बस गाड्या थांबण्याची जागा –  बसस्थानक
  • १२७.भाषण करणारा – वक्ता
  • १२८.रणांगणावर आलेले मरण –  वीरमरण
  • १२९.सोन्या चांदीचे दागिने करणारा –  सोनार
  • १३०.हाताच्या बोटात घालायचा दागिना –  अंगठी
  • १३१.अनेक केळ्यांचा समूह – घड
  • १३२.विमान चालवणारा – वैमानिक
  • १३३.शत्रूला सामील झालेला –  फितूर
  • १३४.शेती करणारा – शेतकरी
  • १३५.माकडाचा खेळ करणारा –  मदारी
  • १३६.लेखन करणारा –  लेखक
  • १३७.चांगला विचार –  सुविचार
  • १३८.दर तीन महिन्यातून प्रसिद्ध होणारे – त्रैमासिक
  • १३९.जंगलात लागलेली आग – बनवा
  • १४०.दोन नद्या एकत्र मिळण्याची जागा –  संगम
  • १४१.सदा सुख देणारा –  सुखदाता
  • १४२.पावसाचे पाणी पिऊन जगणारा पक्षीचा –  चातक  
  • १४३.कर्जाच्या खाली दबलेला –  कर्जबाजारी
  • १४४.शंभर वर्ष आयुष्य जगणारा –  शतायुषी
  • १४५.शेजाऱ्याशी वागण्याची पद्धत –  शेजारधर्म
  • १४६.अग्नि विज्ल्यानंतर  राहणारी पांढरी भुकटी –  राख
  • १४७.अनेक चांगला गुणांनी युक्त असणारा – अष्टपैलू
  • १४८.स्वतःविषयीचे चरित्र – आत्मचरित्र
  • १४९.स्वतःची कोणतीही वस्तू सहज देणारा –  उदार
  • १५०.आवरता येणार नाही असे –  अनावर
  • १५१.आईचे मुलांविषयी प्रेम –  वात्सल्य
  • १५२.आपल्याबरोबर खेळात भाग घेणारा मित्र – सवंगडी  
  • १५३.आपापसात हळूच बोलणे –  कुजबुज
  • १५४.हाताचे दोन पंजे जवळ आणून केलेला हाताचा पसा –  ओंजळ
  • १५५.एखादी गोष्ट नाही अशी स्थिती –  अभाव
  • १५६.एकमेकांवर अवलंबून असणारे – परस्परावलंबी
  • १५७.ज्याला कोणीही शत्रू नाही असा –  अजातशत्रू
  • १५८.एखाद्या संस्थेची स्थापना करणारा – संस्थापक
  • १५९.दुसऱ्यांचे पाहून त्याच्यासारखे वागणे – अनुकरण
  • १६०.सतत कष्ट करणारा – कष्टाळू
  • १६१.वयाने व अधिकाराने कमी –  कनिष्ठ
  • १६२.कसलेही व्यसन नसणारा –  निर्व्यसनी
  • १६३.कमी बुद्धी असलेला –  मतिमंद
  • १६४.खूप विस्तार असलेले –  विस्तीर्ण
  • १६५.खेळाडूंच्या संघाचा प्रमुख –  कर्णधार
  • १६६.मनास आकर्षण घेणारे – मनमोहक
  • १६७.गुरे बांधण्याची जागा –  गोठा
  • १६८.घोडे बांधण्याची जागा –  पागा
  • १६९.गाई सांभाळणारा –  गोपाळ
  • १७०.जे होणे शक्य नाही असे – असंभव
  • १७१.सर्व काही जपणारा –  सर्वज्ञ
  • १७२.आरण्याचा राजा –  वनराज
  • १७३.जुन्या मतांना चिकटून राहणारा –  सनातनी, पुराणमतवादी
  • १७४.धान्य  साठवण्याची जागा –  कोठार
  • १७५.ज्याची पत्नी  मरण पावली आहे असा पुरुष – विधुर
  • १७६.जिचा पती मरण पावला आहे अशी महिला –  विधवा
  • १७७.सूर्य मावळण्याची घटना –  सूर्यास्त
  • १७८.हाताच्या बोटात घालायचा दागिना – अंगठी
  • १७९.नाव चालवणारा –  नावाडी
  • १८०.ज्याला तळ लागत नाही असा –  अथांग
  • १८१.भाषण ऐकणारे – श्रोते
  • १८२.जिचा उपयोग होत नाही अशी वस्तू –  निरुपयोगी
  • १८३.बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण – अबालवृद्ध
  • १८४.जेवण झाल्यावर शंभर पावले फिरणे – शतपावली
  • १८५.ढगांनी न भरलेले – निरभ्र
  • १८७.तीन कोण असलेली आकृती –  त्रिकोण
  • १८८.तीन नद्या एकत्र मिळण्याचे ठिकाण –  त्रिवेणी
  • १८९.थोडक्यात समाधान मानणारा –  अल्पसंतुष्ट
  • १९०.दुसऱ्याच्या मनातले जाणणारा –  मनकवडा
  • १९१.दुसऱ्याला ठार मारण्यासाठी पाठवलेला माणूस –  मारेकरी
  • १९२.नाटक लिहिणारा –  नाटककार
  • १९३.नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा – नट, अभिनेता
  • १९४.धनुष्य धारण करणारा – धनुरधारी
  • १९५.रिकामा हिंडनारा – टवाळखोर
  • १९६.नृत्य करणारा पुरुष – नर्तक
  • १९७.प्रेरणा देणारा –  प्रेरक
  • १९८.नवऱ्या मुलीचे वडील – वरपिता
  • १९९.नशिबाने आलेली अवस्था –  देवदशा
  • २००.मासे पकडणारा – कोळी
  • २०१.चंद्रापासून येणारा प्रकाश – चांदणे
  • २०२.जीवाला जीव देणारा –  जिवलग
  • २०३.मूर्तीची पूजा करणारा –  मूर्तिपूजक
  • २०४.प्रवासात बरोबर घेतलेले खाद्यपदार्थ –  शिदोरी
  • २०५.माशासारखे डोळे असलेली स्त्री –   मीनाक्षी
  • २०६.ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहे असा  – अजानबाहू  
  • २०७.मिठाई तयार करणारा –  हलवाई
  • २०८.ज्याला खंड नाही असा – अखंड
  • २०९.अंग राखून काम करणारा –  अंगचोर
  • २१०.मोजता येणार नाही असे –  अगणित
  • २११.यज्ञातील आहुती –  बळी
  • २१२.योग करण्याची जागा –  योगशाळा
  • २१३.राजाचे बसायचे आसन – सिंहासन
  • २१४.हत्तीच्या पाठीवर बसण्यासाठी केलेली जागा किंवा बैठक – अंबारी
  • २१५.ज्याला  मरण नाही असा –  अमर
  • २१६.लाकडाच्या वस्तू बनवणारा – सुतार
  • २१७.दोनदा जन्मलेला – द्विज
  • २१८.लोखंडाच्या वस्तू बनवणारा – लोहार
  • २१९.मोठ्यांनी लहानांना दिलेली सदिच्छा –  आशीर्वाद
  • २२०.वनस्पतीच्या मुळाशी पाणी घालण्यासाठी केलेला खोलगट भाग – आळे
  • २२१.वाट दाखवणारा –  वाटाड्या
  • २२२.आजार  कमी करण्यासाठी घेतलेल्या गोळ्या किंवा दवा – औषधी
  • २२३.शरीरात जीव असलेला –  सजीव
  • २२४ .शिक्षा करण्याचे यमपुरीतील स्थान – नरक
  • २२५.नेत्याची अनुकरण करणारे – अनुयायी
  • २२६.जिल्ह्याचा कारभार पाहणारी संस्था – जिल्हापरिषद
  • २२७.जिचा पती जिवंत आहे अशी स्त्री – सुवासिनी
  • २२८.खूप मोठा विस्तार असलेले – विस्तीर्ण
  • २२९.डोंगरात कोरलेले मंदिर – लेणी
  • २३०.अनेकांमधून निवडलेले – निवडक
  • २३१.तप करण्याची जागा – तपोभूमी
  • २३२.चांदण्या रात्रीचा पंधरवडा –  शुक्लपक्ष
  • २३३.तांब्याच्या पत्रावर लिहिलेला लेख – तामृलेख
  • २३४.दुष्काळात सापडलेले लोक – दुष्काळग्रस्त
  • २३५.दररोज ठरलेला कार्यक्रम – दिनक्रम
  • २३६.दारोदारी भिक्षा मागणारा – भिक्षाार्थी
  • २३७.दागिने नसलेली गरीब स्त्री – लंकेची पार्वती
  • २३८.तोंडावर हात मारत काढलेला आवाज – बोंब  
  • २३९.तोफ असलेला गाडा – रणगाडा
  • २४०.ढगांनी भरलेले – ढगाळलेले
  • २४१.दुसऱ्या देशात जाणे – परदेशगमन
  • २४२.कष्ट करून जगणारे – कष्टकरी
  • २४३.करण्याची लाकडी परात – काठवत
  • २४४.नावाचा एक सारखा उच्चार – घोष
  • २४५.देवास अर्पण करावयाचा पदार्थ – नैवेद्य
  • २४६.चंद्राप्रमाणे मुख असणारी – चंद्रमुखी
  • २४७.नृत्य करणारी स्त्री – नर्तकी
  • २४८.निरपेक्ष बुद्धीने व स्वच्छने केलेल्या कामाबद्दल दिले जाणारे धन – मानधन
  • २४९.योजना आखणारा – आयोजक
  • २५०.पहाटेची वेळ – उषःकाल

Leave a Comment