बाळासाहेब ठाकरे जयंती भाषण | balasaheb Thakre Jayanti speech |
१. सर्वाना माझा नमस्कार, माझे नाव ………….. आहे. मी वर्ग …………मध्ये शिकत आहे.
२. आज दिनांक 23 जानेवारी म्हणजे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे.
३. आज मी तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी सांगणार आहे.
४. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23.जानेवारी.1926 रोजी महाराष्ट्रातील पुणे या शहरात झाला.
५. त्यांच्या आईचे नाव रमाबाई आणि वडिलांचे नाव केशव सीताराम ठाकरे असे होते.
६. बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार आणि निर्भीड पत्रकार होते.
७. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन मुंबईत त्यांनी ‘शिवसेना’ स्थापन केली.
८. 1995 मध्ये याच शिवसेनेचा भगवा महाराष्ट्र विधानभवनावर त्यांनी फडकवला.
९. ते ‘हिंदूहृदयसम्राट’ व ‘शिवसेनाप्रमुख’ म्हणून ओळखले जातात.
१०. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी त्यांनी योगदान दिले.
११. दिनांक 17 नोव्हेंबर 2012 रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले.
१२. त्यांच्या पावन स्मृतींना माझे विनम्र अभिवादन ….जय हिंद, जय महाराष्ट्र….