नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती भाषण | Netaji Subhashchandra Bose Jayanti speech |
नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती भाषण-01
१. नमस्कार मित्रांनो, आज आपण नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करत आहोत.
२. मी आज तुम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे.
३. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी झाला.
४.त्यांच्या आईचे नाव प्रभावती आणि वडिलांचे नाव जानकीनाथ बोस असे होते.
५. आजच्या ओडिशा राज्यातील कटक येथे जन्मलेले सुभाषबाबू हे अतिशय बुद्धिमान होते.
६. त्यावेळी अत्यंत कठीण मानली जाणारी आय.सी.एस. ची परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली होती.
७. परंतु , प्रखर राष्ट्रभक्तीमुळे त्यांनी इंग्रजांची गुलामी पत्करली नाही.
८. 1938 मध्ये हरिपुरा येथे राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.
९. त्यांनी ‘चलो दिल्ली’ हा नारा दिला.
१०. आझाद हिंद सेनेची स्थापना करून इंग्रजांशी लढणारे ते थोर देशभक्त होते.
११. दरवर्षी त्यांचा जन्मदिवस ‘पराक्रम दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.
१२.“तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा” असे आवाहन त्यांनी देशवासीयांना केले.
१३. विमान अपघातात 18 ऑगस्ट 1945 रोजी त्यांचे निधन झाले.
१४. त्यांच्या पावन स्मृतींना माझे विनम्र अभिवादन ….जय हिंद, जय भारत ….
नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती भाषण-02
1. सर्वाना माझा नमस्कार, माझे नाव ………….. आहे. मी वर्ग …………मध्ये शिकत आहे.
2. आज दिनांक 23.जानेवारी आहे. आपल्या सुभाषबाबूंची म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे.
3. आज मी तुम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी सांगणार आहे.
4. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23.जानेवारी.1897 रोजी ओडिशा राज्यातील कटक येथे झाला.
5. नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नेते होते.
6. त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली.
7. ते थोर देशभक्त होते.
8. महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत त्यांनीही स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले.
9. . “तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा” असे आवाहन त्यांनी जनतेला केले.
10. ‘स्वराज्य’ आणि ‘फॉरवर्ड’ अशा वृत्तपत्रांतून त्यांनी इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध लोकजागृती केली.
11. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी जर्मनी, जपान यासारख्या देशांची मदत मागितली होती.
12. त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा…. जय हिंद, जय भारत ….