२६ जानेवारी- प्रजासत्ताक दिन भाषण – 02 | Republic day speech
१. सर्वांना माझा नमस्कार.
२. माझे नाव ………………………………………… आहे. मी ……………. वर्गात शिकते. / शिकतो.
३. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्व मान्यवरांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
४. आज २६ जानेवारी हा दिवस आपण आपला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत.
५. सर्वप्रथम, सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
६. प्रजासत्ताक दिन हा आपला एक राष्ट्रीय सण आहे.
७. या दिवशी सन १९५० मध्ये भारताचे संविधान अंमलात आले.
८. भारतीय संविधानाने आपल्याला मुलभूत हक्क व अधिकार दिले आहेत.
९. भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे.
१०. प्रजासत्ताक दिन आपल्याला शांतता व एकतेची शिकवण देतो.
११. म्हणून मला माझा भारत देश खूप आवडतो.
जय हिंद, जय भारत !