स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाईन सराव चाचणी-10 | Scolarship Exam Online practice Test-10

By Neha

Published On:

Scholarship-Online- practice Test-10
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाईन सराव चाचणी-10 | Scolarship Exam Online practice Test-10

Scolarship Exam Test : स्कॉलरशिप परीक्षा 2024-25 चा online सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाईन सराव चाचणी-10 देत आहोत. Scolarship Exam Online practice Test-10 ही सराव चाचणी 25 प्रश्नांची असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे. परंतु, प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.

स्कॉलरशिप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती की, आपण आपल्या विद्यार्थ्यांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या चाचणीचा सराव करून घ्यावा. अशाच सराव चाचण्या आम्ही आपणासाठी स्कॉलरशिप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.

नक्कीच आपणास या सराव चाचणीचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, हा सराव आपणास कसा वाटला, हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.

1. मीना एका रांगेत मध्यभागी उभी असून तिचा क्रमांक 7 वा आहे तर रांगेत एकूण मुले किती ?   

13 मुले

2. एका रांगेत 23 मुली उभ्या आहेत, तर मध्यभागी उभ्या असलेल्या मनालीचा क्रमांक किती ?

12 वा

3. सविताचा रांगेत डावीकडून 8 वा व उजवीकडून 9 वा क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती ?

16 मुले

4. एका प्रदर्शनात उंट, हत्ती, सिंह आणि बैल यांची क्रमाने ७३ चित्रे लावली आहेत. तर 44 व्या क्रमांकावर कोणते चित्र येईल ?

बैल

5. एका रांगेत 9 झाडे समान अंतरावर आहेत. दोन झाडांतील अंतर ४ मी तर पहिल्या व शेवटच्या झाडांतील अंतर किती ?

146, 234, 57, 42, 503, 432, 300

32 मी

6. कविताच्या डावीकडे 17 मुली व उजवीकडे 9 मुली उभ्या आहेत. याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या सुवर्णाचा क्रमांक कितवा ?

14

7. रस्त्याच्या कडेने 10 मीटरवर एक याप्रमाणे 50 झाडे लावली तर 16 व 25 क्रमांकाच्या झाडांमध्ये अंतर किती मीटर होईल ?     

1) 9 2) 21 3) 25 4) 16

90 मीटर

8. मध्यभागी उभे असणाऱ्या रमेशच्या पाठीमागे पाचव्या क्रमांकावर उभा असणारा संकेत रांगेत पुढून 17 व्या स्थानी आहे तर रांगेत मुले किती ?

23

9. गावात प्रभातफेरीसाठी दोन दोन विद्यार्थी हातात हात घेऊन चालत आहेत. प्रभातफेरीच्या मधोमध रश्मी व फरीदा चालत असून त्या दोघींची रांगेतील 35 वी जोडी आहे. तर प्रभात फेरीला एकूण विद्यार्थी आहेत ?

138

10. एका रांगेत जॉनचा डावीकडून पाचवा व उजवीकडून सातवा क्रमांक आहे तर रांगेत एकूण किती मुले उभी आहेत ?

11

11. एका रांगेत मिनाक्षी डावीकडून 12 व्या स्थानी उभी आहे. तिच्या उजवीकडे 4 थ्या क्रमांकावर उभ्या असणाऱ्या मीराचा उजवीकडून 10 वा क्रमांक आहे. तर रांगेत एकूण मुली किती ?

25

12. कवायतीसाठी जेवढ्यारांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. जर प्रत्येक रांगेत 18 मुले असतील तर मैदानावरील सर्व मुलांच्या पायांची संख्या किती ? (प्रत्येक मुलाला दोन पाय आहेत.)

648

13. एका रांगेत संगीता मध्यभागी उभी असून तिचा क्रमांक आठवा आहे. तर रांगेत एकूण किती मुली आहेत?

15 मुली

14. एका रांगेत 37 मुले असून मध्यभागी असणाऱ्या सनीचा रांगेतील क्रमांक कितवा ?

19

15. 5 मी अंतरावर एक झाड याप्रमाणे 12 झाडे समान अंतरावर क्रमाने लावली, तर पहिल्या व शेवटच्या झाडातील अंतर किती ?

55

16.आर्याचा रांगेत पुढून 10वा व मागून 7 वा क्रमांक आहे, तर रांगेत एकूण मुले किती ?

16 मुले

17. एका रांगेत जितकी झाडे आहेत तितक्याच झाडांची रांग लावायची आहेत. जर एका रांगेत 5 झाडे लावली, तर एकूण किती झाडे लावावी लागतील ?

25 झाडे

18.हजेरीपत्रकात परेशचा क्रमांक 8 वा आहे आणि अॅन्थनी चा क्रमांक शेवटून 16 वा आहे. परेश आणि अॅन्थनी यांच्यामध्ये 16 मुलांची नावे आहेत, तर वर्गात एकूण किती मुले आहेत ?

40

19. शाळेच्या मैदानात एका रांगेत झाडे लावली. पाच मीटर अंतरावर एक झाड याप्रमाणे एकूण 50 मीटर अंतरावर झाडे लावली तर, एकूण किती झाडे लावली ?

11 झाडे

20. सुलोचनाच्या मागे अठरा मुली व पुढे पाच मुली आहेत. तर सरिता व सुलोचना यांच्यामध्ये 8 मुली आहेत. तर सरिताचा पुढून कितवा क्रमांक असेल ?

10 वा

21. 35 मुलांच्या रांगेत सचिन मध्यभागी असणाऱ्या मुलाच्या डावीकडे तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर सचिनचा रांगेत उजवीकडून व डावीकडून कितवा क्रमांक असेल ?

21 व 15

22. कवायतीसाठी जेवढ्या रांगा आहेत, तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. जर प्रत्येक रांगेत 16 मुले असतील, तर मैदानावरील सर्व मुलांच्या पायांची संख्या किती ?

512

23. एका रांगेत 23 मुले उभी आहेत. बरोबर मध्यभागी रवि उभा आहे. त्याच्या उजवीकडे पूजा उभी आहे. तर तिचा रांगेतील पुढीलपैकी कोणता क्रमांक असेल ?

11

24. एका रांगेत काही मुली उभ्या आहेत. शबाना म्हणते, “माझा शेवटून सातवा क्रमांक आहे.” शकीला म्हणते, “माझा सुरुवातीपासून बारावा क्रमांक आहे आणि शबाना माझ्या अगोदर दुसऱ्या स्थानावर आहे” तर या रांगेत एकूण मुली किती ?

16

25. एका रांगेत पहिल्या मुलानंतर 1 मुलगी, दुसऱ्या मुलानंतर 2 मुली, तिसऱ्या मुलानंतर 3 मुली याप्रमाणे एकूण 36 मुले उभी आहेत तर या 36 मुलांमध्ये मुलगे किती आहेत ?

8

Leave a Comment