स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाईन सराव चाचणी-09 | Scolarship Exam Online practice Test-09

By Neha

Published On:

Scholarship-Online-practice Test-9
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाईन सराव चाचणी-09 | Scolarship Exam Online practice Test-09

Scolarship Exam Test : स्कॉलरशिप परीक्षा 2024-25 चा online सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाईन सराव चाचणी-09 देत आहोत. Scolarship Exam Online practice Test-09 ही सराव चाचणी 25 प्रश्नांची असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे. परंतु, प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.

स्कॉलरशिप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती की, आपण आपल्या विद्यार्थ्यांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या चाचणीचा सराव करून घ्यावा. अशाच सराव चाचण्या आम्ही आपणासाठी स्कॉलरशिप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.

नक्कीच आपणास या सराव चाचणीचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, हा सराव आपणास कसा वाटला, हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.

1. 13, 23, 33, 43, 53, 63 या संख्यामालेत किती संख्यांतील अंकांची बेरीज समसंख्या येते ?   

तीन

2. 8, 9, 4, 6, 3, 2, 6, 1, 7, 6, 5, 4, 7 या संख्यामालेत विषम अंकानंतर लगेच विषम अंक आहे, असे किती वेळा आले आहे ?

एक वेळा

3. 2, 3, 7, 2, 3, 9, 7, 8, 2, 3, 9, 2, 3, 5, 3, 2, 3, 3 या संख्यामालिकेत 2 नंतर लगत 3 आहे, परंतु 3 नंतर लगत 9 नाही असा 3 अंक किती वेळा आला आहे ?

तीन वेळा

4. 3, 2, 7, 6, 4, 3, 1, 5, 9, 0, 2 या अंकमालिकेत उजवीकडून 3 रा डावीकडून 2 रा हा अंक घेऊन मोठ्यात मोठी दोन अंकी कोणती संख्या तयार होते ?

92

5. खालील संख्या मालिकेत 3 निःशेष भाग जाणाऱ्या समसंख्या किती ?

146, 234, 57, 42, 503, 432, 300

4

6. 1, 11, 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91 या संख्यामालिकेत मूळसंख्या किती आहेत ?

5

7. 6, 2, 4, 5, 9, 8, 2, 4, 6, 9, 2, 4, 5, 2, 4 या संख्यामालेत 4 अंकापूर्वी लगत 2 व 4 नंतर लगतच 5 असे किती वेळा आले आहे ?      

1) 9 2) 21 3) 25 4) 16

दोन

8. 3, 9, 7, 8, 2, 3, 4, 9,5, 8, 7, 3, 2 या संख्यामालिकेत डावीकडून 4था व उजवीकडून 4था या अंकांचा भागाकार किती ?

1

9. 9, 3, 2, 3, 3, 2, 9, 3, 3, 1, 2, 3 या अंक मालिकेत लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार सम संख्या येतो अशा जोड्या किती ?

6

10. 3, 5, 4, 3, 2, 3, 4, 5, 7, 2, 3, 4, 6, 3, 9, 2, 3, 5 या अंकमालिकेत 3 हा अंक किती वेळा आला आहे ?

6 वेळा

11. 5, 7, 9, 2, 6, 0, 3, 9, 4, 8, 4, 6, 6, 2, 8 या अंकमालेत लगतच्या दोन संख्यांची बेरीज 12 आहे अशा किती जोड्या आहेत ?

5

12. 215, 512, 152, 351, 712 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल ?

351

13. 5, 7, 8, 1, 5, 9, 2, 1, 5, 6, 1, 7, 5, 1, 3, 4 या मालिकेत 5. च्या आधी लगत 1 हा अंक किती वेळा आला आहे ?

2 वेळा

14. 3, 5, 8, 9, 6, 1, 7, 6, 2, 4 या मालिकेत मूळ संख्या किती आहेत ?

4

15. संख्यामाला 19, 21, 22, 32, 50, 64, 87, 93, 98 या दिलेल्या संख्यामालेत समसंख्या या विषम संख्यांपेक्षा कितीने जास्त आहेत ?

1

16.9, 2, 8, 5, 4, 1, 3 या संख्यामालेतील पहिल्या तीन अंकांची बेरीज शेवटून तीन अंकांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अगर जास्त आहे ?

11 ने जास्त

17. 3, 5, 4, 3, 2, 3, 4, 5, 7, 2, 3, 4, 6, 3, 9, 2, 3, 5 या संख्यामालेत लगतच्या दोन अंकांची बेरीज 9 आहे. असे किती वेळा आले आहे?

4 वेळा

18.19, 91, 22, 32, 50, 64, 87, 93, 98 वरील संख्यामालेत 3 ने निःशेष भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ?

2

19. 8, 4, 9, 4, 4, 7, 6, 8, 8, 2, 3, 5, 5, 4, 3 या संख्यामालेत सम अंकानंतर लगेच सम अंक, असे किती वेळा आले आहे ?

पाच वेळा

20. 22, 85, 90, 36, 73, 67, 48, 54 या संख्यामालेत सम संख्या विषम संख्येपेक्षा कितीने जास्त आहेत?

(9, 12)          (15, 22 )            (11, 55)          (85, 51)

2 ने जास्त

21. 4, 3, 2, 1, 2, 3, 4, 5, 9, 9, 8, 7, 3, 2 या संख्यामालेत विषमस्थानचे अंक व समस्थानचे अंक यांच्या बेरजेतील फरक किती ?

2

22. पुढील किती कंसातील अंकांची बेरीज विषम संख्या आहे ? (3, 6) (4,9) (7,6) (1,8) (6,9) (4, 8) (3,9) (2,7)

सहा

23. पुढे दिलेल्या संख्यांपैकी सर्वात मोठ्या संख्येतील अंकांची बेरीज किती येईल ? 37, 44, 45, 52, 49

7

24. 8, 1, 5 हे सर्व अंक वापरुन लहानात लहान चार अंकी तयार होणारी संख्या कोणती ?

1158

25. 27 मुलांच्या रांगेत अनिता मध्यभागी उभी आहे. तर तिचा क्रमांक कितवा येईल ?

14 वा

Leave a Comment