स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाईन सराव चाचणी-02 | Scolarship Exam Online practice Test-02

By Neha

Published On:

Scholarship Online practice Test 02
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाईन सराव चाचणी-02 | Scolarship Exam Online practice Test-02

Scolarship Exam Test : स्कॉलरशिप परीक्षा 2024-25 चा online सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाईन सराव चाचणी-02 देत आहोत. Scolarship Exam Online practice Test-02 ही सराव चाचणी 25 प्रश्नांची असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे. परंतु, प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.

स्कॉलरशिप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती की, आपण आपल्या विद्यार्थ्यांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या चाचणीचा सराव करून घ्यावा. अशाच सराव चाचण्या आम्ही आपणासाठी स्कॉलरशिप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.

नक्कीच आपणास या सराव चाचणीचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, हा सराव आपणास कसा वाटला, हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.

1. २७९८३ या संख्येतील हजार स्थानच्या अंकाला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात ……….. असे लिहितात.         

7

2.तीन अंकी सर्वात लहान संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहा.

100

3.”पाच हजार दोनशे बत्तीस” ही संख्या देवनागरी संख्याचिन्हात अशी लिहितात.    

५२३२

4.साडे चारशे ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात अशी लिहितात.

450

5.पंचाहत्तर हजार तीन ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल ? 

75,003

6.६७,८९४ ह्या संख्येतील शतक स्थानचा अंक आंतरराष्ट्रीय अंकात लिहा.

8

7. ८९,४५० ह्या संख्येतील दशक स्थानचा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात असा लिहितात.       

5

8. 78,911 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात अशी लिहितात.

७८,९११

9. ‘अठ्‌ठ्याऐंशी हजार अठ्‌ठ्याऐंशी’ ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात अशी लिहितात.

88,088

10. जॉनने सव्वा लाख रुपये किमतीची दुचाकी विकत घेतली. ही रक्कम आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात अशी लिहितात. 

1,25,000

11.घड्याळात बारा वाजले, हे रोमन मध्ये असे लिहितात.

XII

12.सुधाकरने तेरा रुपयाचा एक पेन व पाच रुपयाची एक पेन्सिल घेतली, तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले? रोमन अंकात लिही.

XVIII

13.V, L, X, C या संख्या चढत्या क्रमाने लिहा.

V, X, L, C

14.L – XV = ……… किती ?

XXXV

15. X + XV + XX = ………….किती ?

XLV

16.( X + XV ) – XI = ……… किती ?  

XIV

17. पुढील संख्या अक्षरात लिहा.   7,04,25,00,007

सात अब्ज चार कोटी पंचवीस लक्ष सात

18. पुढील संख्या अंकात लिहा-  पाच अब्ज सतरा कोटी बारा लक्ष अकरा हजार सातशे पंधरा

5,17,12,11,715

19. 6 कोटी ही संख्या कशी लिहाल?

60000000

20.1,00,000 चे योग्य वाचन कसे कराल ?

1 लक्ष

21. ‘साडे पंधरा हजार’ अंकात लिहा.

15,500

22. क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा आणि तिचे अक्षरी वाचन करा. 37712640  …..?……  37712642

तीन कोटी सत्याहत्तर लक्ष बारा हजार सहाशे एकेचाळीस

23. ‘साडे चार लक्ष’ ही संख्या कशी लिहावी ?   

4,50,000

24. सहा अंकी एकूण संख्या किती आहेत ?

9,00,000

25.) एका शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘वनीकरण’ या उपक्रमाच्या अंतर्गत 42,500 बिया जमा केल्या. 42,500 चे अक्षरी लेखन कसे कराल? 

बेचाळीस हजार पाचशे

Leave a Comment