जिल्हास्तरीय फेरी महादीप परीक्षा सराव पेपर-09 | District Level Mahadeep Test Paper-09
District Level Mahadeep Test Paper: महादीप परीक्षा 2024-25 सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी महादीप परीक्षा सराव पेपर-09 देत आहोत. District Level Mahadeep Test Paper-09 हा सराव पेपर 50 प्रश्नांचा असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे. परंतु, प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.
महादीप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती कि,त्यांनी आपल्या मुलांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या पेपरचा सराव करून घ्यावा. असेच सराव पेपर आम्ही आपणासाठी महादीप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.
नक्कीचं आपणास या सराव पेपरचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रानो हा सराव आपणास कसा वाटला हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.
1. कोणत्या भाषेपासून मराठी भाषेचा विकास झाला ?
संस्कृत
2.भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला किंवा भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ?
व्याकरण
3.वर्णमालेतील वर्णांची संख्या किती ?
५२
4.वर्णमालेत एकूण स्वर किती आहेत ?
१४
5.वर्णमालेत एकूण व्यंजन किती आहेत ?
३४
6.वर्णमालेत एकूण स्वरादी किती ?
दोन
7.वर्णमालेत एकूण संयुक्त व्यंजने किती ?
दोन
8. वर्णमालेत स्वरादी कोणते आहेत ?
अं, अ:
9. वर्णमालेत संयुक्त व्यंजने कोणती आहेत ?
क्ष, ज्ञ
10. काळाचे एकूण मुख्य प्रकार किती ?
तीन
11.नामाचे मुख्य प्रकार किती आहेत ?
तीन
12.मराठी शब्दाच्या एकूण किती जाती आहेत ?
आठ
13.सर्वनामांना असेही म्हणतात ?
प्रतिनामे
14. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती ?
तीन
15. रौप्य महोत्सव कितव्या वर्षी साजरा करतात ?
२५ व्या वर्षी
16.५० वर्ष पूर्ण झाल्यास कोणता महोत्सव साजरा करतात ?
सुवर्ण महोत्सव
17. दगड टाकून पाहणे म्हणजे काय ?
अंदाज घेणे
18. ६० वर्ष पूर्ण झाल्यास कोणता महोत्सव साजरा करतात ?
हीरक महोत्सव
19.७५ वर्ष पूर्ण झाल्यास कोणता महोत्सव साजरा करतात ?
अमृत महोत्सव
20.१०० वर्ष पूर्ण झाल्यास कोणता महोत्सव साजरा करतात ?
शताब्दी महोत्सव
21. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास काय म्हणतात ?
विशेषण
22. हा चौपदरी रस्ता आहे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
विशेषण
23. ‘बारा राशी’ अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा.
संख्यावाचक विशेषण
24. पाण्याच्या ध्वनिदर्शक शब्दाला काय म्हणतात ?
खळखळाट
25.) वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे …….
क्रियापद
26. संस्कृत मधून जसेच्या तसे मराठीत आलेल्या शब्दांना काय म्हणतात ?
तत्सम शब्द
27.संस्कृतमधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपात बदल होतो त्या शब्दांना काय म्हणतात ?
तद्भव शब्द
28.दिल, करोड, दाम, बात, भाई, और, बच्चा हे शब्द कोणत्या भाषेतील आहे ?
हिंदी भाषा
29.बटाटा, तंबाखू, कोबी, लोणचे, साबन, लिंबू, साबुदाना कोणत्या भाषेतून मराठीत आले आहे ?
पोर्तुगीज
30. चिल्ली-पिल्ली, सार, मठ्ठा, भेंडी, डबी, मांजरपाट हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आले आहे?
तामिळी
31.डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय ?
चूक लक्षात आणून देणे
32.मेहनत, हुकूम, मंजुर, जाहीर, अर्ज, साहेब, शाहीर हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आले आहे ?
अरबी
33. हकीकत, पोशाख, खाना, अत्तर, कागद, दवाखाना हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत ?
फारसी
34. समाजाची सेवा करणारा – ……………………
समाजसेवक
35. गाडीच्या चाकांनी पडलेला रस्ता -…………………….
चाकोरी
36.कष्ट करणारे – ……………………
कष्टकरी
37.दगडावर केलेले कोरीव काम – ………………………..
शिल्पकाम
38. नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत -……………………..
नांदी
39. ठराविक वेळी प्रसिद्ध होणारे -…………………..
नियतकालिक
40. ध्येयासाठी प्राणांची आहुती देणारा -……………………….
हुतात्मा
41.नावेतून करण्याची जलक्रीडा – …………………….
नौका विहार
42.सत्याची बाजू मांडणारा – ……………………….
सत्याग्रही
43.कृतज्ञ – ………………..
केलेले उपकार जाणणारा
44.वाट दाखविणारा- …………………
वाटाड्या
45.’थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ?
कोणतीही गोष्ट थोडी थोडी साठविल्याने तिचा मोठा संचय होतो
46. जसे करावे, तसे भरावे म्हणजे काय ?
आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळणे.
47. इकडे आड, तिकडे विहीर म्हणजे काय ?
दोन्हीकडून सारख्याच, अडचणीत येणे.
48.केळी खाता हरखले -……………………..म्हण पूर्ण करा.
हिशेब देता चरकले
49. ‘घरोघरी मातीच्या चुली’ या म्हणीच्या समानार्थी म्हण सांगा.
पळसाला पाने तीनच
50.राईचा पर्वत करणे म्हणजे – …………………….
एखादी गोष्ट क्षुल्लक असताना विपर्यास करून सांगणे.