जिल्हास्तरीय फेरी महादीप परीक्षा सराव पेपर-06 | District Level Mahadeep Test Paper-06
District Level Mahadeep Test Paper: महादीप परीक्षा 2024-25 सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी महादीप परीक्षा सराव पेपर-06 देत आहोत. District Level Madeep Test Paper-06 हा सराव पेपर 50 प्रश्नांचा असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे परंतू प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.
महादीप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती कि,त्यांनी आपल्या मुलांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या पेपरचा सराव करून घ्यावा. असेच सराव पेपर आम्ही आपणासाठी महादीप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.
नक्कीचं आपणास या सराव पेपरचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रानो हा सराव आपणास कसा वाटला हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.
1. एकेश्वरवाद मानणारा धर्म इस्लामचे प्रेषित कोण ?
मुहम्मद पैगंबर
2.ख्रिश्चनांचा पवित्र धर्मग्रंथ कोणता ?
बायबल
3.पारशी धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता ?
अविस्ता
4.मगधचे बिंबिसार यांच्या मुलाचे नाव काय ?
अजातशत्रु
5.अजातशत्रु यांच्या काळातील मगधची नवीन राजधानी कोणती ?
पाटलीग्राम
6.अजातशत्रु यांच्या काळातील मगधची नवीन राजधानी कोणती ?
पाटलीग्राम
7.इ.स.पू. 364 ते इ.स.पू. 324 या काळात मगधचे राजे कोण होते ?
नंद राजे
8. पाटलीपुत्र जिंकून नंद राजवटीचा शेवट कोणी केला ?
चंद्रगुप्त मौर्य
9. सम्राट अशोकाने कोणत्या धर्माचा स्विकार केला ?
बौद्ध धर्माचा
10. गुप्त घराण्याच्या संस्थापकाचे नाव काय ?
श्रीगुप्त
11.विशाखादत्त या संस्कृत नाटककाराने कोणते नाटक लिहिले ?
मुद्राराक्षस
12.गुजरातमध्ये जुनागढजवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्यांनी कोणते धरण बांधले ?
सुदर्शन
13.चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यावर त्याच्या जागी मगधचा राजा कोण झाला ?
बिंदूसार
14. दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या मुलीचे नाव काय ?
प्रभावती
15. सम्राट अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय कोणत्या युद्धात घेतला ?
कलिंगचे युद्ध
16.पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेला घाटरस्ता कोणत्या नावाने ओळखला जातो ?
माळशेज घाट
17. सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना कोठे पाठविले?
श्रीलंकेत
18. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला ?
कौटिल्य
19.मौर्य साम्राज्याची राजधानी कोठे होती ?
पाटलीपुत्र
20.एका सांकेतिक भाषेत TEACHER हा शब्द ETCAEHR असा लिहितात तर CRICKET हा शब्द कसा लिहाल ?
RCCIEKT
21.जर HORSE हा शब्द ELOPB असा लिहिला जातो तर DONKEY हा शब्द कसा लिहाल ?
ALKHBV
22.सांकेतिक भाषेत ENGLISH हा शब्द LGINSEH असा लिहितात, तर याच भाषेत HISTORY हा शब्द कसा लिहाल ?
TSOIRHY
23.सिताफळाला आंबा म्हटले, आंब्याला आवळा म्हटले, आवळ्याला पेरू म्हटले, पेरूला लिंबू म्हटले, लिंबूला फणस म्हटले, फणसाला केळी म्हटले, तर फळांचा राजा’ कोण ?
आवळा
24.जर पेन म्हणजे पिशवी, पिशवी म्हणजे पेन्सिल, पेन्सिल म्हणजे शाई आणि शाई म्हणजे रबर असेल तर पुस्तके कशातून न्यावी लागतील ?
पेन्सिल
25.चाफ्याला हत्ती म्हटले, हत्तीला फणस म्हटले, फणसाला गुलाब म्हटले, गुलाबाला उंदिर म्हटले, उंदिराला मोगरा म्हटले, तर श्रीगजाननाचे वाहन कोणते ?
मोगरा
26. चहाला पेप्सी म्हटले, पेप्सीला दुध म्हटले, दुधाला मिरिंडा व मिरिंडाला कॉफी म्हटले, तर पांढऱ्या रंगाचे पेय कोणते ?
मिरिंडा
27.सासुला सुन म्हटले, सुनेला आत्या म्हटले, आत्याला आजी म्हटले, आजीला मामी म्हटले, मामीला वहिनी म्हटले, वहिनीला मावशी म्हटले, तर वडिलांच्या बहिणीला काय म्हणावे ?
आजी
28.जर भिंतीला खिडकी म्हटले, खिडकीला दरवाजा म्हटले, दरवाज्याला अंगण म्हटले, अंगणाला कुंपण म्हटले, तर रोज सकाळी रांगोळी कोठे काढावी ?
कुंपण
29.पेरुला डाळिंब म्हटले, डाळिंबाला फणस म्हटले, फणसाला केळी म्हटले, केळीला पेरू म्हटले, तर कोणत्या फळापासून गरे मिळतील ?
केळी
30. जर घड्याळाला टिव्ही म्हटले, टिव्हीला रेडिओ म्हटले, रेडिओला शेगडी म्हटले, शेगडीला मिक्सर म्हटले, मिक्सरला इस्त्री म्हटले, तर स्वयंपाक कशावर करतील ?
मिक्सर
31.फुटबॉलला क्रिकेट म्हटले, क्रिकेटला बॅडमिंटन म्हटले, बॅडमिंटनला हॉकी म्हटले, हॉकीला टेनिस म्हटले, टेनिसला बुद्धिबळ म्हटले, तर भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?
टेनिस
32.एका सांकेतिक भाषेत Clock हा शब्द 44 असा लिहितात तर त्याच भाषेत Watch हा शब्द कसा लिहाल ?
55
33.एका सांकेतिक भाषेत Bile 49 व Hand 144 असेल तर DEEP ?
400
34.एक घडयाळ दर तासाला 12 सेकंद पुढे जाते. तर दुपारच्या 2 वाजता घड्याळ बरोबर लावले तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता किती वाजलेले असतील ?
8 वा. 6 मि.
35.एक घड्याळ दर दोन तासांनी 30 सेकंद मागे पडते. दुपारी 3 वाजता बरोबर लावलले घड्याळ दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता किती वेळ दाखवेल ?
2 वा. 54 मि.
36.विनोदचे वडिल हे अर्चनाचे मामा आहेत. तर विनोदची आई अर्चनाच्या आईची कोण ?
वहिनी
37.श्वेता अश्विनीला म्हणाली, तुझ्या वडिलांची मेहुणी ही माझ्या भावाची एकुलती एक मावशी लागते तर श्वेता अश्विनीची कोण ?
बहिण
38. एका स्त्रीकडे पाहून रामूअण्णा म्हणाले, “हिची सासू माझ्या आईला सासुबाई म्हणते तर ती स्त्री रामूअण्णाची कोण ?
सुन
39. शरदच्या वडिलांना भाऊ बहिण नाही. पण शरद हा रविंद्रचा भाचा आहे, तर रविंद्र शरदच्या वडिलांचा कोण ?
मेव्हणा
40. विनोद पूर्वेकडे तोंड करून उभा असताना सरळ पुढे दहा मीटर चालत जाऊन डावीकडे सात मीटर अंतर चालत गेल्यानंतर उजवीकडे तीन मीटर चालून डावीकडे पाच मीटर अंतर चालल्यानंतर उभा राहिला तर त्याच्या मागील बाजू कोणती ?
दक्षिण
41.समीर दक्षिणेकडे तोंड करून उभा असताना त्याच्या मागील बाजूच्या विरुद्ध बाजूच्या दोन्ही उपदिशांची नावे काय ?
आग्नेय व नैऋत्य
42.राम वायव्य कडे तोंड करून उभा असताना त्याच्या पाठीमागच्या बाजूच्या लगतच्या उजव्या बाजूकडील मुख्य बाजूची विरुद्ध बाजू कोणती ?
उत्तर
43.सक्षम हा ईशान्य बाजूकडे पाठ करून उभा आहे त्याच्या पुढील बाजूच्या लगतच्या डाव्या मुख्य बाजूची विरुद्ध बाजू सक्षम च्या कोणत्या हातावर राहील ?
डाव्या
44.समीर दक्षिणेकडे चालत जाताना उजवीकडे वळून दहा मीटर अंतरावर थांबून डावीकडे 45 अंश फिरून उभा असताना त्याच्या पाठीमागील बाजू कोणती ?
ईशान्य
45.रोहन रोहितला म्हणाला, तुझ्या आईची सासू ही माझी आजी आहे तर रोहनचे वडिल रोहितच्या आजोबाचा कोण ?
मुलगा
46. शिवाजी वायव्य कडे जाताना डावीकडे 90 अंश वळून पुढे वीस मीटर चालत गेला पुन्हा 90 अंशात डावीकडे वळून दहा मीटर अंतर चालत गेला तेव्हा त्याच्या डावीकडील मुख्य बाजूची विरुद्ध बाजू कोणती ?
पश्चिम
47. घड्याळात सहा वाजून पंधरा मिनिटे झाले असताना घड्याळातील तास काटा दक्षिण दिशा दर्शवतो तर दोन्ही काट्यामधील दिशा कोणती ?
नैऋत्य
48.घड्याळात पावणेसहा वाजले असताना मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवित असेल तर त्याच घड्याळातील तास काटा दर्शवत असलेल्या दिशेची विरुद्ध दिशा कोणती ?
दक्षिण
49.जर ईशान्य दिशा दक्षिण दिशा दर्शवीत असेल तर वायव्य दिशा कोणती दिशा दर्शवेल ?
पूर्व
50. जर वायव्य दिशा नैऋत्य दिशा दर्शवीत असेल तर त्याच नकाशात दक्षिण दिशा कोणती दिशा दर्शवित असेल ?
पूर्व दिशा