जिल्हास्तरीय फेरी महादीप परीक्षा सराव पेपर-05 | District Level Mahadeep Test Paper-05

By Neha

Published On:

District-Level-Mahadeep-Sarav-Paper-05
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

जिल्हास्तरीय फेरी महादीप परीक्षा सराव पेपर-05 | District Level Mahadeep Test Paper-05

District Level Mahadeep Test Paper: महादीप परीक्षा 2024-25 सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी महादीप परीक्षा सराव पेपर-05 देत आहोत. District Level Madeep Test Paper-05 हा सराव पेपर 50 प्रश्नांचा असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे परंतू प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.

महादीप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती कि,त्यांनी आपल्या मुलांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या पेपरचा सराव करून घ्यावा. असेच सराव पेपर आम्ही आपणासाठी महादीप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.

नक्कीचं आपणास या सराव पेपरचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रानो हा सराव आपणास कसा वाटला हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.

1. जगातील सर्वात लहान देश कोणता ?                

व्हॅटिकन सिटी

2.एखाद्या इंजिनचा वेग मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते ?

अश्वशक्ती (Horse power)

3.प्लवंक है कोणाच खाद्य आहे ?        

मासे

4.जैन धर्मात एकूण किती तीर्थकर होऊन गेले ?

24

5.वर्धमान महावीर यांचा जन्म कुठे झाला ?   

कुंडग्राम

6.गौतम बुद्धाचा जन्म कोठे झाला ?

लुंबिनी

7.वर्धमान महावीर यांच्या आईचे नाव काय होते ?          

त्रिशाला

8. वर्धमान महावीर यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

सिद्धार्थ

9. ताजमहाल कोणत्या शहरात आहे ?

आग्रा

10. कोणत्या वृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण असे दोन समान भाग होतात ?      

विषुववृत्त

11.पश्चिम गोलार्धात एकूण किती रेखावृते आहेत ?

179 रेखावृत्ते

12.कोणत्या रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त मानतात ?

शून्य अंश (0)

13.ताजमहाल कोणत्या खंडात आहे ?    

आशिया

14. प्रत्येक गावचा कारभार कोण पाहतो ?

सरपंच

15. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ?

ग्रामसेवक

16.ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो ? 

मुख्य कार्यकारी अधिकारी

17. महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत ? 

36

18. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहे ?

34

19.आकाशातील वस्तूंना काय म्हणतात ?

खगोलीय वस्तु

20.सूर्य व सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रीतपणे काय म्हणतात ?

सूर्यमाला

21.ग्रहांभोवती परिभ्रमण करणाऱ्यांना काय म्हणतात ?

उपग्रह

22.सूर्याभोवती प्रदक्षणा घालणाऱ्या लहान आकाराच्या खगोलीय वस्तूंना काय म्हणतात?

बटुग्रह

23.1984 साली अवकाशात जाणारे पहिले भारतीय कोण ?         

राकेश शर्मा

24.उत्तर व दक्षिण ध्रुवाच्या मध्यावरील वर्तुळाला काय म्हणतात ?

विषुववृत्त

25.पृथ्वीच्या स्वतः भोवतीच्या फिरणाऱ्या गतीला काय म्हणतात ?

परिवलन

26. व्हेटिकन सिटीचे क्षेत्रफळ किती आहे ?   

0.44 चौ.किमी.

27.पॅसिफिक महासागराचे क्षेत्रफळ किती आहे ?

16,42,40,977 चौ.कि.मी.

28.सर्वात मोठा महासागर कोणता ?

पॅसिफिक महासागर

29.छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?                      

शिवनेरी

30. जगात एकूण किती खंड आहे ?

7

31.जगात एकूण किती महासागरे आहे ?    

5

32.कुतुबमिनार कोठे आहे ?         

दिल्ली

33. यवतमाळ जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?            

16

34.कन्याकुमारी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहेत ?          

तामिळनाडू

35.एकूण वेद किती आहे ?   

4

36.अशोक स्तंभ कोठे आहे ? 

सारनाथ

37.पारशी धर्माचे संस्थापक कोण होते ?  

जरथूष्ट्र

38. इस्लाम धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कोणता आहे ?

कुराण

39. भारतात 18 वर्षे वयाच्या व्यक्तीना सर्वप्रथम मतदानाचा अधिकार कोणत्या साली मिळाला ?    

1988

40. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कोणत्या ग्रंथातून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले ?

ग्रामगीता

41.21 सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रांतर्फे कोणता दिवस महणून साजरा केला जातो ?      

आंतरराष्ट्रीय शांतता दिवस

42.शरीरात सतत रक्त फिरत राहणाऱ्या क्रियेला काय म्हणतात ?                          

रक्ताभिसरण

43.किल्ले, लेणी, स्तुप या वस्तूंना काय म्हणतात ?

भौतिक साधने

44.हडप्पा येथे प्रथम उत्खनन कधी सुरु झाले ?

इ.स.1921 मध्ये

45.घटसर्प, डांग्या खोकला व धनुर्वात प्रतिबंधक लस कोणत्या नावाने ओळखली जाते ?     

त्रिगुणी

46. वर्धमान महाविरांचा जन्म वैशाली नगराच्या कोणत्या भागात झाला ?           

कुंडग्राम

47. कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात ?

ऊर्जा

48.पिता शुद्धोधन व माता मायादेवी यांचे महान पुत्र कोण?

गौतम बुद्ध

49.मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली ?     

चंद्रगुप्त मौर्य

50. भिक्खूंचा संघ कोणत्या धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी तयार झाला ? 

बौद्ध धर्म

Leave a Comment