जिल्हास्तरीय फेरी महादीप परीक्षा सराव पेपर-03 | District Level Mahadeep Test Paper-03
District Level Mahadeep Test Paper: महादीप परीक्षा 2024-25 सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी महादीप परीक्षा सराव पेपर-03 देत आहोत. District Level Madeep Test Paper-03 हा सराव पेपर 50 प्रश्नांचा असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे परंतू प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.
महादीप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती कि,त्यांनी आपल्या मुलांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या पेपरचा सराव करून घ्यावा. असेच सराव पेपर आम्ही आपणासाठी महादीप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.
नक्कीचं आपणास या सराव पेपरचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रानो हा सराव आपणास कसा वाटला हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.
1. कोणता रक्तगट सर्वमान्य दाता आहे ?
ओ रक्तगट
2.हिमोग्लोबिनमध्ये कशाचे प्रमाण जास्त असते ?
लोह
3.क्षयाचे (टि.बी) जंतू कोणी शोधून काढले ?
रॉबर्ट कॉक
4.रातांधळेपणा हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो ?
अ जीवनसत्त्वाअभावी
5.कांदा कापताना डोळ्यांतून पाणी येते. कारण, कांद्यातून हा वायू बाहेर पडतो.
अमोनिया
6.डेसिबल हे एकक कशाचे आहे ?
आवाजाची तीव्रता
7.झाडाच्या कोणत्या भागापासून रबर काढतात ?
खोडापासून
8. मुडदूस झाल्यास कोणले विटामिन घेतात ?
विटामिन डी
9. हेट्रॅझन हे औषध म्हणून या आजाराच्या रोग्यास दिले जाते ?
हत्तीरोग
10. लेझर किरणांचा शोध कोणी लावला ?
हेराल्ड मॅमन
11.कॅलरी ने काय मोजतात ?
उष्णता
12.गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?
सर आयझॅक न्यूटन
13.ड्राप आइस म्हणजे काय ?
घन कार्बन-डाय-ऑक्साईड
14. घरगुती वापरासाठी लागणारी वीज कशात मोजतात ?
वॅट्समध्ये
15. खगोलशास्त्रीय दुर्बिण प्रथम कोणी शोधून काढ़ली ?
गॅलिलिओ
16.वनस्पतीच्या पेशीभित्तिका कशाच्या बनलेल्या असतात ?
सेल्युलोज
17. खाद्यान्न जास्त दिवस टिकविण्यासाठी त्यात काय वापरले जाते ?
सोडियम बेंझोईट
18. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात ?
फॅदम
19.मलेरिया जंतूचा शोध कोणी लावला ?
रोनाल्ड रॉस
20.कावीळ हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ?
यकृत
21.मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते ?
२४
22.पित्तरसाची निर्मिती कोणत्या आंतरेंद्रियात होते ?
यकृत
23.रक्तद्रव यामध्ये सुमारे किती टक्के पाणी असते ?
९० %
24.एक घन मिलीलीटर रक्तात सुमारे किती तांबडया रक्तपेशी असतात ?
५० लक्ष
25.रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व मदत करते ?
के जीवनसत्व
26. आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते ?
क जीवनसत्व
27.लोहाच्या अभावी हा आजार होतो ?
रक्तक्षय
28.शरीरातील साखरेच्या चयापचयास मदत करणारे संप्रेरक कोणते ?
इन्सुलिन
29.शरीरातील हिमाग्लोबिनच्या निर्मितीसाठी कोणते आम्ल महत्वाचे आहे ?
फॉलिक अॅसिड
30. पिवळया व नारंगी रंगाच्या फळांमध्ये कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते ?
अ जीवनसत्व
31.अन्नपदार्थात खाण्याचा सोडा वापरल्यामुळे अन्नातील कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो ?
ब जीवनसत्व
32.थायमीन या जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो ?
बेरीबेरी
33. B3 या जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो ?
पेलाग्रा
34.मानवाच्या प्रत्येक पेशीत गुणसूत्राच्या किती जोड्या असतात ?
२३
35.मलेरिया व हत्तीरोग हे कशामुळे पसरतात ?
डास
36.अॅसबेस्टासच्या सतत संपर्कामुळे कोणता आजार होतो ?
फुफ्फुसाचा कॅन्सर
37.पेसमेकर हे साधन कशाशी संबंधित आहे ?
हृदय
38. कुत्रा चावल्यामुळे होणाऱ्या रोगाला काय म्हणतात ?
रेबीज
39. पांढऱ्या पेशीचे रक्तातील प्रमाण १ घन मिलिलीटर मागे किती आहे ?
८०००
40. तांबडया पेशी शरीरातील पेशींना कशाचा पुरवठा करतात ?
ऑक्सिजन
41.रक्तातील कोणत्या पेशी आपला आकार बदलू शकतात ?
पांढऱ्या पेशी
42.मानवाच्या शरीरात एकूण किती हाडे असतात ?
२०६
43.मनगट, हाताचा कोपर, बोटातील सांधे यात कोणते सांधे असतात ?
बिजागरीचे सांधे
44.मानवी डोक्याच्या कवटीत एकूण किती हाडे असतात ?
८ हाडे
45.कोणत्या ग्रंथीचा स्त्राव अधिक झाल्यास मनुष्याची उंची वाढते ?
शीर्षस्थ ग्रंथी
46. रक्ताचे चार गट कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केले ?
लैंडस्टायनर
47. मानवी शरीरातील सर्वात मोठी नलिका विरहित ग्रंथी कोणती आहे ?
प्लीहा
48.रक्ताचा रंग लाल कशामुळे होतो ?
हिमोग्लोबिन
49.अन्ननलिकेची सुरुवात कशापासून होते ?
मुखापासून
50. धमनी, शीर, केशवाहिनी हे कशाचे प्रकार आहेत ?
रक्तवाहिन्यांचे